मुंबई, 22 फेब्रुवारी: नवीन मोबाइल फोन खरेदी करण्यासाठी, तुम्ही फ्लिपकार्ट किंवा अॅमेझॉनसारख्या (Amazon) ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मचा वापर करता. आता या ई-कॉमर्स (Best E-Commerce site in India) प्लॅटफॉर्मवर नवीन फोन खरेदी करण्यासोबतच तुम्ही जुने मोबाइल विकूही शकता. फ्लिपकार्टनं (Flipkart latest deals) जुन्या स्मार्टफोनसाठी (Smartphone) सेल बॅक स्कीम (Sell Back Scheme) सुरू केली आहे. फ्लिपकार्टचं म्हणणं आहे, की या स्कीममुळे ग्राहकांना घरातल्या निरुपयोगी स्मार्टफोनच्या विक्रीतून पैसे तर मिळतीलच, शिवाय ई-कचऱ्यापासून काही प्रमाणात सुटकाही मिळेल. सध्या फ्लिपकार्टनं ही स्कीम फक्त जुन्या स्मार्टफोनसाठी सुरू केली आहे; मात्र लवकरच तुम्ही तुमचे जुने फीचर फोन्सदेखील या ठिकाणी विकू शकाल.
दिल्ली, मुंबई, कोलकाता, पाटणा यांसह देशातल्या 1700हून अधिक शहरांमध्ये फ्लिपकार्टची ही स्कीम सुरू करण्यात आली आहे. फ्लिपकार्टची ही सेल बॅक स्कीम सर्व ब्रँडच्या स्मार्टफोनसाठी उपलब्ध आहे. त्यामुळे तुम्ही तुमचा कोणताही जुना स्मार्टफोन या ठिकाणी विकू शकता. जुन्या आणि वापरात नसलेल्या स्मार्टफोनमुळे तयार होणारा ई-वेस्ट म्हणजेच इलेक्ट्रॉनिक कचरा कमी करण्यासाठी कंपनीनं ही स्कीम सुरू केली आहे.
इंटरनेटशिवायही वापरता येऊ शकतं Gmail; त्यासाठी करा फक्त 'ही' एक गोष्ट
कशी आहे स्कीम?
फ्लिपकार्ट सेल बॅक स्कीममध्ये कोणताही जुना फोन विकण्यासाठी, तुम्हाला फ्लिपकार्टनं विचारलेल्या काही प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील. या प्रश्नांमध्ये तुम्हाला फोनचा ब्रँड (Brand), मॉडेल (Model) इत्यादी माहिती भरावी लागेल. प्रश्नांची उत्तरं दिल्यानंतर 48 तासांच्या आत कंपनीचे कर्मचारी तुमच्याकडून जुना फोन कलेक्ट करण्यासाठी येतील. फोनची पडताळणी केल्यानंतर, तुम्हाला गिफ्ट व्हाउचर (Gift Voucher) दिलं जाईल. हे गिफ्ट व्हाउचर फ्लिपकार्टवरून कोणतीही वस्तू खरेदी करण्यासाठी वापरलं जाऊ शकतं.
जुन्या फोनमुळं तयार होतो ई-कचरा
ही स्कीम लाँच करताना फ्लिपकार्टने सांगितलं, की आयडीसीच्या (IDC) अहवालानुसार, सध्या भारतात सुमारे 125 दशलक्ष जुने फोन आहेत. त्यापैकी फक्त 20 टक्के रिफर्बिश मार्केटमध्ये (Refurbish Market) पोहोचतात. जवळपास 85 टक्क्यांहून अधिक जुने फोन कचऱ्यात जात आहेत. ही गोष्ट पर्यावरणासाठी (Environment) अत्यंत धोकादायक आहे. जुन्या फोनची विल्हेवाट लावण्यासाठी ई-कचरा व्यवस्थापन (E-waste Management) करण्याची गरज आहे. फ्लिपकार्टचं म्हणणं आहे, की सेल बॅक स्कीममुळं युझर्सना त्यांचे जुने फोन विकण्यासाठी एक विश्वासार्ह प्लॅटफॉर्म मिळू शकेल. शिवाय त्यांना फोनची योग्य किंमतही मिळेल.
कसा विकाल तुमचा जुना फोन?
फ्लिपकार्टवर जुना फोन विकण्याची प्रक्रिया अतिशय सोपी आहे. त्यासाठी तुम्हाला फ्लिपकार्ट अॅपमधल्या मेनूबारवर जावं लागेल. तेथे तुम्हाला सेल बॅक ऑप्शन दिसेल. या ऑप्शनवर टॅप करताच, तुम्हाला सेल बॅक प्रोग्राममध्ये नेलं जाईल. त्या ठिकाणी सेल नाऊ (Sell Now) ऑप्शनवर टॅप करा आणि विचारलेल्या सोप्या प्रश्नांची उत्तरं द्या. या प्रश्नांमध्ये तुम्हाला फोनचा ब्रँड, मॉडेल नंबर, IMEI नंबर इत्यादी माहिती भरावी लागेल. नंतर तुम्हाला तुमचं लोकेशन आणि इतर काही माहिती भरावी लागेल. याच ठिकाणी तुम्ही फ्लिपकार्ट एक्झिक्युटिव्हला फोन नेण्याची वेळही शेड्यूल करू शकता. ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कंपनीचे कर्मचारी तुमच्याकडून जुना फोन घेऊन जातील.
iPhone 13 स्वस्तात खरेदीची संधी, Flipkart ची जबरदस्त बंपर ऑफर
फ्लिपकार्टच्या या सेल बॅक स्कीमचा लाभ घेऊन तुम्ही तुमचे जुने स्मार्टफोन सहज विकू शकता. यातून तुम्हाला एखादी नवीन वस्तू खरेदी करण्यासाठी पैसे मिळतील आणि घरातला ई-कचराही कमी होईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Flipkart, Sale offers, Technology