'या' देशात आता करता येणार नाही Whatsapp payment, काय आहे कारण जाणून घ्या

'या' देशात आता करता येणार नाही Whatsapp payment, काय आहे कारण जाणून घ्या

या देशात फक्त 10 दिवसांतच Whatsapp payment सेवा झाली बंद

  • Share this:

नवी दिल्ली, 25 जून: सर्वाधिक संवाद आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी वापरलं जाणारं अॅप म्हणजे व्हॉट्सअॅप. कॉलेज-शाळेतील मित्रांपासून ते कामापर्यंत सगळ्यासाठी Whatsapp हे साध सोपं माध्यम झालं आहे. याच whatsappवर पेमेंटचीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. मात्र नुकत्याच एका देशात whatsapp payment सेवेवर बंदी घालण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

फेसबुकने या महिन्यात म्हणजे 15 जून रोजी ब्राझीलमध्ये व्हॉट्सअ‍ॅप पेमेंट सर्व्हिस सुरू केली. ही सेवा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सेंट्रल बँक ऑफ ब्राझीलने व्हिसा आणि पेमेंट सर्व्हिस प्रोजेक्टवर व्हिसा आणि मास्टरकार्ड फेसबुकबरोबर काम न करण्याचे आदेश दिले आहेत. विशेष म्हणजे ब्राझील हा पहिला देश आहे जिथे फेसबुकने व्हाट्सएप पेमेंट्स सुरू केलं होतं. साल 2018 पासून whatsapp payment साठी टेस्टिंगचं काम सुरू होतं. केवळ आतापर्यंत सरकारकडून मंजुरी न मिळाल्यामुळे सुरू करण्यात आली नव्हती.

हे वाचा-करदात्यांना सरकारचा मोठा दिलासा! 2018-19साठी ITR फाइल करण्याची डेडलाइन वाढवली

सेंट्रल बँक ऑफ ब्राझीलने एका निवेदनात म्हटले आहे की, 'केंद्रीय बँकेचा निर्णय पुरेसा स्पर्धात्मक वातावरण जपण्याचा आहे. जो आंतर-प्रणाली, वेगवान, सुरक्षित, पारदर्शक आणि परवडणारी पेमेंट सिस्टम सुनिश्चित करेल. व्हॉट्सअ‍ॅप पेमेंट सर्व्हिसच्या गोपनीयतेबाबत चिंता व्यक्त केली आहे. लॉन्च होण्यापूर्वी बँकेला व्हॉट्सअ‍ॅप पेमेंटच्या अटींचे विश्लेषण करण्याची संधी मिळालेली नाही, असेही बँकेच्या निवेदनात सांगण्यात आलं आहे.

व्हॉट्सअ‍ॅप पेमेंट सेवा ब्राझीलमध्ये सुरू केल्यानंतर मार्क झुकरबर्ग यांनी ही सेवा आणखी इतर देशांत लवकरच सुरू करू असं आश्वासनही दिलं होतं. मात्र 10 दिवसांतच ब्राझीलने यावर स्थगिती आणल्यानं आता इतर देशांमध्ये काय निर्णय घेतला जातो हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

संकलन, संपादन- क्रांती कानेटकर

First published: June 25, 2020, 1:11 PM IST

ताज्या बातम्या