मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /गुडन्यूज! Flipkartवर मिळतोय खूपच स्वस्तात मिळतोय Nothing स्मार्टफोन, पाहा डिटेल्स

गुडन्यूज! Flipkartवर मिळतोय खूपच स्वस्तात मिळतोय Nothing स्मार्टफोन, पाहा डिटेल्स

गुडन्यूज! Flipkartवर मिळतोय खूपच स्वस्तात मिळतोय Nothing स्मार्टफोन, पाहा डिटेल्स

गुडन्यूज! Flipkartवर मिळतोय खूपच स्वस्तात मिळतोय Nothing स्मार्टफोन, पाहा डिटेल्स

फ्लिपकार्टवर मिळत असलेल्या अनेक डिस्काउंट व ऑफरपैकी एक नथिंग फोन (1) स्मार्टफोनवरही उपलब्ध आहे. या फोनचं 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेलं बेस मॉडेल 25,999 इतक्या कमी किमतीत मिळत आहे.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

    मुंबई, 18 जानेवारी : मकर संक्रांतीनंतर आता ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म्सवर प्रजासत्ताक दिनानिमित्त सेल सुरू झाले आहेत. ऑनलाइन कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवरही ‘बिग सेव्हिंग डेज’ सेल चालवत आहे. या सेलची सुरुवात 15 जानेवारीपासून सुरू झाली आणि तो 20 जानेवारीपर्यंत सुरू राहील. सध्या या सेलमध्ये ग्राहकांना कपडे, मोबाईल, लॅपटॉप, किचन अप्लायन्सेसवर मोठी सूट दिली जात आहे. त्यामुळे ग्राहकांना अगदी स्वस्तात त्यांच्या आवडीच्या वस्तू खरेदी करण्याची चांगली संधी आहे.

    फ्लिपकार्टवर मिळत असलेल्या अनेक डिस्काउंट व ऑफरपैकी एक नथिंग फोन (1) स्मार्टफोनवरही उपलब्ध आहे. या फोनचं 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेलं बेस मॉडेल 25,999 इतक्या कमी किमतीत मिळत आहे. 256GB स्टोरेज असलेला फोन 27,499 रुपयांमध्ये विकला जात आहे. नथिंग फोन (1) हा आतापर्यंतच्या सर्वात कमी किमतीत विकला जातोय. तुम्हीही फोन घेण्याच्या विचारात असाल तर फ्लिपकार्टचा हा सेल तुमच्यासाठी चांगली संधी ठरू शकते.

    इतकंच नाही तर तुम्हाला या फोनवर काही बँक ऑफरदेखील मिळत आहेत. ग्राहकांना ICICI आणि Citi बँक कार्डसह 10% इन्स्टंट डिस्काउंट दिलं जातंय. या शिवाय, नथिंग फोन (1) स्मार्टफोनच्या खरेदीवर एक्सचेंज डिस्काउंटदेखील मिळवता येऊ शकतं.

    हेही वाचा: थारला टक्कर देणार मारुती Jimny! काय आहेत फीचर्स पाहा PHOTO

    नथिंग फोन (1) फीचर्स:

    नथिंग फोन (1) ब्लॅक आणि व्हाईट कलर ऑप्शनमध्ये देण्यात आला आहे. नथिंग फोनचे (1) मुख्य आकर्षण म्हणजे त्याचा नवीन ग्लिफ इंटरफेस आहे. ऑप्टिक्ससाठी, स्मार्टफोनमध्ये 50 एमपी सेन्सरसह मागील बाजूस ड्युएल कॅमेरा देण्यात आला आहे. मुख्य कॅमेरा सोनी IMX766 चा आहे. फोनमध्ये नाईट मोड आणि सीन डिटेक्शनदेखील आहे. ते फीचर तुमचं शूटिंग आपोआप ओळखतं आणि शॉटसाठी तुम्हाला सर्वोत्तम सेटिंग्ज सुचवतं.

    नथिंग फोन (1) 6.55-इंच फुल HD+ OLED डिस्प्लेसह 60Hz ते 120 Hz अ‍ॅडॉप्टिव्ह रिफ्रेश रेटने सुसज्ज आहे. स्क्रीन HDR10+ आहे आणि त्याच्या मागे व समोर कॉर्निंग गोरिला ग्लास 5 चा लेअर देण्यात आला आहे. नथिंग स्मार्टफोन हा मिड रेंज क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 778+ ऑक्टा-कोअर प्रोसेसर असलेला फोन आहे.

    बॅटरीबद्दल बोलायचं झाल्यास हा स्मार्टफोन प्रत्येक चार्जसह 18 तासांपर्यंत आणि स्टँडबायवर दोन दिवसांपर्यंत टिकतो, असा दावा कंपनीने केला आहे. फोनमध्ये फास्ट चार्जिंग देण्यात आलंय आणि तो फक्त 30 मिनिटांच्या चार्जमध्ये 0 ते 50% पर्यंत चार्ज होतो. तसेच नथिंग इअर (1) बरोबर 5W चा चार्जर तुम्हाला मिळेल. या चार्जरला रिव्हर्स चार्जिंगचा इंडिकेटर बसवलेला आहे, त्यामुळे त्याची बॅटरी जादा चार्ज होत नाही.

    First published:

    Tags: Discount offer, Flipkart, Smartphone