मुंबई, 04 फेब्रुवारी: जगभरात अॅपल आयफोनची (iPhone Price) प्रचंड क्रेझ आहे. उत्कृष्ट तंत्रज्ञान, नवनवीन फीचर्स यामुळे आयफोननं आपली लोकप्रियता कायम राखली आहे. किंमत अधिक असली तरीही आयफोनचे चाहते रांगा लावून हा फोन खरेदी करतात. अलीकडच्या काळात ई-कॉमर्स कंपन्यांच्या माध्यमातूनही याची ऑनलाइन (Buy iPhone Online) खरेदी करता येते. त्यामुळे यासाठी आधीच नोंदणी केली जाते आणि फोन दाखल झाल्यावर तत्काळ त्याची खरेदी केली जाते. अशावेळी मोठ्या प्रमाणात सवलतही मिळू शकते. यंदा कंपनीनं आयफोन 13 दाखल केला असून, दाखल करताना त्याची किंमत 79,000 रुपये होती. सध्या तर फ्लिपकार्टवर (iPhone on Flipkart) हा फोन अवघ्या 56,000 रुपयांमध्ये खरेदी करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. या फोनच्या खरेदीवर घसघशीत सूट देण्यात येत असून अनेक आकर्षक ऑफर्सही (iPhone Offers) देण्यात आल्या आहेत. त्यामुळं हा फोन अवघ्या 56 हजार रुपयांमध्ये खरेदी करण्याची संधी मिळू शकते. हे वाचा- Oppo Reno 7 Series आज होणार लॉन्च, Sonyचा सेंसर वापरणारा जगातील पहिला Smartphone फ्लिपकार्टवर 128 GB स्टोअरेज क्षमतेचा आयफोन 13वर (iPhone 13) 5,000 रुपयांची सूट देण्यात येत आहे. म्हणजेच हा फोन 79 हजार रुपयांऐवजी 74,900 रुपयांना खरेदी करता येईल. हा डिस्काउंट मिळवण्यासाठी कोणत्याही क्रेडिट कार्डची आवश्यकता नाही. स्टॉक संपेपर्यंत तुम्ही या सवलतीचा फायदा घेऊ शकता. एक्सचेंज ऑफरवरही मोठी सवलत याशिवाय एक्सचेंज ऑफर (Exchange Offer) अंतर्गत तुम्हाला तुमच्या जुन्या फोनसाठी कमाल 18,850 रुपये मिळू शकतात. ही किंमत तुमच्या जुन्या फोनवर अवलंबून आहे. हाय-एंड मोबाइलवरच ही सवलत मिळू शकते. एक्सचेंजअंतर्गत तुमचा जुना फोन दिल्यानंतर त्याची किती किंमत मिळेल हे तुम्हाला फ्लिपकार्टवर तपासता येईल. हे वाचा- आता घरबरल्या Driving License मध्ये असा बदला Address, RTOमध्ये जाण्याचं No टेन्शन उदाहरणार्थ, तुम्ही तुमचा 64 जीबी क्षमतेचा आयफोन एक्स आर (iPhone XR 64GB) एक्सचेंज ऑफर अंतर्गत बदललात तर तुम्हाला 14,000 रुपयांची सूट मिळेल. अधिक हाय एंड फोन असेल तर तुम्हाला एक्सचेंज ऑफर अंतर्गत 18,850 रुपयांची सूट मिळेल. त्यामुळं तुम्हाला नवीन आयफोन फक्त 56,050 रुपये किमतीला मिळेल. लेटेस्ट आयफोनसाठी ही फारच कमी किंमत आहे. याशिवाय, अॅक्सिस बँकेचे (Axis Bank) क्रेडिट कार्ड (Credit Card) असेल तर त्यावर 5 टक्के कॅशबॅक मिळेल, म्हणजेच 56,050 रुपयांसाठी 2,800 रुपये कॅशबॅक मिळेल. यानंतर तर हा फोन तुम्हाला अवघ्या 53 हजार 250 रुपयांना मिळेल. तेव्हा आयफोन 13 अगदी स्वस्त किंमतीत खरेदी करायचा असेल तर फ्लिपकार्टला भेट द्या आणि धमाकेदार ऑफर्सचा लाभ घ्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.