Home /News /technology /

5 कॅमेरासह लाँच होणार Samsung Galaxy A52s 5G स्मार्टफोन, पाहा जबरदस्त फीचर्स आणि किंमत

5 कॅमेरासह लाँच होणार Samsung Galaxy A52s 5G स्मार्टफोन, पाहा जबरदस्त फीचर्स आणि किंमत

Samsung Galaxy A52s 5G देशात 1 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता लाँच केला जाणार आहे. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon वर फोन सेलसाठी उपलब्ध करण्यात येईल.

  नवी दिल्ली, 1 सप्टेंबर : सॅमसंग (Samsung) भारतीय बाजारात एक-एक करत आपले नवे स्मार्टफोन लाँच करत आहे. आज 1 सप्टेंबर रोजी सॅमसंगचा बहुचर्चित Samsung Galaxy A52s 5G लाँच होणार आहे. मागील आठवड्यात या फोनचा टीजर रिलीज करण्यात आला होता. Samsung India ने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर ट्विट करुन या फोनची माहिती दिली होती. Galaxy A52s हा 5G फोन मागील महिन्यात UK मध्ये लाँच करण्यात आला होता. देशात 1 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता लाँच इव्हेंटमध्ये फोन लाँच केला जाणार आहे. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon वर फोन सेलसाठी उपलब्ध करण्यात येईल. Amazon India वर फोन लिस्टेड करण्यात आल्याची माहिती आहे. Samsung Galaxy A52s च्या 6GB वेरिएंटची किंमत 38,999 रुपये अशू शकते. तर याच्या 8GB RAM टॉप वेरिएंटची किंमत 35,999 रुपये असू शकते. हा फोन भारतात Awesome Black, Awesome White आणि Awesome Violet रंगात उपलब्ध होणार आहे. Samsung Galaxy A52s 5G स्पेसिफिकेशन्स - - 6.5 इंची S-AMOLED डिस्प्ले - पंच होल स्क्रिनसह 120Hz रिफ्रेश रेट स्क्रिन - Android 11 बेस्ड One UI 3.1 - Snapdragon 778G चिपसेट - 4500mAh बॅटरी - 25W फास्ट चार्जिंग सपोर्ट

  जबरदस्त प्रोसेसर, 50 MP कॅमेरासह लाँच होणार Vivo चे तीन स्मार्टफोन, पाहा फीचर्स

  कॅमेरा सेटअप - Galaxy A52s 5G फोनमध्ये सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 32 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. फोनला 64 मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा, 12 मेगापिक्सल अल्ट्रा वाईड अँगल सेंसर आणि 5 - 5 मेगापिक्सलचे दोन इतर सेंसर देण्यात आले आहेत.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Samsung, Samsung galaxy

  पुढील बातम्या