Home /News /technology /

Best Prepaid Plans: कॅशबॅक आणि फ्री डेटा कूपनसह Jio, Airtel च्या आकर्षक ऑफर्स, इथे तपासा

Best Prepaid Plans: कॅशबॅक आणि फ्री डेटा कूपनसह Jio, Airtel च्या आकर्षक ऑफर्स, इथे तपासा

टेलिकॉम कंपन्या दररोज नवीन-नवीन प्रीपेड रिचार्ज प्लॅन्स सादर करतात. सध्या रिलायन्स जिओ आणि एअरटेल या भारतातील आघाडीच्या दोन टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या ग्राहकांसाठी आकर्षक प्लॅन्स आणले आहेत.

नवी दिल्ली 13 नोव्हेंबर : सध्या वर्क फ्रॉम होम, ऑनलाइन शाळा आणि अनेक ऑनलाइन कामांमुळे डेटा पॅकची गरज वाढली आहे. पूर्वी आठवडाभर पुरणारा 1-2 जीबी डेटा (Data) आजकाल दिवसभरासाठीदेखील पुरेसा ठरत नाही. त्यामुळे दिवसाकाठी जास्त जीबी डेटा मिळेल अशा प्रकारचं रिचार्ज (Recharge) करावं लागतं. काही ग्राहक तर प्रत्येक महिन्याला रिचार्ज करण्याऐवजी एकाचवेळी तीन महिने, सहा महिने किंवा एका वर्षाचा रिचार्ज करण्याला प्राधान्य देतात. अशा परिस्थितीमध्ये टेलिकॉम कंपन्या आपल्या ग्राहकांसाठी सतत काही ना काही नवीन रिचार्ज ऑफर देण्याचा प्रयत्न करत असतात. टेलिकॉम कंपन्या दररोज नवीन-नवीन प्रीपेड रिचार्ज प्लॅन्स सादर करतात. सध्या रिलायन्स जिओ आणि एअरटेल या भारतातील आघाडीच्या दोन टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या ग्राहकांसाठी आकर्षक प्लॅन्स आणले आहेत. 'दैनिक जागरण'ने याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. एअरटेलचे (Airtel ) असे काही प्रीपेड प्लॅन (Prepaid plan) आहेत, जे युझर्सना अतिरिक्त डेटाची कूपन्स देतात; मात्र ही डेटा कूपन्स काही ठराविक युझर्सनाच मिळू शकतात. डेटा कूपन जिंकणाऱ्या युझरला एसएमएसद्वारे (SMS) कळवलं जाईल. मेसेज मिळाल्यानंतर अॅपच्या 'माय कूपन' (My Coupon) सेक्शनमध्ये जाऊन मिळालेलं कूपन अॅक्टिव्हेट करता येईल. दररोज किती युझर्सना ही कुपन्स मिळतील याबाबत मर्यादा ठरवण्यात आलेली नाही. परंतु संपूर्ण ऑफर कालावधीत एका युझरला एकदाच डेटा कूपन मिळू शकतं, असं कंपनीनं स्पष्ट केलं आहे. Safety Tips : या चुकांमुळे होऊ शकतो Smartphone ब्लास्ट; अशी घ्या काळजी एअरटेलच्या 289 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये 28 दिवसांच्या कालावधीसाठी दररोज अनलिमिटेड टॉकटाइम, 100 एसएमएस आणि 1.5 जीबी डेटा मिळतो. हाच प्लॅन एअरटेल एक्स्ट्रीमसोबत (Xstream) मोफत हॅलो ट्यून्ससह मिळतो. या प्लॅनसाठी 1 जीबी डेटाची 2 कूपन्स मोफत मिळणार आहेत. ही कूपन्स 28 दिवसांच्या कालावधीसाठी वैध असतील. एअरटेलचा 599 रुपयांचा प्लॅन Disney + HotStar च्या मोफत अॅन्युअल मोबाइल सबस्क्रिप्शनसह मिळतो. 28 दिवसांसाठी वैध असलेल्या या प्रीपेड प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉल्स, 100 एसएमएससह दररोज 3 जीबी डेटा मिळतो. हाच प्लॅन एअरटेल एक्स्ट्रीमसोबत (Xstream) मोफत हॅलो ट्यून्ससह मिळतो. या प्लॅनसाठी 1 जीबी डेटाची 4 कूपन्स ऑफरमध्ये मिळणार आहेत. ती 56 दिवसांसाठी वैध असतील. एअरटेलच्या 249, 279, 289, 298, 349 आणि 398 रुपयांच्या रिजार्चसोबत 1 जीबी डेटाची 2 कूपन्स मिळत आहेत. याशिवाय 399, 449 आणि 558 रुपयांचे प्रीपेड प्लॅनदेखील मोफत रिचार्ज कूपन मिळवून देण्यासाठी शॉर्टलिस्ट करण्यात आले आहेत. या तीन प्लॅन्ससोबत 1 जीबी डेटाची 4 कूपन्स मिळतात. त्यांची वैधता 56 दिवसांसाठी असेल. 598 आणि 698 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये 84 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह 1 जीबी डेटाची 6 कूपन्स मिळतात. रिलायन्स जिओनेदेखील आपल्या ग्राहकांसाठी काही आकर्षक ऑफर्स आणल्या आहेत. जिओने सप्टेंबर महिन्यात काही प्रीपेड प्लॅन्सवर कॅशबॅक ऑफर (Cashback Offer) दिल्या होत्या. जिओच्या वेबसाइटनुसार या ऑफर अजूनही सुरू आहेत. माय जिओ अॅप (My Jio App) किंवा जिओच्या वेबसाइटवरून रिचार्ज करून युझर्स या ऑफरचा लाभ घेऊ शकतात. जिओच्या 249, 555 आणि 599 रुपयांच्या प्लॅनवर कॅशबॅक ऑफर उपलब्ध आहे. कंपनी या प्लॅन्सवर 50, 111 आणि 120 रुपयांचा कॅशबॅक देत आहे. त्यामुळे आता 199, 444 आणि 479 रुपयांमध्येच रिचार्ज करता येणार आहे. जे युझर्स या तीन प्लॅनसह त्यांचे प्रीपेड नंबर रिचार्ज करतील, त्यांना 20 टक्के कॅशबॅक मिळेल. त्यानंतर ते जिओ मार्ट (Jio Mart), रिलायन्स डिजिटल (Reliance Digital), जिओ रिचार्जवरून कॅशबॅक रीडिम करू शकतात. Car Offer: कार खरेदीवर 50000 रुपयांपर्यंत बेनिफिट्स, YONO SBI ची खास ऑफर जिओच्या 249 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये दररोज अनलिमिटेड कॉल्स, 2 जीबी डेटा आणि 100 एसएमएस मिळतात. 84 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह मिळणाऱ्या 555 रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज 1.5 जीबी डेटा, अनलिमिटेड कॉल्स आणि 100 एसएमएस मिळतात. तर, 599 रुपयांच्या प्लॅनमध्ये 84 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह दररोज 2 जीबी डेटा,100 एसएमएस आणि अनलिमिटेड व्हॉइस कॉलचे फायदे मिळतात. या तिन्ही प्लॅन्ससोबत जिओ टीव्ही (JioTV), जिओ सिनेमा (Jio Cinema), जिओ सिक्युरिटी (Jio Security), जिओ न्यूज (Jio News) आणि जिओ क्लाउडचं (Jio Cloud) अॅप सबस्क्रिप्शन मिळतं. आपल्या गरजेनुसार वरील ऑफर्सपैकी योग्य ऑफरचा लाभ घेतल्यास ग्राहकांना रिचार्जवर जास्तीत जास्त फायदा मिळू शकतो.
First published:

Tags: Recharge, Reliance Jio, User data

पुढील बातम्या