नवी दिल्ली, 23 जून : आजकाल लोकांना व्यक्त होण्यासाठी अनेक प्लॅटफाॅर्म मिळत आहेत. त्यामुळे लोक आपलं मत, आपले विचार मनमोकळेपणाने मांडू शकतात. या प्लॅटफाॅर्मपैकी सोशल मीडिया हा सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा प्लॅटफाॅर्म आहे. यामध्ये व्हाॅट्सअॅप, इन्स्टाग्राम, फेसबुक, ट्विटर अशा अनेक गोष्टींचा समावेश होतो. ट्विटरवर (Twitter latest news) आपण कलाकार, राजकारणी, सामान्य लोक, अशा सगळ्यांचेच विचार, मतं वाचत असतो. मात्र याठिकाणी लिहिण्याला शब्दांची मर्यादा आहे. त्यामुळे आपण ट्विटरवर काही ठराविक शब्दांमध्येच आपलं मत मांडू शकतो. अशातच ट्विटरनं एक मोठी घोषणा केली आहे. ट्विटर वापरकर्त्यांसाठी ही एक आनंदाची बातमी समोर आली आहे. हे ही वाचा - ‘आमच्या भावना तुमच्यापर्यंत पोहचल्याच नाहीत!’ शिवसेना आमदाराचा ‘लेटरबॉम्ब’, वाचा खळबळजनक पत्र ट्विटर नेहमीच आपल्या वापरकर्त्यांसाठी नवनवीन फीचर्स घेऊन येत असतं. त्यामुळे ट्विटर वापरायला सोयीस्कर आणि सोपं होतं. अशातच ट्विटर आता नवीन फीचर (New Feature) घेऊन येत आहे. याविषयी ट्विटरनं मोठी घोषणाही केली असून ट्विटरच्या नवीन फीचरचं नाव ‘ट्विटर नोट्स’ (Twitter Notes) असं आहे. या नव्या फीचरचा उपयोग ट्विटरवर मोठा मजकूर लिहिण्यासाठी होणार आहे. याची अद्याप चाचणी सुरु असून ट्विटरनं याविषयी ट्विट केलं आहे. त्यामुळे आपल्य सर्वांना लवकरच ट्विटरवर मोठा मजकूरही लिहिता येणार आहे.
✨ Introducing: Notes ✨
— Write (@Write) June 22, 2022
We’re testing a way to write longer on Twitter. pic.twitter.com/SnrS4Q6toX
‘ट्विटर नोट्स’ वर आपल्याला मोठा मजकूर म्हणजेच एक प्रकारे ब्लाॅग लिहिता येणार आहे. ब्लॉग पोस्टला पब्लिश केल्यानंतर तुम्ही ती लिंक शेअरसुद्धा करू शकतात. साधारण हे फीचर कसं दिसेल याचा नमुना ‘Twitter Write’ या अधिकृत साईटवर देण्यात आला आहे. यावर सध्या अनेक प्रतिक्रिया येत आहे. अनेक वापरकर्ते हे वापरण्यासाठी उत्सुक असलेले पहायला मिळत आहे. त्यामुळे चाचणी पूर्ण झाल्यावर लवकरच आपल्याला या फीचरचा लाभ घेता येणार आहे.