
या फीचरमुळे केवळ मेसेजच्या नोटिफिकेशनने, रिंगटोनने कोणत्या Contact ने मेसेज केला आहे याची माहिती घेऊ शकता. ऑफिस ग्रुपसाठीही रिंगटोन सेट करू शकता. अशी सेट करा खास कॉन्टॅक्टसाठी रिंगटोन -

सर्वात आधी WhatsApp ओपन करा. त्यानंतर ज्या Contact साठी रिंगटोन सेट करायची आहे ते Chat ओपन करा.

Chat ओपन केल्यानंतर उजव्या बाजूला असलेल्या तीन डॉटवर क्लिक करा. View वर क्लिक करा. इथे नोटिफिकेशन पर्याय दिसेल.

त्यात Custom Notification चा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.

आता कस्टम नोटिफिकेशन चेक बॉक्सला टिक करा.

त्यानंतर तुमच्या फोनमधील रिंगटोन सिलेक्ट करा.

या पर्यायाचा वापर करुन स्पेसिफिक कॉन्टॅक्टसाठी कोणतीही रिंगटोन सेट करता येते. त्याशिवाय एखाद्या ग्रुपसाठीही रिंगटोन चेंज करू शकता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.