मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Google Map वापरुन करता येईल कमाई; तुम्हाला करावं लागेल हे काम

Google Map वापरुन करता येईल कमाई; तुम्हाला करावं लागेल हे काम

तुम्हाला माहित आहे का, की गुगल मॅपच्या मदतीने तुम्हाला कमाई देखील करता येईल. जाणून घ्या गुगल मॅपच्या मदतीने पैसे (Earn Money from Google Maps) कसे कमावता येतील.

तुम्हाला माहित आहे का, की गुगल मॅपच्या मदतीने तुम्हाला कमाई देखील करता येईल. जाणून घ्या गुगल मॅपच्या मदतीने पैसे (Earn Money from Google Maps) कसे कमावता येतील.

तुम्हाला माहित आहे का, की गुगल मॅपच्या मदतीने तुम्हाला कमाई देखील करता येईल. जाणून घ्या गुगल मॅपच्या मदतीने पैसे (Earn Money from Google Maps) कसे कमावता येतील.

मुंबई, 27 फेब्रुवारी: गुगल (Google) सर्वात लोकप्रिय सर्च इंजिन म्हणून ओळखले जाते. गुगलतर्फे युजर्ससाठी अनेक सेवा पुरवण्यात येतात. गुगल मॅप (Google map) ही त्यापैकीच एक सेवा आहे. गुगल मॅप तुम्हाला इच्छित स्थळी बरोबर घेऊन जातं. एखाद्या नव्या शहरात गेल्यानंतर रस्ते आपण गुगल मॅपवरून शोधतो. गुगल मॅपमुळे अनोळखी शहरातली ठिकाणं आपण अगदी सहज शोधू शकतो. योग्य ठिकाणापर्यंत पोहोचण्यासाठी गुगल मॅपची मोठी मदत होते. पण तुम्हाला माहित आहे का, की गुगल मॅपच्या मदतीने तुम्हाला कमाई देखील करता येईल. जाणून घ्या गुगल मॅपच्या मदतीने पैसे (Earn Money from Google Maps) कसे कमावता येतील.

गुगल मॅप युजरला आपला अनुभव आणि अचूक माहिती शेअर करण्यासाठी पॉइंट्स देते. गुगल मॅप हे अधिक फायदेशीर आणि अचूक बनवण्यासाठी युझरला हे पॉइंट्स दिले जातात. गुगल मॅप तुम्हाला रिव्ह्यू, फोटोग्राफ्स, व्हिडीओ, ठिकाणाबद्दलचे प्रश्न, प्लेस एडिट, मिसिंग प्लेस अॅड आणि फॅक्ट चेकबद्दल प्रश्न करते आणि त्यांचं उत्तर दिल्यानंतर तुम्हाला पॉइंट मिळतात. हे पॉइंट्स युझरच्या योगदानावर अवलंबून असतात. उदा., जर तुम्ही एखाद्या ठिकाणाबद्दल रिव्ह्यू लिहिला तर तुम्हाला 10 पॉइंट्स दिले जातात.

हे वाचा-Facebook देतंय कमाईचा गोल्डन चान्स! Reels Videos मधून मिळवता येणार पैसे

एखाद्या ठिकाणबद्दलची माहिती तुम्ही अचूक भरल्यास तुम्हाला 5 पॉइंट्स दिले जातात. तसंच 200 पेक्षा अधिक रिव्ह्यू दिल्यानंतर तुम्हाला 10 बोनस पॉइंट्स मिळतात. याशिवाय, एखाद्या ठिकाणाच्या रेटिंगसाठी 1, फोटोसाठी 5, व्हिडीओसाठी 7, उत्तरासाठी 1, संपादनासाठी 5 आणि एखादं ठिकाण किंवा रस्ता मॅपमध्ये वाढवण्यासाठी 15 पॉइंट गुगल मॅपकडून दिले जातात. हे पॉइंट वाढल्यानंतर तुमची यातील लेव्हल वाढते. एखाद्या व्यक्तीला 250 पॉइंट्स मिळाले, तर एक स्टार दिला जातो. तसंच 1500 , 5000 , 15000 पॉइंट्स मिळाले आणि लँडमार्कवर पोहोचल्यावर त्यांच्या लेव्हलमध्ये वाढ होते.

हे वाचा-गुगल क्रोममध्ये ‘Enhanced Safe Browsing Mode’ कसा ऑन करायचा? जाणून घ्या सविस्तर

आता हे पॉइंट्स तुम्ही गुगल प्ले स्टोअरवर विविध गोष्टींसाठी रिडीम करू शकता. गुगल मॅपवरून थेट पैसे मिळत नाहीत. तुम्ही इतर मार्गांनी पैसे कमवू शकता. यातला मार्ग म्हणजे Map Analyst होणं. ही एक चांगली नोकरी असून तुम्हाला तासांनुसार पैसे दिले जातात. याशिवाय, ऑनलाइन मार्केटिंग सल्लागार बनून तुम्ही छोट्या व्यवसायांना प्रोत्साहन देऊनदेखील पैसे कमावू शकता. या प्रकारे तुम्हीदेखील घरबसल्या गुगल मॅपवरून कमाई करू शकता.

First published:

Tags: Google