• Home
  • »
  • News
  • »
  • technology
  • »
  • ATM मध्ये गेलात पण डेबिट कार्डच घरी विसरलात? काळजी नको, या सोप्या पद्धतीने काढू शकता पैसे

ATM मध्ये गेलात पण डेबिट कार्डच घरी विसरलात? काळजी नको, या सोप्या पद्धतीने काढू शकता पैसे

आता विना कार्डदेखील पैसे (Cash Withdrawal without Debit Card) काढता येऊ शकतात. डिजीटल युगात हे शक्य झालं आहे. शिवाय यासाठी सिक्योरिटीबाबतही जोखीम नाही.

  • Share this:
    नवी दिल्ली, 23 जुलै : एटीएममधून (ATM) पैसे काढण्यासाठी डेबिट किंवा क्रेडिट कार्डचा वापर केला जातो. जर कधी पैसे काढण्यासाठी एटीएममध्ये गेलात आणि पण कार्डचं विसरलात तर मोठी पंचाईत होते. पण आता विना कार्डदेखील पैसे (Cash Withdrawal without Debit Card) काढता येऊ शकतात. डिजीटल युगात हे शक्य झालं आहे. शिवाय यासाठी सिक्योरिटीबाबतही जोखीम नाही. एनसीआर कॉर्पोरेशनने भारतात यूपीआय इनेबल्ड इंटरऑपरेबल कार्डलेस विड्रॉईंग सिस्टम लाँच केली आहे. NCR कॉर्पोरेशनने NPCI आणि सिटी यूनियन बँकेसह पार्टनरशिपमध्ये ही सुविधा सुरू केली आहे. या पद्धतीने BHIM, Paytm, Gpay, Phonepe चा वापर करुन एटीएममधून पैसे काढता येऊ शकतात. भारतात दोन बँका यासाठीची सुविधा देतात. SBI, ज्यात YONO App चा वापर केला जातो. आणि दुसरी यूनियन बँक, जी UPI आधारित पैसे काढण्याची सुविधा देते.

    (वाचा - UIDAI Alert! Aadhaar कार्डच्या या फ्रॉडपासून सावधान, अशी होतेय फसवणूक)

    UPI App द्वारे ATM मधून पैसे कसे काढाल? - सर्वात आधी अशा ATM मध्ये जा, जिथे कार्डलेस पैसे काढण्याची सुविधा दिली जाते. देशभरात 1500 असे एटीएम आहेत, जे यासाठी सपोर्ट करतात. - ATM मधून पैसे काढण्यासाठी स्मार्टफोनमध्ये कोणतंही UPI App ओपन करावं लागेल. - UPI App ने मशिनमध्ये दिलेल्या QR Code ला स्कॅन करावं लागेल. - जितके पैसे काढायचे आहेत, ते टाका. - ट्रान्झेक्शन पूर्ण झाल्यानंतर एटीएममधून पैसे काढता येतील.

    (वाचा - व्यक्तीच्या मृत्यूनंतर Aadhaar-PAN, पासपोर्ट, वोटर आयडीचं काय होतं? पाहा डिटेल्स)

    YONO App - - जर तुमचं SBI अकाउंट असेल, तर YONO App डाउनलोड करावं लागेल. - त्यानंतर आयडी, पासवर्ड किंवा एम पिनचा वापर करुन लॉगइन करा. - SBI ATM मध्ये जा आणि QR Code द्वारे पैसे काढण्याच्या पर्यायावर क्लिक करा. - जितके पैसे काढायचे आहेत, ते टाका आता QR Code दिसेल. - YONO App च्या होमपेजवर With QR Code Withdraw ऑप्शन निवडा. - ATM मध्ये QR Code स्कॅन करा, त्यानंतर पॉपअप मेसेज येईल तिथे Continue वर क्लिक करुन पैसे काढता येतील.
    Published by:Karishma
    First published: