मुंबई : ऑटो एक्स्पो २०२३ च्या मेळाव्यात अनेक कंपन्या सहभागी होणार आहेत. यामध्ये कंपन्या आपल्या आगामी कारचे डिझाइन आणि लाँचिंग यासोबत टेक्नोलॉजीची माहिती देणार आहेत. अगदी मारुती ते टाटा मोटर्सपर्यंत अनेक बड्या कंपन्या यामध्ये सहभागी होणार आहेत.
2/ 7
यामध्ये थारच्या मॉडेलला टक्कर देणारी मारुती जिम्नी नावाची कार देखील असणार आहे. ही कार ऑगस्ट महिन्यात लाँच होणार असून आज या मेळाव्यात त्याचं एक मॉडेल प्रदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. ही जिमी कार ग्राहकांना साधारण ऑगस्टनंतर उपलब्ध होऊ शकते. या कारची किंमतही कमी असेल अशी चर्चा आहे.
3/ 7
अनेक जण जिम्नी आणि थार या दोन्ही गाड्यांची तुलना करत आहेत. तसं पाहायला गेलं तर या दोन्ही गाड्यांचं मॉडेल दिसायला बऱ्यापैकी सारखं आहे. मात्र फीचर्स वेगळे असणार आहेत.
4/ 7
मारुती सुझुकी जिम्नी बॉडी-ऑन-फ्रेम डिझाइनवर आधारित आहे, म्हणजेच बॉडी वेगळ्या चेसिसवर तयार केली गेली आहे. मारुती सुझुकीच्या इतर कारप्रमाणे त्यांच्याकडे मोनोकॉक चेसिस आहे.
5/ 7
महिंद्रामुळे थारला एक वेगळी ओळख मिळाली आहे. थार गाडी डोंगराळ भागातही किंवा कच्च्या रस्त्यावरुन नेता येते. त्याच बेसवर मारुतीनेही जिम्नी गाडी आणली आहे.
6/ 7
१.५ लीटरच्या सीरिजमधील इंजीन या कारला देण्यात आलं आहे. पावर आउटपुट 102bhp आणि 137Nm पीक टॉर्क आहे. यापेक्षा अर्थात जास्त फीचर थारला मिळतात मात्र थारची किंमतीही तेवढी वाढते, त्यात काहीच शंका नाही.
7/ 7
पावर आउटपूटमध्ये थारने बाजी मारली असली तरी आता ही गाडी लाँच झाल्यानंतर थारला कडवी टक्कर देणार असल्याची चर्चा मार्केटमध्ये सुरू आहे. जिम्नीची किंमती किती असेल त्यात किती लोकांसाठी बसण्याची जागा असेल याबाबत सविस्तर माहिती आज कंपनीकडून दिली जाण्याची शक्यता आहे.