Home /News /technology /

तुमच्याकडचं सोनं खरं की खोटं? जाणून घ्या या App द्वारे Gold ची गुणवत्ता

तुमच्याकडचं सोनं खरं की खोटं? जाणून घ्या या App द्वारे Gold ची गुणवत्ता

भारतीय मानक ब्युरोने (BIS) ग्राहकांसाठी असं App तयार केलं आहे, जे तुम्हाला गोल्ड ज्वेलरीवरील हॉलमार्किंग किती योग्य-खरं आहे याबाबत माहिती देईल.

  नवी दिल्ली, 25 डिसेंबर : लग्नसराईचा सीजन सुरू आहे. तुम्हीही सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल, किंवा तुम्ही विकत घेत असलेलं सोनं किती शुद्ध आहे याबाबत काही शंका असल्यास टेन्शन घेण्याची गरज नाही. भारतीय मानक ब्युरोने (BIS) ग्राहकांसाठी असं App तयार केलं आहे, जे तुम्हाला गोल्ड ज्वेलरीवरील हॉलमार्किंग किती योग्य-खरं आहे याबाबत माहिती देईल. ग्राहकांसाठी असलेली गुणवत्ता तपासणी संस्था Bureau of Indian Standards ने BIS Care App नावाचं एक App तयार केलं आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही सहजपणे हॉलमार्किंग किंवा ISI मार्क तपासू शकता. त्याशिवाय सामानाच्या क्वालिटीबाबत शंका असल्यास, याबाबतही तक्रार करता येईल.

  Google Chrome ची Online Shoppingसाठी मदत; सर्वात आधी देणार स्वस्त वस्तूची माहिती

  BIS Care App ने याबाबत ट्विट करुन माहिती दिली आहे. BIS Care App द्वारे कोणत्याही हॉलमार्किंग ज्वेलरीची शुद्धता तपासता येते. त्यासाठी तुमच्या दागिन्यांची HUID नंबर तपासणी 'verify HUID' द्वारे करता येईल. तसंच ISI मार्कद्वारे त्याच्या शुद्धतेचीही तपासणी करू शकता.

  सावधान! पुढे धोका आहे! Driving करताना हे Mobile app तुम्हाला करेल Alert

  ग्राहक एखाद्या इलेक्ट्रॉनिक वस्तूची चाचणी करण्यासाठी R-Number 'verify R-number under CRS' ने तपासणी करू शकतात. कोणत्याही भारतीय मानक, लायसन्स लॅबच्या माहितीसाठी ग्राहकांना 'know your standards' मध्ये जावं लागेल. इथे करता येईल तक्रार - ग्राहकांना चांगल्या दर्जाच्या वस्तू मिळतील याची खात्री करणं हा BIS चा उद्देश आहे. यासाठी वेळोवेळी अनेक प्रयत्न केले जात आहेत. जर ग्राहकांना कोणत्याही वस्तूच्या क्वालिटीमध्ये किंवा ISI मार्कच्या चुकीच्या वापराची शंका आल्यास ग्राहक BIS Care App मध्ये याबाबत तक्रार करू शकतात.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Apps, Gold and silver

  पुढील बातम्या