मुंबई, 5 सप्टेंबर: जगातील सर्वात मोठं इन्स्टंट मेसेजिंग अॅप WhatsApp हे युजर्सच्या गोपनीयतेसाठी खूप प्रसिद्ध आहे. अलीकडेच कंपनीनं काही प्रायव्हसी फीजर्स आणली आहेत. रिपोर्ट्सनुसार, व्हॉट्सअॅप आणखी एक नवीन प्रायव्हसी फीचर आणण्याच्या तयारीत आहे. या फीचरच्या मदतीनं यूजर्स अॅपवर ऑनलाइन असतानाही त्यांचे स्टेटस ऑफलाइन करू शकतील. म्हणजे ऑनलाइन चॅटिंग करत असतानाही युजर्स इतर युजर्सना ऑफलाइन दिसतील. कंपनीच्या म्हणण्यानुसार हे फीचर येण्यासाठी अजून काही वेळ लागेल. परंतु तोपर्यंत तुम्हाला तुमची ऑनलाइन स्थिती लपवायची असल्यास एक आणखी मार्ग आपल्याकडे उपलब्ध आहे.
Last Seen च्या माध्यमातून लपवता येते ऑनलाइन स्टेटस-
वापरकर्त्यांना हवं असल्यास ते त्यांचं ऑनलाइन स्टेटस लपवू शकतात. ही ट्रिक Android आणि iOS दोन्ही वापरकर्त्यांसाठी काम करेल.
हेही वाचा- ऑनलाइन गेमिंगमधून पैसे मिळवत असाल तर सावधान; आयकर विभागाची तुमच्यावर करडी नजर
इतरांची स्थितीही पाहता येणार नाही-
जर वापरकर्त्यांनी नोबडी हा पर्याय निवडला तर ते स्वत:ही इतर वापरकर्त्यांची ऑनलाइन स्थिती पाहू शकणार नाहीत. सोप्या भाषेत सांगायचे तर, तुम्ही तुमच्या कोणत्याही मित्र ऑनलाइन आहे की नाही हे पाहू शकणार नाही. जर तुम्ही या मुद्द्यावर सहमत असाल तर तुम्ही Nobody या पर्यायानं पुढे जाऊ शकता. याशिवाय, तुम्ही व्हॉट्सअॅपच्या नवीन फीचरचीही वाट पाहू शकता, ज्यामुळं यूजर्स ऑनलाइन असतानाही ऑफलाइन दिसू शकतात.
नवीन प्रायव्हसी फीचर कधी येईल?
नवीन प्रायव्हसी फीचरची घोषणा करताना, व्हॉट्सअॅपनं सांगितलं होतं की हे वैशिष्ट्य अशा वापरकर्त्यांसाठी आहे, ज्यांना त्यांची ऑनलाइन उपस्थिती खाजगी ठेवायची आहे. इन्स्टंट मेसेजिंग अॅपनं पुष्टी केली होती की, हे वैशिष्ट्य ऑगस्टमध्ये सर्व वापरकर्त्यांसाठी जारी केलं जाईल. मात्र असं झालेलं नाही. आता असं मानलं जात आहे की कंपनी या महिन्यात अधिकृतपणे ऑनलाइन स्टेटस लपविणारे फीचर जारी करू शकते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.