मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Google लाँच करणार Smartwatch, अनोख्या कोडनेमसह Apple Watch ला देणार टक्कर

Google लाँच करणार Smartwatch, अनोख्या कोडनेमसह Apple Watch ला देणार टक्कर

 गुगलच्या पहिल्या इनहाउस स्मार्टवॉचवर सध्या काम सुरू असून, त्याचं कोडनेम “Rohan” असं ठेवण्यात आलं आहे. हे वॉच 2022 मध्ये लाँच होणार आहे.

गुगलच्या पहिल्या इनहाउस स्मार्टवॉचवर सध्या काम सुरू असून, त्याचं कोडनेम “Rohan” असं ठेवण्यात आलं आहे. हे वॉच 2022 मध्ये लाँच होणार आहे.

गुगलच्या पहिल्या इनहाउस स्मार्टवॉचवर सध्या काम सुरू असून, त्याचं कोडनेम “Rohan” असं ठेवण्यात आलं आहे. हे वॉच 2022 मध्ये लाँच होणार आहे.

  नवी दिल्ली, 4 डिसेंबर : सध्या तंत्रज्ञानाचं युग असून भारतासह संपूर्ण जगात स्मार्टवॉचची (Smartwatch) मागणी वाढत आहे. ग्राहकांची मागणी पाहता अनेक कंपन्या कमी बजेटमधील आणि एकापेक्षा एक दमदार फीचर्ससह स्मार्टवॉच लाँच करत आहेत. आता Google कंपनीसुद्धा आपलं स्मार्टवॉच लाँच करणार असल्याचं वृत्त आहे. गुगलच्या पहिल्या इनहाउस स्मार्टवॉचवर सध्या काम सुरू असून, त्याचं कोडनेम “Rohan” असं ठेवण्यात आलं आहे. हे वॉच 2022 मध्ये लाँच होणार आहे. या वर्षाच्या सुरुवातीलाच गुगलने $ 2.1 बिलियनमध्ये फिटबिट कंपनी खरेदी केली होती, मात्र या नव्या वॉचवर गुगल पिक्सेल हार्डवेअर ग्रुप काम करत आहे.

  गुगल स्मार्टवॉचची किंमत Fitbit च्या स्मार्टवॉचपेक्षा अधिक असेल, अशी मााहिती आहे. गुगलचं स्मार्टवॉच Apple Watch ला टक्कर देईल, असं म्हटलं जातं आहे. गुगलने पिक्सेल सीरिजअंतर्गत अनेक वर्ष आपल्या कंपनीच्या स्मार्टफोन्सवर काम केलं. मात्र आतापर्यंत गुगलने कधीही आपलं स्मार्टवॉच तयार केलं नव्हतं. त्यामुळे आता या नव्या वॉचला गुगल पिक्सेल वॉच म्हणेल की नाही, हे अद्याप स्पष्ट नाही.

  गुगल वॉचमध्ये स्टेप काउंटरसह हार्ट रेट मॉनिटर आणि बेसिक फिटनेस ट्रॅकिंग फीचर्स असणार आहेत. Google सध्या नवीन वॉचसह 'नाइटलाइट' असं कोडनेम असलेल्या वेअरेबल ऑपरेटिंग सिस्टममध्ये फिटबिट इंटिग्रेशन लाँच करण्यावरदेखील काम करत आहे. Google सध्या WearOS 3 सह आपल्या स्मार्टवॉच प्लॅटफॉर्मच्या लेटेस्ट पुनर्गुंतवणुकीच्या प्रक्रियेत आहे.

  ना पेट्रोल, ना डिझेल, ना CNG; नेमकी कशी चालते नितीन गडकरींची ही खास कार

  आतापर्यंत Wear OS 3 केवळ Samsung Galaxy Watch 4 मध्ये नव्या ऑपरेटिंग सिस्टीमच्या व्हर्जनवर चालतं.

  गुगल कंपनी आपलं पहिलं स्मार्टवॉच Pixel 6 सोबत लाँच करणार होती, मात्र लाँच करण्यास उशीर झाल्यामुळे त्यांना हा निर्णय घ्यावा लागला. गुगल कंपनीने जुन्या पिक्‍सेल फोनसाठी कॅमेरा अॅप व्हर्जन 8.4 आणण्‍यास सुरुवात केली आहे. यात Pixel 6 आणि 6 Pro ची कॅमेरा फीचर्सदेखील समाविष्ट आहेत.

  स्मार्टवॉचमुळे उघडकीस आला प्रियकराचा खोटेपणा; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

  कोरोनाच्या काळात आरोग्याची काळजी घेण्यासाठी आजकाल स्मार्टवॉच खरेदी करणं ही एक गरजसुद्धा बनली आहे. तसंच स्मार्टवॉचचा ट्रेंडही खूप सुरू आहे. तुम्हाला चांगलं स्मार्टवॉच खरेदी करायचं असेल, तर गुगल स्मार्टवॉचचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता वॉच लाँच होईपर्यंत काही काळ थांबू शकता.

  First published:
  top videos

   Tags: Smartwatch, Smartwatch features