मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

स्मार्टवॉचमुळे उघडकीस आला प्रियकराचा खोटेपणा; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

स्मार्टवॉचमुळे उघडकीस आला प्रियकराचा खोटेपणा; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

प्रियकरावर लक्ष ठेवण्याचा आपला हेतू नव्हता. नकळत त्याचा खोटेपणा उघड झाला, असं क्रिस्टननं म्हटलं आहे. तो खोटं बोलत आहे हे आपल्याला माहीत नव्हतं, असंदेखील ती म्हणाली आहे.

प्रियकरावर लक्ष ठेवण्याचा आपला हेतू नव्हता. नकळत त्याचा खोटेपणा उघड झाला, असं क्रिस्टननं म्हटलं आहे. तो खोटं बोलत आहे हे आपल्याला माहीत नव्हतं, असंदेखील ती म्हणाली आहे.

प्रियकरावर लक्ष ठेवण्याचा आपला हेतू नव्हता. नकळत त्याचा खोटेपणा उघड झाला, असं क्रिस्टननं म्हटलं आहे. तो खोटं बोलत आहे हे आपल्याला माहीत नव्हतं, असंदेखील ती म्हणाली आहे.

लंडन, 3 डिसेंबर : प्रेमी जोडप्यांमध्ये (Lovebirds) अनेकदा वादविवाद, रुसवेफुगवे होत असतात. काही वेळा अनेकांच्या मनात आपल्या जोडीदाराविषयी संशयाचीही भावना निर्माण होते. आपला जोडीदार खोटं बोलत नाही ना, फसवत तर नाही ना याची शहानिशा करण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. लंडनमध्ये (London) मात्र एका तरुणीला आपला जोडीदार खोटं (Lying) बोलत असल्याचं अगदी सहजपणे विनासायास समजलं आणि त्या प्रियकराचं (Boyfriend) बिंग उघड झालं. या तरुणीने याबाबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) शेअर केला असून, अल्पावधीतच तो प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत दोन लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला असून, त्याला चार हजारांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. कारण अगदी सहजपणे आपल्या जोडीदारावर लक्ष ठेवण्याची, त्याचा खरेखोटेपणा तपासण्याची एक अफलातून युक्ती यामुळे अनेकांना मिळाली आहे. 'झी न्यूज'ने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

नेमकं प्रकरण काय?

या तरुणीने आपल्या जोडीदाराचा खोटेपणा पकडला आहे तो त्याच्या स्मार्टवॉचमुळे (SmartWatch). अतिशय मजेदार अशी ही घटना लंडनमध्ये घडली आहे. 'द सन' वृत्तपत्रात याबाबतचं वृत्त प्रसिद्ध झालं आहे. त्यानुसार, क्रिस्टन नामक एका तरुणीने टिकटॉकवर (Tiktok) एक व्हिडिओ तयार करून त्यात, तिच्या प्रियकराचा खोटेपणा कसा पकडला याची माहिती दिली आहे. ही घटना घडली त्या दिवशी क्रिस्टनचा प्रियकर गुड नाईट म्हणायला तिच्या घरापर्यंत आला होता. तिच्या घरापासून त्याच्या घरापर्यंतचं अंतर क्रिस्टनला माहीत होतं; पण अॅपल वॉचवर (Apple Watch) त्याच्या पावलांची (Steps) संख्या बघितली तेव्हा तिच्या लक्षात आलं की, काही तरी गडबड आहे. क्रिस्टनच्या घरापासून त्याच्या घरापर्यंत पोहोचण्यासाठी त्याने जेवढी पावलं टाकायला हवी होती, त्यापेक्षा जास्त पावलं टाकली असल्याचं तिला दिसून आलं. तेव्हा तिने त्याच्याकडे खोदून खोदून चौकशी केली असता सत्य उघडकीस आलं. त्या रात्री क्रिस्टनचा प्रियकर क्रिस्टनला गुड नाइट म्हणून परत त्याच्या घरी गेला नाही, तर तो नाईट क्लबमध्ये (night Club) गेला होता. स्मार्टवॉचमुळे त्याचं भांडं फुटलं आणि त्याचं खोटं पकडलं गेलं.

हेही वाचा : तुमचा चेहराच बनेल बोर्डिंग पास, चार विमानतळांवर बसणार FTR यंत्र; वाचा सविस्तर

क्रिस्टनने प्रियकराचं खोटं कसं ओळखलं?

वॉचवर क्रिस्टन तिच्या प्रियकराच्या स्टेप्स पाहत होती. त्यामुळे तिचा प्रियकर खोटं बोलत असल्याचा तिला अंदाज आला. स्मार्टवॉचमध्ये तुम्ही दररोज चालत असलेल्या पावलांचं रेकॉर्डिंग आणि इतरांशी त्याची तुलना करण्याचा पर्यायदेखील उपलब्ध आहे. त्यामुळे क्रिस्टन आपल्या पावलांची तुलना आपल्या मित्राच्या पावलांबरोबर करत असताना तिला त्यात अपेक्षेपेक्षा अधिक तफावत दिसली. तिच्या प्रियकराच्या पावलांची संख्या खूपच जास्त असल्याचं तिच्या लक्षात आलं, याचाच अर्थ तो घरी न जाता अधिक दूर असलेल्या कुठल्या तरी ठिकाणी गेला असल्याचा अंदाज तिनं बांधला आणि त्याबाबत चौकशी केली, तेव्हा सत्य समोर आलं. हा सगळा प्रकार क्रिस्टनने एका व्हिडिओद्वारे सोशल मीडियावर शेअर केला, तेव्हा इतक्या साध्या सोप्या युक्तीने जोडीदाराचा खरे-खोटेपणा पकडता येत असल्याचं समजल्याने हा व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला.

प्रियकरावर लक्ष ठेवण्याचा आपला हेतू नव्हता. नकळत त्याचा खोटेपणा उघड झाला, असं क्रिस्टननं म्हटलं आहे. तो खोटं बोलत आहे हे आपल्याला माहीत नव्हतं आणि आपल्याला त्याचा मागही काढायचा नव्हता. त्यानं खरं सांगितलं असतं तर काहीही अडचण आली नसती, असं तिनं स्पष्ट केलं आहे. आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक झालेली स्मार्ट उपकरणं कधी तरी आपल्यालाच गोत्यात आणू शकतात याचं हे एक उदाहरण म्हटलं पाहिजे.

First published: