दिवसभर कधी, कुठं फिरता याची गुगलकडे माहिती, तुम्हीच बघा!

दिवसभर कधी, कुठं फिरता याची गुगलकडे माहिती, तुम्हीच बघा!

गुगल तुमच्या दिवसभराच्या अपडेट सेव्ह करत आहे. फक्त एकाच दिवसाचे नाही तर जेव्हापासून फिचर सुरु केलं आहे तेव्हापासून तुम्ही कधी, कुठं फिरलात याची माहिती गुगलकडे आहे.

  • Share this:

मुंबई, 01 सप्टेंबर : स्मार्टफोन हातात आल्यानंतर अनेक कामं सोपी झाली. ऑनलाइन माहिती सर्च करण्यापासून ते खरेदीपर्यंत अनेक गोष्टी करता येतात. यामध्ये युजर्सची माहिती संबंधित साइटकडून घेतली जाते. आपण अनेक अॅप्लिकेशन वापरत असतो. त्यावर जी माहिती आपल्याकडून दिली जाते ती संबंधित अॅपची कंपनी वापरत असते. गुगल आणि फेसबुक या माहितीच्या आधारे जाहिरातीतून पैसे कमावते. पण तुम्हाला कल्पनाही नसेल की गुगल तुम्ही कधी, कुठे, किती वाजता गेला होता याची माहितीही साठवून ठेवते.

फेसबुक किंवा गुगलवर अनेकदा आपल्याला नोटिफीकेशन येतं. यामध्ये जवळच्या चित्रपटगृह, पेट्रोल पंप, एटीएम किंवा एखाद्या बँकेबद्दल काहीतरी विचारलं जातं. फेसबुकवर तर चेक इन करून मिरवत सर्वांना सांगतो की या ठिकाणी आहे. गुगलने यापुढे जाऊन तुम्ही जिथं भेट दिली किंवा थांबलात तिथं कसा अनुभव आला याची माहिती घ्यायला सुरुवात केली. स्मार्टफोन वापरणाऱ्याला याबद्दल प्रश्न विचारला जातो. या माहितीच्या आधारे गुगल त्या ठिकाणाचे रेटिंग ठरवते.

तुम्ही ज्या ठिकाणी भेट देता ती सर्व माहिती गुगल साठवते. त्याचा एक मॅपही आहे. प्रत्येक अपडेट ठिकाणाचे नाव आणि वेळेसह गुगलकडे सेव्ह होते. ही माहिती तुम्हालाही चेक करता येते. यासाठी तुमच्या मोबाईलवरून किंवा कॉम्प्युटरवरून जीमेल लॉगइन करावं लागेल. त्यावर तुम्ही वर्ष, महिना, तारीख टाकून त्या दिवसभरात कुठे गेला होतात याची माहिती मिळेल.

तुम्हीसुद्धा कुठे गेला होतात याची माहिती गुगलने घेतली आहे का हे चेक करू शकता. यासाठी पुढे दिलेल्या लिंकवर क्लिक करा. चेक करा गुगल टाइमलाइन

गुगलकडून ही माहिती तेव्हा घेतली जाते जेव्हा तुमचं जीपीएस लोकेशन ऑन असतं. एखादं ठिकाण सर्च करताना किंवा माहिती सर्च करताना सर्व अपडेट गुगलला जातात. जीपीएस ऑफ असेल तर ही माहिती गुगलला मिळत नाही. लोकेशन हिस्ट्री बंद करूनही गुगलला जाणारी माहिती थांबवता येईल. पण तरीही आपण मॅप सुरू केला तर पुन्हा अपडेट मिळत जातात.

गणेशोत्सवात भारताबाहेर असलेल्या सर्वात मोठ्या हिंदू मंदिराचा देखावा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 1, 2019 01:45 PM IST

ताज्या बातम्या