नवी दिल्ली, 19 ऑगस्ट : स्मार्टफोन (Smartphone), व्हॉट्सअॅप (WhatsApp) प्रत्येकाच्या आयुष्यात महत्त्वाचा ठरतं आहे. अनेक गोष्टी त्यात सेव्ह असण्यासह इतरांशी केलेले चॅटही असतात. काही वेळा आपल्या मित्राला किंवा इतर कोणाला, एखाद्याला कॉल करण्यासाठी किंवा फोटो पाहण्यासाठी आपला फोन दिला जातो. परंतु त्यावेळी ते आपलं WhatsApp Chat पाहतील अशी भीती असते. पण एका ट्रिकद्वारे तुमचे व्हॉट्सअॅप चॅट कोणीही पाहू शकणार नाही.
व्हॉट्सअॅपची ही ट्रिक आयफोन युजर्ससाठी (iPhone Users) आहे. व्हॉट्सअॅप iOS 9 आणि नंतरच्या वर्जनमध्ये एक अॅडिशनल सिक्योरिटी फीचर येतं. अॅप अनलॉक करण्यासाठी युजर व्हॉट्सअॅपवर टच आयडी किंवा फेस आयडी इनेबल करू शकतात.
टच आयडी किंवा फेस आयडी ऑन केल्यानंतर युजर नोटिफिकेशनने मेसेजचं उत्तर देऊ शकतात. तसंच व्हॉट्सअॅप लॉक असल्यासही कॉलचं उत्तर देऊ शकतात.
- सर्वात आधी WhatsApp Setting मध्ये जावं लागेल.
- त्यानंतर Account वर टॅप करा.
- Privacy निवडा आणि Screen Lock वर टॅप करा.
- आता Touch ID किंवा Face ID कोणताही पर्याय निवडा.
- त्यानंतर टच आयडी किंवा फेस आयडी आधी व्हॉट्सअॅप स्टँडबाय मोडवर असू शकतो. त्याचा कालावधी निवडा.
- Touch ID किंवा Face ID बंद करण्यासाठी पुन्हा Privacy मध्ये जा.
- Screen Lock वर क्लिक करा आणि Touch ID किंवा Face ID ऑफ करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Whatsapp, WhatsApp chats, WhatsApp user