Home /News /news /

माणुसकी मेली! कोरोना रुग्णाचा मृतदेह जेसीबीमध्ये फेकला, मन हेलावणारा VIDEO आला समोर

माणुसकी मेली! कोरोना रुग्णाचा मृतदेह जेसीबीमध्ये फेकला, मन हेलावणारा VIDEO आला समोर

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या एका व्यक्तीला चक्क जेसीबी मशीनने स्मशानात नेल्याचं समोर आलं आहे.

    हैदराबाद, 27 जून : देशात सध्या कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. रोज वाढणाऱ्या रुग्णांच्या आकड्यांमुळे नागरिकांमध्येही भीतीचं वातावरण आहे. खरंतर कोरोनाच्या या कठीण काळात माणुसकीची परीक्षा आहे असं म्हणायला हकरत नाही. याच माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे. कोरोनाने मृत्यू झाल्यानंतर मृतदेहाच्या अंत्यसंस्कारासाठी काही वेगळी नियमावली तयार करण्यात आली आहे. पण कोरोनामुळे मृत्यू झालेल्या एका व्यक्तीला चक्क जेसीबी मशीनने स्मशानात नेल्याचं समोर आलं आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीला जेसीबीमधून घेऊन जाण्यात येत आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. ही घटना आंध्र प्रदेशमध्ये समोर आली आहे. असं काय आहे या व्हिडिमओध्ये? न्यूज एजेंसी IANSच्या म्हणण्यानुसार, ही घटना उदयापुरम परिसरातली आहे. जिथे एका 72 वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यानंतर PPE किट घातलेल्या पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी मृतदेहाला प्लास्टिकमध्ये गुंडाळलं आणि जेसीबी मशीनमध्ये टाकलं. त्यानंतर सगळ्यात धक्कादायक म्हणजे हा जेसीबी थेट स्मशानात न जाता तो आधी एका काम सुरू असलेल्या ठिकाणी मातीचे ढिगारे उचलण्यासाठी गेला आणि त्यानंतर स्मशानात. चौकशीचा आदेश मिळालेल्या माहितीनुसार, ज्या व्यक्तीचा हा मृतदेब होता त्या वडिलांनी स्वत: महानगरपालिकेत काम केले. तो घरीच मरण पावला. जेव्हा शेजार्यांनी दबाव आणला, तेव्हा मृतदेह काढण्यासाठी महामंडळाला बोलविण्यात आले. या निर्लज्ज घटनेनंतर सध्या डीएम जे निवास यांनी पालिका आयुक्त सी नागेंद्र कुमार यांना निलंबित केले आहे. याशिवाय तेथील सॅनिटरी इन्स्पेक्टर यांनाही हटविण्यात आले आहे. चौकशीचे आदेशही देण्यात आले आहेत. संकलन, संपादन - रेणुका धायबर
    First published:

    Tags: Coronavirus, Coronavirus in india, Coronavirus update

    पुढील बातम्या