मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /तुम्ही घेतलेलं सोनं असली की नकली? सरकारच्या या App द्वारे ओळखा

तुम्ही घेतलेलं सोनं असली की नकली? सरकारच्या या App द्वारे ओळखा

देशभरात सरकारने गोल्ड हॉलमार्किंग अनिवार्य केलं आहे. 15 जून 2021 पासून विना हॉलमार्कचे सोन्याचे दागिने विक्री होण्याची तक्रार झाल्यास, दागिने बनवणाऱ्या व्यापाऱ्यांना बीआयएस कायद्यातील तरतुदींनुसार दंड भरावा लागेल.

नवी दिल्ली, 30 मे : भारतात मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी (Gold) केली जाते. परंतु अनेकदा या सोन्याच्या शुद्धतेवर अनेक प्रश्न उपस्थित केले जातात. सोन्याच्या शुद्धतेबाबत फसवणूक होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. यावर मार्ग काढण्यासाठी सरकारने एक असं सरकारी मोबाईल अ‍ॅप लाँच केलं आहे, ज्याद्वारे सोन्याची शुद्धता तपासली जाऊ शकते.

केंद्रीय ग्राहक आणि अन्न मंत्रालयाकडून (Union Ministry Of Consumer and Food) लाँच करण्यात आलेल्या BIS केअर मोबाईल अ‍ॅपद्वारे माहिती मिळवता येऊ शकते, की तुम्ही ज्या सोन्याची खरेदी केली आहे, ते किती शुद्ध आहे.

त्याशिवाय ग्राहक BIS केअर अ‍ॅपवर भेसळयुक्त सोन्याबाबतही आपली तक्रार दाखल करू शकतात. त्याशिवाय अ‍ॅपवर लायसन्स, रजिस्ट्रेशन आणि हॉलमार्क नंबरबाबतही तक्रार दाखल करता येऊ शकते.

(वाचा - दररोज 160 रुपयांच्या बचतीवर मिळतील 23 लाख रुपये,टॅक्स सूटपासून मिळतील अनेक फायदे)

देशभरात सरकारने गोल्ड हॉलमार्किंग अनिवार्य केलं आहे. 15 जून 2021 पासून विना हॉलमार्कचे सोन्याचे दागिने विक्री होण्याची तक्रार झाल्यास, दागिने बनवणाऱ्या व्यापाऱ्यांना बीआयएस कायद्यातील तरतुदींनुसार दंड भरावा लागेल.

सोन्याच्या दागिन्यांवर बीआयएसची हॉलमार्किंग 14 कॅरेट, 18 कॅरेट, आणि 22 कॅरेट शुद्धतेच्या आधारे केली जाईल. हॉलमार्किंग (Hallmarking) अनिवार्य झाल्यानंतर 15 जूननंतर देशभरातील दागिन्यांच्या बाजारपेठेत केवळ हॉलमार्क असलेले 14, 18 आणि 22 कॅरेट सोन्याचे दागिने विकले जातील. यामुळे ग्राहकांची फसवणूक टळेल. त्यांना शुद्ध सोन्याचे दागिने मिळतील. हॉलमार्किंगमध्ये BIS चं चिन्हं, कॅरेटबाबत माहिती, दागिना केव्हा बनला त्याचं वर्ष, सराफाचं नाव असेल. BIS हॉलमार्किंग आंतरराष्ट्रीय मापकांशी जोडण्यात आलं आहे. यामुळे सोने व्यापारात पारदर्शकता वाढेल.

हॉलमार्किंगमध्ये चार गोष्टी सामिल असतील. ज्यात बीआयएस मार्क, 22 कॅरेट शुद्धता, मूल्यांकन केंद्रांची ओळख आणि दागिन्यांच्या व्यवसायाचे ओळख चिन्ह (Identity Mark) सामिल आहे.

सोन्याच्या शुद्धतेबाबत किंवा खरेदी-विक्री करताना कोणतीही फसवणूक झाल्यास 1 लाखापर्यंत किंवा त्या दागिन्याच्या किंमतीच्या पाचपट दंड आकारला जाऊ शकतो. शिवाय 1 वर्षाचा तुरुंगवास देखील होऊ शकतो.

First published:

Tags: Gold, Gold prices today