• Home
  • »
  • News
  • »
  • technology
  • »
  • Instagram पोस्टद्वारे करता येईल कमाई, कमी फॉलोअर्स असतील तरी असे मिळतील पैसे

Instagram पोस्टद्वारे करता येईल कमाई, कमी फॉलोअर्स असतील तरी असे मिळतील पैसे

इन्स्टाग्रामवर तुमचे फॉलोअर्स कमी असले तरीही कमाई करता येऊ शकते. तुमच्याकडे 1000 फॉलोअर्स असतील तरीही तुम्ही इन्स्टाग्रामवर पैसे मिळवू शकता.

  • Share this:
नवी दिल्ली, 28 जुलै : आजकाल फेसबुक, व्हॉटसअ‍ॅप, इन्स्टाग्राम, ट्विटर अशा वेगवेगळ्या सोशल नेटवर्किंग साइटसचा (Social Networking Sites) वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. इन्स्टाग्रामवर (Instagram) तरुणाईचं प्रमाण अधिक आहे. मनोरंजन हा याचा मुख्य उद्देश असला तरी वेगवेगळ्या उद्देशांनी याचा वापर करण्यावर भर दिला जात आहे. एकाचवेळी मोठ्या प्रमाणात लोकांशी जोडले जाणारे हे प्लॅटफॉर्म्स असल्याने मार्केटिंगसाठीही (Marketing) ते उपयुक्त ठरत आहेत. त्यामुळे यातून कमाई करण्याचा मार्गही उपलब्ध करून देण्यात आला आहे. इन्स्टाग्रामवर अकाउंट असणारे लोक पोस्टस (Posts) टाकून तसंच फॉलोअर्स (Followers) मिळवून चांगली कमाई (Earn Money) करू शकतात. लोकप्रिय व्यक्ती यातून लाखो, कोटी रुपयांची कमाई करत असल्याची अनेक उदाहरणं आहेत. पण इन्स्टाग्रामवर तुमचे फॉलोअर्स कमी असले तरीही कमाई करता येऊ शकते. तुमच्याकडे 1000 फॉलोअर्स असतील तरीही तुम्ही इन्स्टाग्रामवर पैसे मिळवू शकता. Influencer बनून करा कमाई - इन्स्टाग्रामवर एन्फ्लुएन्सर (Influencer) बनून तुम्ही चांगले पैसे कमवू शकता. एन्फ्लुएन्सर म्हणजे अशी व्यक्ती असते जिने आपल्या सोशल अकाउंटवर सातत्याने उपयुक्त आणि अचूक माहिती देऊन लोकांना प्रभावित केलं आहे. सोशल मीडियावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. अशा लोकांना भरपूर फॉलोअर्स असतात. हे Influencers आपल्या फॉलोअर्सना उत्पादनं खरेदी करण्यासाठी उद्युक्त करू शकतात. त्यामुळे इथे तुमचे हजारो फॉलोअर्स असतील तर तुम्ही सोशल मीडिया एन्फ्लुएन्सर ठरता. अशावेळी तुम्ही एखाद्या ब्रँडशी सहयोग करून आपल्या पेजवर त्यांच्या उत्पादनांची जाहिरात करुन पैसे कमवू शकता. Facebook वरुन तुमचा डेटा लीक तर झाला नाही ना? या सोप्या Trick ने असं तपासा अफिलिएट (Affiliate) होऊन पैसे कमवा - मार्केटिंग अफिलिएट (Affiliate) अर्थात मार्केटिंगमध्ये (Marketing) सहयोग देऊनही तुम्ही पैसे कमवू शकता. हा एक एन्फ्लुएन्सरसारखाच प्रकार आहे. मात्र एन्फ्लुएन्सर एका ब्रँडशी (Brand) निगडीत असतात. अफिलिएट मार्केटिंगमध्ये एका ठराविक ब्रँडला प्रोत्साहन देण्याऐवजी त्याच्या उत्पादनांच्या (Products) विक्रीवर अधिक लक्ष द्यावं लागतं. यातून भरपूर पैसे कमावता येतात. यामध्ये उत्पादनाची लिंक दिली जाते. ती पोस्ट करून तुम्ही तुमच्या फॉलोअर्सना ती उत्पादनं खरेदी करण्यासाठी सांगू शकता. प्रत्येक खरेदीवर अफिलिएटरला कमिशन मिळतं. स्मार्टफोनमध्ये होणारं Ad Tracking असं करा ब्लॉक; नको असलेल्या जाहिराती अशा रोखा फोटोग्राफीद्वारे पैसे कमवा - इन्स्टाग्रामवर फोटोग्राफीद्वारेदेखील (Photography) चांगली कमाई करता येते. यासाठी तुम्हाला तुमच्या इन्स्टाग्रामवर तुमचे फोटो विकावे लागतील. या व्यतिरिक्त तुम्ही काढलेले फोटो, व्हिडिओ आणि अ‍ॅनिमेशन, चित्रं, सेल्फी आणि व्हिज्युअल कंटेंटही विक्रीसाठी ठेवू शकता. तुम्ही काढलेले उत्तम फोटो वॉटरमार्कसह अपलोड करू शकता.
First published: