मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Tokyo Paralympic 2020: खेळता येणार Google चा सर्वात मोठा Doodle Game

Tokyo Paralympic 2020: खेळता येणार Google चा सर्वात मोठा Doodle Game

गुगलकडून (Google) आतापर्यंतचा सर्वात मोठा डुडल गेम (Doodle Game) डुडल चॅम्पियन आयलँड (Doodle Champion Island) पुन्हा सुरू करण्यात आला आहे.

गुगलकडून (Google) आतापर्यंतचा सर्वात मोठा डुडल गेम (Doodle Game) डुडल चॅम्पियन आयलँड (Doodle Champion Island) पुन्हा सुरू करण्यात आला आहे.

गुगलकडून (Google) आतापर्यंतचा सर्वात मोठा डुडल गेम (Doodle Game) डुडल चॅम्पियन आयलँड (Doodle Champion Island) पुन्हा सुरू करण्यात आला आहे.

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 24 ऑगस्ट : टोकयो ऑलिम्पिक 2020 (Olympic Games Tokyo 2020) नंतर आता टोकयोमध्ये आज मंगळवारपासून पॅरालिम्पिक (Tokyo 2020 Paralympic Games) टुर्नामेंटची सुरुवात होत आहे. अशात गुगलकडून (Google) आतापर्यंतचा सर्वात मोठा डुडल गेम (Doodle Game) डुडल चॅम्पियन आयलँड (Doodle Champion Island) पुन्हा सुरू करण्यात आला आहे. हा खेळ मूळ रुपात ऑलिम्पिक गेम साजरा करण्याच्या उद्देशाने डिझाईन आणि लाँच करण्यात आला आहे. टोकयो पॅरालिम्पिक 2020 चं आयोजन 24 ऑगस्ट ते 5 सप्टेंबरदरम्यान करण्यात आलं आहे.

कसा सुरू होईल गेम?

गुगलवर सर्च होमपेजवर (Google Search) दिसणाऱ्या डुडलवर (Doodle) क्लिक केल्यानंतर गुगलचा हा डुडल गेम (Google Doodle Game) सुरू होईल. गुगलवरील या डुडल गेमचा अनुभव घेण्यासाठी www.google.com वर लॉगइन करावं लागेल. त्यानंतर गुगल डुडलवर क्लिक करुन खेळण्यास सुरुवात करा.

4.1कोटी WhatsApp मेसेज,38 लाख Google Search..;1 मिनिटांत इंटरनेटवर काय-काय होतं?

याआधीही गुगलने टोकयो ऑलिम्पिक 2020 च्या सुरुवातीला डुडल गेम Doodle Champion Island लाँच केला होता. यात सात मिनी गेम्स दिग्गज प्रतिस्पर्ध्यांनी अनेक स्पर्धा अॅनिमेटेड स्वरुपात सादर केल्या. यात युजरला रिअल टाईम लीडरबोर्डसह नींजा कॅट गेम खेळण्याचीही सुविधा देण्यात आली होती. युजर चार टीम ब्लू, ग्रीन, यलो आणि रेडसह गेम खेळू शकतात. या सात मिनी गेम्समध्ये टेबल टेनिस, स्केटबॉर्डिंग, रग्बी, पोहण्याची स्पर्धा क्लाइंबिंग आणि मॅरेथॉन सामिल होते. दरम्यान, भारत कोरोना काळात संपूर्ण नियमांचं करत पॅरालिम्पिकमध्ये नऊ खेळांमध्ये भाग घेत आहे.

भारताचे 54 खेळाडू 9 प्रकारच्या खेळांमध्ये सहभागी होणार आहेत. यामध्ये तिरंदाजी, पॅरा कॅनोईंग, एथलिटिक्स, शूटिंग, टेबल टेनिस, स्विमिंग, बॅडमिंटन, पॉवरलिफ्टिंग आणि तायक्वांडो यांचा समावेश आहे. मागच्या पॅरालिम्पिकमध्ये गोल्ड मेडल पटकावणारा हाय जम्पर मरिय्यप्पन थंगावेलु (Mariyappan Thangavelu) टोकयो पॅरालिम्पिकमध्ये भारताचा ध्वज घेऊन प्रतिनिधीत्व करेल.

First published: