नवी दिल्ली, 22 नोव्हेंबर: अॅपल आयफोन (Apple iPhone) हा संपूर्ण जगासह (World) भारतातदेखील खूप लोकप्रिय (very popular) आहे. आयफोनचं डिझाईन युजर्सच्या सुरक्षिततेचा ( safety ) विचार करून तयार केलं आहे. हा फोन विविध वैशिष्ट्यांसह आणि सुविधांसह येतो. ज्या सुविधा सहसा इतर फोनमध्ये आढळत नाहीत. प्रीमियम फोनच्या यादीत सर्वात वर असणारा आयफोन खरेदी करण्याची तुमची देखील इच्छा असेलच. पण आयफोन खरेदी करताना आयफोनच्या नावाखाली बनावट फोन ( fake phone ) देऊन तुमची फसवणूक होणार नाही यासाठी काळजी घेण्याची गरज आहे. त्यासाठीच आज आम्ही तुम्हाला अशाच काही टिप्स सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही बनावट किंवा खरा आयफोन सहज ओळखू शकता. टीव्ही 9 हिंदी ने याबाबत वृत्त दिले आहे.
एखाद्याकडे आयफोन असणं ही एक मोठी गोष्ट आहे. प्रत्येकाला आयफोन हवा असतो. पण तुम्ही ज्या दुकानातून आयफोन विकत घेत आहात, तिथे तुम्हाला खराच आयफोन दिला जाईल, असे नाही. तुम्ही जर अॅपल स्टोअरमधून फोन घेत नसाल, तर अशावेळी तुम्ही खरेदी करीत असलेला फोन बनावट आहे किंवा नाही, हे तपासणे केव्हाही चांगले.
हेही वाचा- नवा फोन घ्यायचाय? दमदार बॅटरी आणि फास्ट चार्जिंग सपोर्टसह कमी बजेटमध्ये मिळतायेत 'हे' Smartphone
- इंटरनॅशनल मोबाईल इक्विपमेंट आयडेंटिटी (IMEI) हा प्रत्येक फोनसोबत येणारा 15-अंकी क्रमांक आहे. प्रत्येक फोनचा आयएमईआय (IMEI) नंबर वेगळा असतो. हे फोनच्या फिंगरप्रिंट सारखे आहे. चोरीला गेलेला फोन ट्रॅक करण्यास देखील आयएमईआय नंबरची मदत होते.
- फोन खरेदी केल्यानंतर बॉक्सवर आयएमईआय नंबर पहा. त्यानंतर तुम्ही अधिकृत वेबसाइटला भेट द्या, आणि https://checkcoverage.apple.com/in/en येथे आयएमईआय नंबर टाकून तुम्ही खरेदी केलेला फोन हा अॅपल आयफोन आहे किंवा नाही, याची खात्री करा. तुमचा फोन बनावट असल्यास वेबसाइट तुम्हाला लगेच सूचित करते.
हेही वाचा- काही मिनिटात चार्ज होणार Realme चा हा स्मार्टफोन; लवकरच होणार लॉन्च, जाणून घ्या फीचर्स
- एक खास फीचर हे केवळ अॅपल फोनमध्येच असते, ते म्हणजे पेंटालोब स्क्रू. या फीचर्सवरून सुद्धा तुम्ही आयफोन बनावट तर नाही ना, याची खात्री करू शकता.
- फोन चार्ज करण्याचा प्रयत्न करा, जर चार्जर एकाच वेळी कनेक्ट होत नसेल तर तुमचा आयफोन नक्कीच बनावट आहे.
- आयफोन सुरू केल्यानंतर तुम्हाला तो सुरुवातीच्या सेटअप स्टेप्समधून घेऊन जाईल, परंतु तुमचा फोन तुम्हाला तुमच्या गुगल अकाउंट सह चेक इन करण्यास सांगत असल्यास, तो बनावट आहे.
हेही वाचा- WiFi चा स्पीड स्लो झालाय? या ट्रिक्सने करा Boost, नेट होईल सुपरफास्ट
- बनावट आयफोन असल्यास, सिरीऐवजी व्हॉईस असिस्टंट देखील गुगल कडून असेल.
आयफोन खरेदी करताना तुम्ही मोठी रक्कम खर्च करत असता. पण तुम्ही खरेदी केलेला आयफोन खरा आहे की खोटा हे तपासणं गरजेचं आहे. अन्यथा तुम्हाला मोठं नुकसान होऊ शकतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.