मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Google Maps ने दाखवला नरकात जाणारा रस्ता, आणि व्यक्तीने शोधून काढलं 'नरकाचं दार'!

Google Maps ने दाखवला नरकात जाणारा रस्ता, आणि व्यक्तीने शोधून काढलं 'नरकाचं दार'!

 शोधलं की स्वर्गही मिळतो असं म्हणतात; मात्र रेडिट या सोशल मीडिया साइटवर (Reddit entrance to hell) एकाने ‘नरकाचं द्वार’ मिळाल्याचा दावा केला आहे

शोधलं की स्वर्गही मिळतो असं म्हणतात; मात्र रेडिट या सोशल मीडिया साइटवर (Reddit entrance to hell) एकाने ‘नरकाचं द्वार’ मिळाल्याचा दावा केला आहे

शोधलं की स्वर्गही मिळतो असं म्हणतात; मात्र रेडिट या सोशल मीडिया साइटवर (Reddit entrance to hell) एकाने ‘नरकाचं द्वार’ मिळाल्याचा दावा केला आहे

  नवी दिल्ली, 30 सप्टेंबर : शोधलं की स्वर्गही मिळतो असं म्हणतात; मात्र रेडिट या सोशल मीडिया साइटवर (Reddit entrance to hell) एकाने ‘नरकाचं द्वार’ मिळाल्याचा दावा केला आहे. विशेष म्हणजे, त्याने कोणत्या जुन्या नकाशाने नाही, तर चक्क आपण सर्व वापरत असलेल्या गुगल मॅप्सची (Google Maps Entrance to Hell) मदत घेऊन हा शोध लावला आहे. गुगल मॅप्सच्या मदतीने लोकांनी आतापर्यंत एलियन आणि यूएफओ (Alien and UFO) सापडल्याचा दावा केला होता. आता या व्यक्तीने एक रहस्यमयी असा दरवाजा मिळाल्याचं म्हटलं आहे.

  रेडिटवर अपलोड झाल्यानंतर या दरवाजाचा फोटो (Entrance to Hell) मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे. हा दरवाजा कुठे आहे, कशाचा आहे यासोबतच इतर माहिती गोळा करण्यास जगभरातल्या लोकांनी सुरुवात केली आहे. ‘एन्ट्रन्स टू....’ अशा कॅप्शनसह (Reddit Entrance to) हा फोटो रेडिटवर अपलोड करण्यात आला आहे. म्हणजेच, अपलोड करणाऱ्याने हे प्रवेशद्वार आहे असं म्हटलं आहे; मात्र कशाचं प्रवेशद्वार आहे हे त्याने स्पष्ट केलेलं नाही.

  सोशल मीडियावर लोक या दरवाजाबाबत अनेक तर्क-वितर्क लावताना दिसून येत आहेत. एका व्यक्तीने याला ग्रीक मायथॉलॉजीमधला (Greek Mythology entrance to hell) एक दरवाजा असल्याचं म्हटलं आहे. एकाने हा दरवाजा तुर्कीमध्ये (Turky Entrance to hell) असल्याचं म्हटलं आहे. तुर्कीच्या डेरेकोय शहरात हा दरवाजा पाहिल्याचा दावा या व्यक्तीने केला आहे. एका व्यक्तीने तर हा दरवाजा म्हणजे नरकाचं द्वार असल्याचा दावा केला आहे. अर्थात, याबाबत पक्की माहिती कोणालाच नाही. कित्येकांनी हे एखाद्या स्मशानभूमीचं प्रवेशद्वार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

  हे ही वाचा-Paytm वर बुक करा ट्रेन तिकीट, PNRस्टेटसही चेक करता येणार,जाणून घ्या सोपी प्रोसेस

  एकूणच रेडिटर्स आणि इतर सोशल मीडिया यूझर्स हा पाताळाचा किंवा नरकाचा दरवाजा (Door of Hell Turky) असल्याचा दावा करत आहेत. हा दावा केवळ मनोरंजनासाठी आहे, की खरोखरच या लोकांकडे याबाबत काही पुरावे आहेत, हे कळण्यास मार्ग नाही.

  गुगल मॅप्सच्या मदतीने अशा प्रकारचे बरेच शोध यापूर्वीही लागले आहेत. काही दिवसांपूर्वीच एका यूझरने मॅप्सच्या मदतीने एका रहस्यमयी न्यूक आयलँडचा (Mysterious Nuke Island) शोध लावला होता. या बेटावर कोणीही जाण्यास मनाई आहे; पण गुगल मॅप्सच्या मदतीने या बेटाची छायाचित्रं इंटरनेटवर उपलब्ध झाली होती. अर्थात, गुगलने नंतर ही छायाचित्रं इंटरनेटवरून हटवली. यासोबतच, काही दिवसांपूर्वी एक जोडपं रस्त्यावरच अश्लील चाळे करतानाही दिसून आले होते. त्यांचे फोटोही गुगल मॅप्सच्या मदतीने घेण्यात आले होते.

  First published:

  Tags: Google