मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Google चं भन्नाट फीचर, आता विना इंटरनेट अ‍ॅक्सेस करता येणार सर्व Files

Google चं भन्नाट फीचर, आता विना इंटरनेट अ‍ॅक्सेस करता येणार सर्व Files

 युजर्स आता पीडीएफ (PDF), ऑफिस फाईल्स आणि इमेज ऑफलाईन अ‍ॅक्सेस करू शकतात.

युजर्स आता पीडीएफ (PDF), ऑफिस फाईल्स आणि इमेज ऑफलाईन अ‍ॅक्सेस करू शकतात.

युजर्स आता पीडीएफ (PDF), ऑफिस फाईल्स आणि इमेज ऑफलाईन अ‍ॅक्सेस करू शकतात.

नवी दिल्ली, 8 ऑगस्ट : गुगल ड्राईव्ह (Google Drive) आता ऑफलाईन मोडसाठीही (offline mode) सुविधा देत आहे. कंपनीने एका ब्लॉग पोस्टमध्ये नव्या अपडेटची घोषणा केली आहे. युजर्स आता पीडीएफ (PDF), ऑफिस फाईल्स आणि इमेज ऑफलाईन अ‍ॅक्सेस करू शकतात. परंतु त्यासाठी युजर्सला फाईल्स आधीच ऑफलाईन वापर करण्यासाठी त्या मार्क कराव्या लागतील. यामुळे युजर्स इंटरनेटशी कनेक्ट नसल्यासही ब्राउजरचा वापर करुन फाईल्स ओपन करण्याची परवानगी मिळते.

2019 मध्ये गुगलने (Google) एका अशा फीचरचं बीटा टेस्टिंग सुरू केलं, ज्यात युजर्सला वेबवर गुगल ड्राईव्हचा वापर करताना नॉन गुगल फाईल प्रकारांना ऑफलाईन उपलब्ध करण्याची परवानगी दिली.

हे फीचर आता सर्व युजर्ससाठी रोल आउट करण्यात येत आहे. त्यामुळे आता कोणताही युजर PDF, इमेज आणि Microsoft Office डॉक्यूमेंट सिलेक्ट करू शकतो, ज्याला ते ऑफलाईन अ‍ॅक्सेस करू इच्छितात.

कसा कराल वापर -

- सर्वात आधी ड्राईव्ह सेटिंगमध्ये (Google Drive Settings) ऑफलाईन अ‍ॅक्सेस पर्याय अ‍ॅक्टिव्ह करणं गरजेचं आहे.

- सेटअप प्रोसेस पूर्ण केल्यानंतर सपोर्टेड फाईलवर राईट-क्लिक करून ‘Available offline’ पर्याय दिसेल.

- हे फीचर सर्व गुगल Workspace युजर्ससह Cloud Identity Free, Cloud Identity Premium, G Suite Basic आणि Business युजर्ससाठी उपलब्ध आहे.

Cyber Fraud झाल्यास 24 तासांत असे मिळतील संपूर्ण पैसे, करावं लागेल हे एक काम

जर तुमचं 15 GB फ्री स्टोरेज पूर्ण झालं असेल, तर गुगल ड्राईव्हवर आपल्या फाईलचा बॅकअप घेण्यासाठी एक हाय स्टोरेज प्लॅन अपग्रेड करता येऊ शकतो. भारतात युजर्स महिन्याला आणि वर्षाला असे प्लॅन घेऊ शकतात. गुगल 130 रुपये प्रति महिन्यासाठी 100 GB स्टोरेज स्पेस देतो. अधिक स्टोरेजसाठी 650 रुपये प्रति महिना 2TB स्टोरेज मिळतं.

First published: