जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / Aadhaar Cardला लिंक केलेला मोबाईल नंबर कसा बदलायचा? फॉलो करा ‘या’ सोप्या स्टेप्स

Aadhaar Cardला लिंक केलेला मोबाईल नंबर कसा बदलायचा? फॉलो करा ‘या’ सोप्या स्टेप्स

Aadhaar Cardला लिंक केलेला मोबाईल नंबर कसा बदलायचा? फॉलो करा ‘या’ सोप्या स्टेप्स

Aadhaar Cardला लिंक केलेला मोबाईल नंबर कसा बदलायचा? फॉलो करा ‘या’ सोप्या स्टेप्स

Change Mobile Number in Aadhaar Card: आधार कार्डसोबत मोबाईल क्रमांकही लिंक केला जातो. पण जर तुम्हाला आधार कार्डशी लिंक केलेला मोबाईल नंबर काही कारणास्तव बदलायचा असेल तर तो कसा बदलायचा याविषयी आज आपण माहिती घेणार आहोत.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 9 जुलै: आधार कार्ड (Aadhaar Card) अत्यंत महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक मानलं जातं. अलीकडच्या काळात आधार कार्डची गरज खूप वाढली आहे. अगदी साध्या कामांपासून ते अगदी अति महत्त्वाच्या कामापर्यंत सर्वच ठिकाणी आधार कार्डची गरज भासते. जवळजवळ प्रत्येक कामासाठी ते जवळ असणं महत्वाचं आहे. तुम्हाला सरकारी सुविधांचा लाभ घ्यायचा असेल, बँकेत खातं उघडायचं असेल, रेशनकार्ड काढायचं असेल, ड्रायव्हिंग लायसन्स काढायचं असेल तर अशा अनेक कामांसाठी आधार कार्ड आवश्यक आहे. आधार कार्डमध्ये तुमची महत्त्वाची माहिती असते, जसं की तुमचं नाव, जन्मतारीख आणि बायोमेट्रिक माहिती. याशिवाय आधार कार्डसोबत मोबाईल क्रमांकही लिंक (Mobile number linked to Aadhar card) केला जातो. हा नोंदणीकृत क्रमांक अनेक ठिकाणी महत्त्वाचा असतो. यावर येणारा ओटीपी अनेक कामांसाठी आवश्यक असतो. पण जर तुम्हाला आधार कार्डशी लिंक केलेला मोबाईल नंबर काही कारणास्तव बदलायचा असेल तर तो कसा बदलायचा याविषयी आज आपण माहिती घेणार आहोत. चला जाणून घेऊया साधी सोपी प्रोसेस तुम्ही ही प्रक्रिया फॉलो करू शकता (How to Change Mobile Number in Aadhaar Card?):- स्टेप  1- तुम्हालाही तुमच्या आधार कार्डशी लिंक केलेला मोबाईल नंबर कोणत्याही कारणास्तव बदलायचा असेल, तर सर्वप्रथम तुम्हाला UIDAI च्या अधिकृत वेबसाइट https://uidai.gov.in/ ला भेट द्यावी लागेल. मग येथून तुम्हाला अपॉइंटमेंट घेऊन आधार सेवा केंद्राला भेट द्यावी लागेल. तथापि, आपण थेट सेवा केंद्रास देखील भेट देऊ शकता. हेही वाचा:  Whatsapp Status : व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसला ठेवा शक्तीची देवता श्री हनुमानाचे सुंदर फोटो; मन होईल प्रसन्न स्टेप 2- तुम्ही जर आधार सेवा केंद्रावर पोहोचला असाल, तर येथे जाऊन तुम्हाला मोबाईल नंबर अपडेट फॉर्म म्हणजेच आधार करेक्शन फॉर्म घ्यावा लागेल. स्टेप 3 - आधार करेक्शन फॉर्म भरा आणि त्यावर तुमचं पूर्ण नाव, आधार क्रमांक आणि नवीन मोबाईल नंबर टाका, जो तुम्हाला तुमच्या आधार कार्डशी लिंक करायचा आहे. स्टेप 4 - यानंतर, तुम्हाला हा फॉर्म आधार सेवा केंद्रावर उपस्थित असलेल्या अधिकाऱ्याला द्यावा लागेल आणि ते तुमची बायोमेट्रिक माहिती तपासतील आणि नंतर तुमचा मोबाइल नंबर अपडेट करतील.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात