Home /News /technology /

Android मध्ये जास्त स्पेस घेतायंत Large Apps? जाणून घ्या कसे ओळखाल आणि Uninstall कराल हे ॲप्स

Android मध्ये जास्त स्पेस घेतायंत Large Apps? जाणून घ्या कसे ओळखाल आणि Uninstall कराल हे ॲप्स

अनेकदा स्टोरेज कमी असल्यानं फोन स्लो झाल्याची तक्रार अँड्रॉइड युजर्स करताना दिसतात. अँड्रॉइड फोनमध्ये असलेल्या Cache फाईल्स तसेच अनावश्यक मीडिया फाईल्समुळं ही समस्या निर्माण होऊ शकते.

मुंबई, 18 जानेवारी: स्मार्टफोन (Smartphone) हा आता प्रत्येकासाठी गरज बनला आहे. सध्या बाजारात अँड्रॉइड (Android) आणि आयओएस (iOS) अशा दोन ऑपरेटिंग सिस्टीम असलेले स्मार्टफोन उपलब्ध आहेत. युजर त्यांच्या गरजेनुसार, स्मार्टफोनची निवड करत असतो. स्मार्टफोनची इंटर्नल मेमरी (Internal Memory) अधिक असावी, अशी सर्वसाधारण मागणी युजर्सची असते. मात्र अनेकदा स्टोरेज कमी असल्यानं फोन स्लो झाल्याची तक्रार अँड्रॉइड युजर्स करताना दिसतात. अँड्रॉइड फोनमध्ये असलेल्या Cache फाईल्स तसेच अनावश्यक मीडिया फाईल्समुळं ही समस्या निर्माण होऊ शकते. दुसरीकडे, सर्वसामान्यपणे प्रत्येक युजरच्या स्मार्टफोनमध्ये इन्स्टाग्राम, ट्विटर, स्नॅपचॅटसारखे मोठ्या प्रमाणात वापरले जाणारे Apps असतात. मात्र या अॅप्लिकेशन्सला स्पेस अधिक लागते. शिवाय प्रत्येकवेळी अपडेट झाल्यावर हे अॅप्लिकेशन्स तुमच्या स्मार्टफोनमधील अधिक स्पेस (Space) व्यापू लागतात. मात्र, काही सोप्या स्टेप्सच्या मदतीनं कोणतं अॅप्लिकेशन तुमच्या स्मार्टफोनमधील मेमरी स्पेस अधिक वापरतं, हे ओळखणं शक्य आहे. या स्टेप्सविषयी जाणून घेऊया... 1. सर्वप्रथम तुमच्या स्मार्टफोनमधील गुगल प्ले स्टोअर (Google Play Store) ओपन करा. त्यानंतर तुम्ही गुगल लॉगिन केलं आहे का याची खात्री करा. 2. त्यानंतर पेजच्या उजव्या कोपऱ्यात असलेल्या तुमच्या 'प्रोफाईल आयकॉन'वर क्लिक करा. हे वाचा-स्मार्टफोन प्रेमींसाठी खूशखबर! OnePlus 9RT 5G भारतात उपलब्ध, सवलतीत करा खरेदी 3. पुढे, पॉप-अप मेनूमधील 'Manage Apps and Device' हा ऑप्शन सिलेक्ट करा. 4.'Manage' वर क्लिक केल्यानंतर तुमच्या स्मार्टफोनमध्ये इन्स्टॉल केलेल्या सर्व Apps ची लिस्ट दिसेल. 5. त्यानंतर 'Recently Updated' या ऑप्शनवर क्लिक करून साईजनुसार अॅप्लिकेशनची क्रमवारी लावा. मेनूमधून पर्याय निवडून तुम्ही अॅप्लिकेशनची क्रमवारी 'Name', 'Least used' किंवा 'Most used' यानुसार लावू शकता. 6. आकारामानानुसार (Size) अॅप्लिकेशन्सची क्रमवारी लावल्यानंतर तुम्हाला सर्वात जास्त स्पेस वापरणारे, तसेच हेवी अॅप्स (Heavy Apps) कोणते हे दिसेल. हे वाचा-WhatsApp वर येणार तीन दमदार फीचर्स! Photo-Video अशाप्रकारे करता येईल एडिट 7. यातील जे अॅप्स मोठे आहेत आणि त्याचा तुम्ही फारसा वापर करत नाही, असे अॅप्स बाजूला असलेल्या बॉक्समध्ये टिक करून अनइन्टॉल (Uninstall) करू शकता. येथे तुम्ही नको असलेले मोठे अॅप्स एकाचवेळी निवडून ते अनइन्स्टॉल करू शकता. 8. जर तुमच्या स्मार्टफोनमध्ये एखादं अॅप फारसं वापरात नाही किंवा ज्याचा उपयोगही कमी आहे, पण ते विनाकारण जास्त स्पेस युज करतंय असं दिसत असेल, तर तुम्ही तुमच्या फोनमधील 'सेटिंग्ज' ऑप्शनमध्ये जाऊन ते अनइन्स्टॉल करू शकता. यासाठी तुम्ही तुमच्या अँड्राइड डिव्हाईसवरील 'सेटिंग्ज' या ऑप्शनमध्ये जावं, त्यानंतर 'Apps And Notification' हा ऑप्शन निवडावा. त्यानंतर अनइन्स्टॉल वर क्लिक करावं
First published:

Tags: Whatsapp, WhatsApp chats

पुढील बातम्या