मिस्ड ग्रुप कॉलपासून,आपोआप फोटो गायब होण्यापर्यंत WhatsApp वर येणार हे 5 नवे भन्नाट फीचर्स

मिस्ड ग्रुप कॉलपासून,आपोआप फोटो गायब होण्यापर्यंत WhatsApp वर येणार हे 5 नवे भन्नाट फीचर्स

मल्टी डिव्हाईस सपोर्ट, डिसअपियरिंग फोटो (WhatsApp Disappearing Photos), रीड लेटर (WhatsApp Read Later) सारख्या फीचर्स शिवाय व्हॉट्सॲप नव्या काही फीचर्सचं टेस्टींग करत आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 3 मे : व्हॉट्सॲप (WhatsApp)हे जगभरात सर्वाधिक वापरलं जाणारं, इन्स्टंट मेसेजिंग ॲप आहे. या ॲपला अब्जावधी युजर्सने पसंती दर्शवली आहे. दैनंदिन जीवनात व्हॉट्सॲप हा एक महत्वाचा घटक बनला आहे. फेसबुकने व्हॉट्सॲप खरेदी केल्यानंतर त्यात अनेक बदल झाले आहेत. व्हॉट्सॲप सातत्याने युजर्ससाठी नवनवीन फीचर्स (Features) आणत आहे. मल्टी डिव्हाईस सपोर्ट, डिसअपियरिंग फोटो (WhatsApp Disappearing Photos), रीड लेटर (WhatsApp Read Later) सारख्या फीचर्स शिवाय व्हॉट्सॲप नव्या काही फीचर्सचं टेस्टींग करत आहे.

मेसेज अर्काइव्ह करणं -

व्हॉट्सॲपच्या या नव्या फीचरमध्ये युजर्सला मेसेज अर्काइव्ह (Message Archive) करण्याची सुविधा मिळणार आहे. जर युजरने एखादा मेसेज अर्काइव्ह केला, तर तो मेसेज युजरनंतरही वाचू शकतो. असं केल्याने युजर्सला वारंवार चॅट नोटिफिकेशन येणार नाही.

मल्टी डिव्हाईस सपोर्ट (Multi device Support) -

हे फीचर आल्यानंतर युजर्स व्हॉट्सॲप दुसऱ्या डिव्हाईसवरही लॉगइन करु शकणार आहे. सध्या केवळ एकाच डिव्हाईसवरच व्हॉट्सॲपचा वापर करता येतो, अशा वेळी जर युजर्सला दुसऱ्या डिव्हाईसवर व्हॉट्सॲप वापरायचं असेल, तर पहिल्या डिव्हाईसवरुन तो लॉगआऊट होतो.

फोटोज डिसअपियरिंग आणि व्हॉईस नोट स्पीड -

व्हॉट्सॲपने मेसेज डिसअॅपीयरिंग (Message Disapperaing) हे फीचर यापूर्वीच लाँच केलं आहे. या फीचरमुळे व्हॉट्सॲपवर आलेला मेसेज 7 दिवसांनंतर आपोआप डिलीट होतो. व्हॉट्सॲप आता हेच फिचर फोटोजसाठी सुध्दा देणार आहे. त्यात पाठवलेला फोटो ठराविक काळानंतर आपोआप डिलीट होणार आहे. तसंच व्हॉट्सॲप व्हॉईस नोटचा स्पीड वाढवण्यावर देखील काम करीत आहे. या फीचरमुळे युजर्सला आलेल्या व्हॉईस नोटचा (Voice Note Speed) स्पीड वाढवणं शक्य होणार आहे.

(वाचा - आता तुमच्या जवळचं वॅक्सिनेशन सेंटर शोधण्यासाठी WhatsAppकरणार मदत;अशी आहे प्रोसेस)

व्हॉट्सॲपवर इन्स्टाग्राम रिल्स -

हे फीचर आल्यानंतर युजर्स आपलं इन्स्टाग्राम रिल (Instagram Reel) व्हॉट्सॲपवर पाहू शकणार आहेत. मात्र या फीचरबाबत कंपनीकडून अधिकृत माहिती दिली गेलेली नाही. मात्र मिळालेल्या माहितीनुसार, या फीचरचे टेस्टिंग सुरू असून, लवकरच ते व्हॉट्सॲपला जोडलं जाणार आहे.

(वाचा - WhatsApp वर येणाऱ्या या मेसेजपासून सावध राहा;मिनिटांत खाली होऊ शकतं तुमचं अकाउंट)

मिस्ड ग्रुप कॉलने जॉईन व्हा -

अनेक व्हिडीओ कॉलिंगअप असे आहेत, की ज्यात युजर चालू कॉल्समध्येही जॉईन होऊ शकतो. परंतु हे फीचर अद्याप व्हॉट्सॲपमध्ये आलेलं नाही. हे फीचर आल्यानंतर व्हॉट्सॲप युजर्स चालू ग्रुप कॉल्स (Group Call) मध्ये स्वतःच कनेक्ट होऊ शकणार आहेत.

First published: May 3, 2021, 7:01 PM IST

ताज्या बातम्या