मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /जीमेल अकाउंटवर तुमची सही कशी जोडायची?, जाणून घ्या सोपा मार्ग

जीमेल अकाउंटवर तुमची सही कशी जोडायची?, जाणून घ्या सोपा मार्ग

टेक्नोलॉगी

टेक्नोलॉगी

पल्यापैकी बहुतेकांना Gmail ची फीचर्स माहीत असतील. ई-मेल म्हणजे काय आणि त्याचा वापर कसा होतो, हे आपल्याला शाळेतच शिकवलं जातं. मोठं झाल्यानंतर आपण अनेक ठिकाणी ई-मेलचा वापर करतो.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

    नवी दिल्ली, 25 ऑक्टोबर: आपल्यापैकी बहुतेकांना Gmail ची फीचर्स माहीत असतील. ई-मेल म्हणजे काय आणि त्याचा वापर कसा होतो, हे आपल्याला शाळेतच शिकवलं जातं. मोठं झाल्यानंतर आपण अनेक ठिकाणी ई-मेलचा वापर करतो. प्रोफेशनल लाइफबद्दल बोलायचं झाल्यास, काही व्यक्तींना दिवसभरात शेकडो ई-मेल्स पाठवावे लागतात. प्रत्येक ई-मेलच्या शेवटी आपलं नाव, पद, मोबाइल नंबर किंवा आवश्यकतेनुसार संपर्काची अन्य माहिती लिहावी लागते. त्याला सिग्नेचर असं म्हणतात. ही सिग्नेचर प्रत्येक ई-मेल लिहिताना लिहिण्याची गरज नसते. प्रत्येक ई-मेलमध्ये ती आपोआप यावी याचं सेटिंग केल्यास बराच वेळ वाचतो आणि चुकून एखाद्या ई-मेलखाली नाव लिहायचंच राहिलं असं होत नाही. सर्व ई-मेल अॅप्लिकेशन्सवर तुम्ही सिग्नेचर सहजपणे अपडेट करू शकता. Gmail वर सिग्नेचर कशी अपडेट करता येते, याबाबत इथे माहिती दिली आहे.

    अँड्रॉइडवरून सिग्नेचर कशी अ‍ॅड करावी

    अँड्रॉइड डिव्हाइसवरून ई-मेलमध्ये तुमची सिग्नेचर अ‍ॅड करण्यासाठी सर्वांत अगोदर जीमेल अ‍ॅप उघडा. वरच्या कोपऱ्यात डावीकडे असलेल्या मेन्यूवर टॅप करा. मेन्यूबार खाली स्क्रोल करा आणि नंतर सेटिंग्जवर टॅप करा. यानंतर तुम्हाला ज्या गुगल अकाउंटशी सिग्नेचर अ‍ॅड करायची आहे ते अकाउंट निवडा. नंतर मोबाइल सिग्नेचर ऑप्शनवर टॅप करा आणि तिथं तुमच्या सिग्नेचरचा मजकूर लिहा. शेवटी ओके ऑप्शन वर टॅप करा.

    हेही वाचा - यंदाच्या भाऊबीजेला भावाला भेट द्या ‘ही’ स्पेशल गॅझेट्स

    कॉम्प्युटरवर सिग्नेचर कशी अ‍ॅड करावी

    कॉम्प्युटरवरून ई-मेलमध्ये तुमची सिग्नेचर अ‍ॅड करण्यासाठी अगोदर Gmail उघडा. नंतर सर्वांत वर उजवीकडे असलेल्या सेटिंग्ज ऑप्शनवर क्लिक करा आणि नंतर सर्व सेटिंग्ज बघा. तिथे 'सिग्नेचर सेक्शन'मध्ये जाऊन बॉक्समध्ये तुमची सिग्नेचर अ‍ॅड करा. तुम्ही इमेज किंवा टेक्स्ट स्टाइल बदलूनही तुमचा मेसेज तयार करू शकता. त्यानंतर पेजच्या तळाशी असलेल्या Save Changes ऑप्शनवर क्लिक करा.

    iPhone किंवा iPadवर सिग्नेचर कशी अ‍ॅड करावी

    तुम्ही iPhone आणि iPad वरूनदेखील जीमेल सिग्नेचर अ‍ॅड करू शकता. यासाठी सर्वांत अगोदर तुमच्या iPhone किंवा iPad वर जीमेल अ‍ॅप उघडा. तिथे मेन्यूवर टॅप करून खाली स्क्रोल करा. नंतर सेटिंग्जवर टॅप करून जीमेल अकाउंटवर टॅप करा. आता सिग्नेचर सेटिंग्जवर टॅप करून 'मोबाइल सिग्नेचर' सेटिंग्ज सुरू करा. यानंतर तुमची मोबाइल सिग्नेचर अ‍ॅड किंवा एडिट करा. शेवटी सेव्ह करण्यासाठी बॅकवर टॅप करा.

    तुमची ई-मेल सिग्नेचर तुमच्या ई-मेलला अधिक विश्वासार्ह बनवते. जीमेल अकाउंटवर सिग्नेचर अ‍ॅड करणं अतिशय सोपं आहे. वर दिलेल्या सूचनांचं व्यवस्थित पालन करून तुम्ही सहज तुमच्या जीमेलच्या अकाउंटमध्ये सिग्नेचर अ‍ॅड करू शकता.

    First published:
    top videos

      Tags: Gmail, Tech news, Technology