जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / तुमच्या Wi-Fi चा पासवर्ड विसरलात? असा करा रिकव्हर, जाणून घ्या सोपी ट्रिक

तुमच्या Wi-Fi चा पासवर्ड विसरलात? असा करा रिकव्हर, जाणून घ्या सोपी ट्रिक

राउटरला सुरक्षित ठेवण्यासाठी चांगला-स्ट्राँग पासवर्ड (Password) सेट करावा लागेल. प्रत्येक राउटरला दोन पासवर्ड असतात, एक सेटिंग्ज आणि दुसरा WPA एक्सेस पासवर्ड.

राउटरला सुरक्षित ठेवण्यासाठी चांगला-स्ट्राँग पासवर्ड (Password) सेट करावा लागेल. प्रत्येक राउटरला दोन पासवर्ड असतात, एक सेटिंग्ज आणि दुसरा WPA एक्सेस पासवर्ड.

एका ट्रिकद्वारे Wifi पासवर्ड विसल्यास तो रिकव्हर करता येऊ शकतो. ही ट्रिक केवळ स्वत:च्या पर्सनल वायफायसाठी आहे. ऑफिस किंवा इतर गोष्टींसाठी नाही.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 12 जुलै : विविध सोशल मीडिया अकाउंट्सचे अनेक पासवर्ड (Social Media Passwords) असतात. अनेकदा युजर्स पासवर्ड विसरतात आणि मोठी पंचाईत होते. सिक्योर नेटवर्कसाठी Wi-Fi लाही पासवर्ड ठेवला जातो. अनेक युजर्स वायफाय नेटवर्कला (WiFi Network) एकदा कॉन्फिगर करतात आणि सर्व डिव्हाईसमध्ये पासवर्ड टाकतात. पासवर्ड सेव्ह असल्याने तो लक्षात राहत नाही. पण नवीन फोनमध्ये हा पासवर्ड सेट करताना आठवत नाही, किंवा एखाद्याने तुमचा वायफाय पासवर्ड मागितल्यास मोठी समस्या येते. पण एका ट्रिकद्वारे Wifi पासवर्ड विसल्यास तो रिकव्हर करता येऊ शकतो. ही ट्रिक केवळ स्वत:च्या पर्सनल वायफायसाठी आहे. ऑफिस किंवा इतर गोष्टींसाठी नाही. विंडोजवर पासवर्ड कसा कराल रिकव्हर - - सर्वात आधी Start वर क्लिक करुन कंट्रोल पॅनल त्यानंतर नेटवर्क आणि शेअरिंग सेंटरवर जा. विंडोज 8 वर +C टॅप करू शकता. सर्चवर क्लिक करुन नेटवर्क आणि शेअरिंग सेंटर शोधू शकता. - डाव्या बाजूला अ‍ॅडेप्टर सेटिंग्स चेंजवर क्लिक करा. - ज्या Wi-Fi नेटवर्कचा वापर करत असाल, त्यावर राईट क्लिक करा आणि Status वर क्लिक करा. - वायरलेस प्रोपर्टीजवर क्लिक करुन पुढे सिक्योरिटी टॅबवर क्लिक करा. - आता वायफाय नेटवर्कचं नाव आणि हिडन पासवर्ड दिसेल. खाली दिलेल्या चेक कॅरेक्टर्सवर क्लिक केल्यानंतर पासवर्ड दिसेल.

(वाचा -  काउंटरवर खरेदी केलेलं तिकीट ऑनलाईन कसं कराल कॅन्सल, असं मिळेल रिफंड )

Mac पासवर्ड Recover - - अ‍ॅप्लिकेशन, यूटिलिटीजवर जा. - किचेन अ‍ॅक्सेस ओपन करा. त्यानंतर खाली असलेल्या लिस्डेड सिस्टम किचेनवर टॅप करा. - सर्च बॉक्समध्ये नेटवर्कचं नाव सर्च करा. - नेटवर्कच्या नावावर डबल क्लिक करा आणि बॉक्समध्ये Show Password पर्यायावर क्लिक करा. - आता युजर अकाउंट पासवर्डमध्ये Wi-Fi चा पासवर्ड दिसेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात