मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

तुमच्या Computer वर या Virus ची नजर, केंद्र सरकारकडून अलर्ट जारी; या गोष्टी लक्षात ठेवाच

तुमच्या Computer वर या Virus ची नजर, केंद्र सरकारकडून अलर्ट जारी; या गोष्टी लक्षात ठेवाच

धोकादायक वायरसबाबत भारत सरकारने अलर्ट जारी केला आहे. ईमेलद्वारे हा Malware कॉम्प्युटरमध्ये पोहोचवतात आणि त्यानंतर पुढे धमकी, फसवणुकीचे प्रकार सुरू होतात.

  नवी दिल्ली, 25 डिसेंबर : जर तुम्ही कॉम्प्युटरवर अधिक वेळ काम करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. मागील काही दिवसांपासून Diavol PC नावाचा एक वायरस देशात सक्रिय झाला आहे. या धोकादायक वायरसबाबत भारत सरकारने अलर्ट जारी केला आहे. ईमेलद्वारे हा Malware कॉम्प्युटरमध्ये पोहोचवतात आणि त्यानंतर पुढे धमकी, फसवणुकीचे प्रकार सुरू होतात. पैसे न मिळाल्यास हॅकर्स तुमच्या डेटाचं नुकसान करतात, असं या अलर्टमध्ये सांगण्यात आलं आहे.

  तुमच्याकडचं सोनं खरं की खोटं? जाणून घ्या या App द्वारे Gold ची गुणवत्ता

  काय आहे Diavol Virus? सरकारी एजेन्सी इंडिया कॉम्प्युटर इमेरजेन्सी रिस्पॉन्स टीम CERT-In कडून याबाबत अलर्ट करण्यात आलं आहे. हा वायरस विंडो कॉम्प्युटरला निशाणा करत आहे. हा वायरस कॉम्प्युटरमध्ये गेल्यानंतर संपूर्ण सिस्टमचा कंट्रोल हॅकर्सकडे जातो. कंट्रोल मिळाल्यानंतर हॅकर्स कॉम्प्युटर लॉक करतात. त्यानंतर अनलॉक करण्याच्या नावाखाली पैशांची मागणी करतात. हॅकर्स ईमेलद्वारे कॉम्प्युटर हॅक करण्याचा प्रयत्न करतात. ईमेलमध्ये हॅकर्स OneDrive ची लिंक देतात. ही लिंक एक Zip फाइल डाउनलोड करण्यासाठी दुसऱ्या पेजवर घेऊन जाते. या पेजवर ISO फाइलमध्ये LNK आणि DLL फाइल असतात. या फाइल ओपन झाल्यानंतर सिस्टममध्ये Malware अटॅक होतो.

  एक देश एक आपत्कालीन नंबर, मोबाइल नेटवर्कशिवायही या नंबरवर कॉल करून मिळेल मदत

  Ransomeware हा वायरस असून हॅकर्स हा वायरस अशाप्रकारे बनवतात, की यामुळे कॉम्प्युटरमधील सर्व फाइल्स एन्क्रिप्ट होतात. त्यामुळे युजर्स फाइल्सचा वापर करू शकत नाही. हे हटवण्यासाठी हॅकर्स पैशांची मागणी करतात. त्यामुळे सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे. - कोणत्याही अनोळखी ईमेलवर आलेल्या लिंक ओपन करू नका. अनोळखी Email ID वरुन येणारे मेल ओपन करू नका. - अशा मेलमध्ये दिलेल्या अटॅचमेंट्स डाउनलोड करू नका. - आवश्यक नसल्यास ईमेल आयडी प्रत्येक ठिकाणी किंवा पब्लिक वेबसाइट्सवर शेअर करू नका. - कॉम्प्युटरमध्ये चांगला अँटी-वायरस ठेवा आणि वेळोवेळी तो स्कॅनही करा, जेणेकरुन सिस्टममध्ये वायरस नसल्याची खात्री करता येईल.
  Published by:Karishma
  First published:

  पुढील बातम्या