मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

कोरोना असेपर्यंत Free mobile recharge; बड्या नेटवर्क प्रोयाव्हडर कंपन्यांचे स्पेशल प्लॅन

कोरोना असेपर्यंत Free mobile recharge; बड्या नेटवर्क प्रोयाव्हडर कंपन्यांचे स्पेशल प्लॅन

देशातील नेटवर्क सर्व्हिस प्रोव्हायडर कंपन्यांनी काही कोव्हिड रिलीफ मोबाइल रिचार्ज प्लॅन आणले आहेत.

देशातील नेटवर्क सर्व्हिस प्रोव्हायडर कंपन्यांनी काही कोव्हिड रिलीफ मोबाइल रिचार्ज प्लॅन आणले आहेत.

देशातील नेटवर्क सर्व्हिस प्रोव्हायडर कंपन्यांनी काही कोव्हिड रिलीफ मोबाइल रिचार्ज प्लॅन आणले आहेत.

मुंबई, 21 मे : देशात फैलावलेल्या कोरोनाच्या साथीमुळे (Corona Pandemic) कित्येकांची आर्थिक स्थिती बिघडली आहे. लॉकडाउन, निर्बंध यामुळे उद्योगधंदे बंद आहेत. परिणामी अनेकांचे उत्पन्न बुडालं आहे. रोजगार कमी झाले आहेत. मोलमजुरी करणाऱ्या असंख्य लोकांना एकमेकांशी संपर्क साधण्यासाठी मोबाइल सुरू ठेवणं अत्यावश्यक आहे; पण अनेकदा रिचार्ज करण्यासाठी पैसे नसतात. या सगळ्या पार्श्वभूमीवर देशातील नेटवर्क सर्व्हिस प्रोव्हायडर कंपन्यांनी आपल्या अल्प उत्पन्न गटातील (lower Income Group) ग्राहकांसाठी काही खास सवलती (Mobile recharge plan) जाहीर केल्या आहेत.

बीएसएनएल (BSNL), एअरटेल (Airtel), व्होडाफोन-आयडीया (Vodafone-Idea) आणि जिओ (JIO) या कंपन्यांनी काही खास प्लॅन्स आणले आहेत. बीएसएनएलनं आपल्या ग्राहकांसाठी योजनांची वैधता (Validity) 31 मे पर्यंत वाढवली असून, त्यामध्ये त्यांना नि:शुल्क इनकमिंग कॉल (incoming Call) तसंच आउटगोइंग कॉलसाठी विनामूल्य 100 मिनिटं दिली आहेत. तर जिओनं 300 मिनिटं मोफत कॉलिंगसह जिओ फोन (Jio Phone) वापरणाऱ्या ग्राहकांसाठी दोन प्रीपेड योजनाही दाखल केल्या आहेत. एअरटेल आणि व्होडाफोन आयडियानंही दुहेरी लाभ देणारे 49 आणि 79 रुपयांचे प्रीपेड प्लॅन सादर केले आहेत, नवभारत टाइम्सने या प्लॅनबाबत अधिक माहिती दिली आहे.

बीएसएनएल (BSNL)

बीएसएनएलनं ग्राहकांच्या योजनांची वैधता 1 एप्रिल किंवा त्यानंतर संपली आहे, त्यांना ती 31 मेपर्यंत वाढवून दिली आहे. जे प्रीपेड युझर्स कोविड-19 आणि तौक्ते चक्रीवादळानं (Taukte Cyclone) प्रभावित झाले आहेत आणि एक एप्रिलनंतर रिचार्ज करू शकलेले नाहीत त्यांना 31 मे पर्यंत मोफत वैधतेचा लाभ घेता येणार आहे. त्याचबरोबर कंपनीने या ग्राहकांना 100 मिनिटांचा मोफत टॉकटाइम देखील दिला आहे. 107, 197 रुपये आणि 397 रुपयांच्या या योजनांसाठी ही सवलत लागू आहे.

जिओ (Jio)

कोरोनासाथीच्या काळात रिचार्ज (Recharge) करणंही शक्य नसलेल्या ग्राहकांसाठी जिओनं सवलत योजना जाहीर केली होती. या महिन्याच्या सुरुवातीलाच जिओ फोन वापरणाऱ्या ग्राहकांसाठी कोविड रिलीफ ऑफरची (Covid Relief Offer) घोषणा केली होती. यामध्ये आउटगोइंग कॉलसाठी 300 मिनिटं विनामूल्य आणि डबल डेटा लाभांसह दोन नवीन योजनादेखील सादर केल्या आहेत. यामध्ये जिओनं आपल्या ग्राहकांना दररोज 10 मिनिटं विनामूल्य दिली असून त्यामुळे ग्राहक महत्त्वपूर्ण फोन करू शकतील. अल्प उत्पन्न गटातील ग्राहकांना याचा मोठा फायदा होईल. जिओ फोनने 39 आणि 69 रुपयांचे प्रीपेड प्लॅन आणले असून, यामध्ये 14 दिवसांच्या वैधतेसह डेटा आणि कॉलिंगचे फायदे उपलब्ध आहेत. यामध्ये बाय वन गेट वन ऑफर असून, एकाच्या किंमतीत दोन प्लॅन मिळणार आहेत.

हे वाचा - सर्च, लोकेशन हिस्ट्रीसह Android मध्ये येणार नवी प्रायव्हसी, सिक्योरिटी फीचर्स

39 रुपयांचा प्लॅन : यामध्ये ग्राहकांना 100 एमबी हायस्पीड डेटा (Data) आणि अमर्यादित कॉलिंगची (Unlimited Calling) सुविधा आहे. 14दिवसांची वैधता असून हाय स्पीड डेटा संपल्यानंतर 64 केबीपीएस स्पीडने डेटा मिळतो.

69 रुपयांचा प्लॅन : यामध्ये 0.5 जीबीचा हाय स्पीड डेटा आणि अमर्यादित कॉलिंग उपलब्ध आहे. 14 दिवस वैधता असलेल्या या योजनेत 7 जीबीडेटा मिळतो. हाय स्पीड डेटा संपल्यानंतर 64 केबीपीएस स्पीडने डेटा मिळतो.

जिओच्या 75, 125, 155, 175 आणि 185 रुपयांच्या प्रीपेड प्लॅन्सवरही बाय वन गेट वन ऑफर उपलब्ध आहे. या सर्व योजनांना 28 दिवसांची वैधता आहे. 75 रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज 0.1 जीबी, 125 रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज 0.5 जीबी, 155 रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज 1 जीबी तर 185 रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज 2 जीबी हायस्पीड डेटा मिळतो.

एअरटेल (Airtel)

एअरटेल या देशातील सर्वात मोठ्या नेटवर्क प्रोव्हायडर कंपनीनं आपल्या 5.5 कोटींपेक्षा जास्त अल्प उत्पन्न गटातील ग्राहकांना 49 रुपयांचा प्रीपेड रिचार्ज विनामूल्य दिला आहे. या योजनेत ग्राहकांना 100 एमबी डेटा आणि 38 रुपयांचा टॉकटाइम दिला आहे. यासाठी 28 दिवसांची वैधता आहे. याशिवाय 28 दिवसांची वैधता असलेल्या 79 रुपयांच्या प्लॅनमध्ये 128 रुपयांचा टॉकटाइम आणि 200 एमबी डेटा दिला आहे. एसटीडी कॉलसाठी प्रति मिनिट 60 पैसे शुल्क आहे.

व्होडाफोन-आयडीया (Vodafone-Idea)

व्होडाफोन-आयडीयानं देखील आपल्या साडेपाच कोटींपेक्षा अधिक ग्राहकांना 49 रुपयांचा प्रीपेड रिचार्ज मोफत दिला आहे. याशिवाय डबल फायद्याची योजनाही दाखल केली आहे.

हे वाचा - Twitter ची मोठी घोषणा; Blue Tick साठी तुम्हीही करू शकता अर्ज, असं करा अप्लाय

कंपनीनं 49 आणि 79 रुपयांचे प्रीपेड प्लॅन्स आणले आहेत. 49 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये ग्राहकांना 100 एमबी डेटा आणि 38 रुपयांचा टॉकटाइम दिला आहे. यासाठी 28 दिवसांची वैधता आहे. याशिवाय 28 दिवसांची वैधता असलेल्या 79 रुपयांच्या प्लॅनचे कॉम्बो व्हाउचर दाखल केले असून यात 128 रुपयांचा टॉकटाइम आणि 200 एमबी डेटा दिला आहे. लोकल आणि एसटीडी कॉलसाठी प्रति मिनिट 60 पैसे शुल्क आहे.

First published:

Tags: Airtel, Mobile, Plans, Recharge, Relince jio, Sim, Vodafone, Vodafone idea tariff plan