मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Paytm वर बुक करा ट्रेन तिकीट, PNR स्टेटसही चेक करता येणार, जाणून घ्या सोपी प्रोसेस

Paytm वर बुक करा ट्रेन तिकीट, PNR स्टेटसही चेक करता येणार, जाणून घ्या सोपी प्रोसेस

पेटीएमद्वारे तुम्ही ट्रेन तिकीटही बुक करू शकता. Paytm वर ट्रेन तिकीट बुक करण्याशिवाय ट्रेन शेड्युल आणि PNR स्टेटसची माहितीही घेता येते.

पेटीएमद्वारे तुम्ही ट्रेन तिकीटही बुक करू शकता. Paytm वर ट्रेन तिकीट बुक करण्याशिवाय ट्रेन शेड्युल आणि PNR स्टेटसची माहितीही घेता येते.

पेटीएमद्वारे तुम्ही ट्रेन तिकीटही बुक करू शकता. Paytm वर ट्रेन तिकीट बुक करण्याशिवाय ट्रेन शेड्युल आणि PNR स्टेटसची माहितीही घेता येते.

नवी दिल्ली, 30 सप्टेंबर : लाखो लोक भारतात Paytm चा वापर करतात. Paytm चा वापर केवळ पैसे पाठवण्यासाठीच नाही, तर इतर गोष्टींसाठीही करता येतो. पेटीएमद्वारे तुम्ही ट्रेन तिकीटही बुक करू शकता. Paytm वर ट्रेन तिकीट बुक करण्याशिवाय ट्रेन शेड्युल आणि PNR स्टेटसची माहितीही जाणून घेता येते. Paytm वरुन ट्रेन तिकीट सोप्या पद्धतीने बुक करता येतं.

सावधान! हे एक App डाउनलोड केल्यानं रिटायर्ड ऑफिसरला लागला 4 लाखांचा गंडा

Paytm वर कसं बुक कराल तिकीट?

- सर्वात आधी Paytm Account वर मोबाईल नंबरद्वारे लॉगइन करा. मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुमच्या फोनवप एक OTP येईल. OTP वेरिफाय झाल्यानंतर तुमचं Paytm Account मध्ये Login होईल.

- लॉगइन झाल्यानंतर Paytm च्या होम पेजवर तिकीट बुकिंगचा ऑप्शन दिसेल. इथे Train Ticket ऑप्शन सिलेक्ट करावा लागेल. त्यानंतर Book Tickets वर जा.

- या सेक्शनमध्ये सोर्स स्टेशन अर्थात जिथे प्रवास करायचा आहे, त्या स्टेशनचं नाव टाकावं लागेल. डेस्टिनेशन स्टेशनचं नाव दिल्यानंतर प्रवासाची तारीख सिलेक्ट करा. तुम्ही ट्रेनच्या लिस्टमध्ये ट्रेन सिलेक्ट करुन सीट उपलब्धता चेक करू शकता.

तिकीट बुक करण्यासाठी IRCTC लॉगइन आयडी द्यावा लागेल. जर तुमच्याकडे IRCTC Login ID नसेल, तर तुम्ही तो स्वत: तयार करू शकता. त्यानंतर ट्रेन बुक करण्यासाठी Proceed to Payment ऑप्शनवर जावं लागेल. इथे पेमेंट करण्यासाठी क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा नेट बँकिंग सिलेक्ट करुन पेमेंट करावं लागेल.

- त्यानंतर तुम्हाला IRCTC Website वर रिडायरेक्ट केलं जाईल. इथे लॉगइन-पासवर्ड टाका. पासवर्ड टाकल्यानंतर तिकीट बुक होईल. Paytm वरुन ते डाउनलोड करता येईल. इथे PNR Status चेक करू शकता.

First published:

Tags: Paytm, Train