मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

जागो ग्राहक जागो! Ola-Uber ड्रायव्हर्सने राईड कॅन्सल केली तर अशी करा तक्रार

जागो ग्राहक जागो! Ola-Uber ड्रायव्हर्सने राईड कॅन्सल केली तर अशी करा तक्रार

ओला (Ola) आणि उबर (Uber) ड्रायव्हर्सकडून अनेकदा राईड कॅन्सल (Ride Cancel) करण्याची प्रकरणंही समोर आली आहेत. अशात ग्राहकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. जर तुम्हालाही अशी समस्या आली असल्यास, याबाबत तक्रार करू शकता.

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 18 जुलै: देशातील मोठं-मोठ्या शहरात आता ओला-उबरने आपली पकड मजबूत केली आहे. देशातील महानगर दिल्ली, मुंबई, कोलकातासह आता अनेक छोट्या शहरांतही ओला आणि उबेरची सुविधा आहे. परंतु ओला (Ola) आणि उबर (Uber) ड्रायव्हर्सकडून अनेकदा राईड कॅन्सल (Ride Cancel) करण्याची प्रकरणंही समोर आली आहेत. ओला आणि उबर ड्रायव्हर्स पिकअप लोकेशन आल्यानंतर स्वत:हून राईड कॅन्सल करतात. राईड कॅन्सल करण्याबाबत कोणतं योग्य कारणही दिलं जात नाही. अशात ग्राहकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. जर तुम्हालाही अशी समस्या आली असल्यास, याबाबत तक्रार करू शकता.

कशी कराल तक्रार -

ओला आणि उबरने प्रवास करणं, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं अधिक सोपं केलं आहे. परंतु राईड्सबाबत अनेक तक्रारी समोर आल्या आहेत. ओला आणि उबरमध्ये प्रवासादरम्यान जर ग्राहकांना काही समस्या आल्यास, ते प्रवासानंतर राईड आणि ड्रायव्हरबाबत रिव्ह्यू देऊ शकतात आणि आपली तक्रार दाखल करू शकतात. रेटिंगसह कमेंट बॉक्समध्येही तक्रार करू शकतात.

तुमच्या आयुष्यातही करा या तीन Emojis चा वापर, खिशाला कधीच नाही लागणार कात्री

राईड संपल्यानंतर काही कारणास्तव तक्रार दाखल करता आली नाही, तर वेबसाईटवर जाऊन तक्रार करू शकता. Ola मध्ये तक्रार करण्यासाठी https://help.olacabs.com/support/home लिंकवर क्लिक करा आणि आपली तक्रार दाखल करा.

त्याशिवाय Uber शी संबंधित तक्रार दाखल करण्यासाठी https://help.uber.com/riders/section/trip-issues-and-refunds?isJobPickerOpen=true&nodeId=595d429d-21e4-4c75-b422-72affa33c5c8 या लिंकवर क्लिक करू शकता.

E-Ticket बुकिंगसाठी IRCTC एजेंट होण्याची संधी, महिन्याला होईल 80000 कमाई

कोणत्या तक्रारी करता येणार?

Ola आणि Uber मध्ये ग्राहक अनेक प्रकारच्या तक्रारी करू शकतात. यात ड्रायव्हर्सकडून कॅन्सल केलेल्या राईड्स, कॅन्सलेशन फीस, भाडं रकमेबाबत तक्रार, ड्रायव्हर्सच्या वागणुकीबाबतची तक्रार, वाहनासंबंधी तक्रार आणि इतर तक्रारी करू शकता.

First published:

Tags: Taxi Driver