वैज्ञानिक चमत्कार.. जन्माला येतंय असं शहर जिथे सगळी कामं करणार रोबोट

वैज्ञानिक चमत्कार.. जन्माला येतंय असं शहर जिथे सगळी कामं करणार रोबोट

२०२१ मध्ये विज्ञानाच्या चमत्काराचा आणखी एक अविष्कार जन्माला येणार आहे. जीवंत प्रयोगशाळा असा उल्लेख असलेलं 'वोवेन सिटी' नावाचं शहर १७५ एकर जागेत बसवलं जाणार आहे.

  • Share this:

जपान, 11 जानेवारी: विज्ञानाने आजवर अनेक अशक्य गोष्टी शक्य करुन दाखवल्या आहेत. असाच एक चमत्कार लवकरच जन्माला येणार आहे. 2021 मध्ये असं शहर जन्माला येणार आहे जिथे वैज्ञानिक चमत्कारांचे प्रयोग केले जाणार आहेत. संशोधकांसाठीची जिवंत प्रयोगशाळा असा उल्लेख या शहराचा करण्यात आला आहे. 'वोवेन सिटी' असं या शहराचं नाव असेल. जपानची ऑटोमोबाइल कंपनी टोयोटा या शहराची निर्मिती कऱणार आहे. या शहराचं वैशिष्ट्य असं की, सर्व कामे रोबोट करणार आहेत. या शहरात फ्रिजमध्ये सामान ठेवण्यापासून ते घरातला कचरा फेकण्यापर्यंत सगळी कामं रोबोट करणार आहे. हे शहर पूर्णत: आधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण असेल. विज्ञानाच्या शक्तीची अनुभूती देणारं हे शहर जपानची राजधानी टोकियो शहरापासून अवघ्या 100 किमी अंतरावर उदयास येत आहे.

कसं असेल रोबोटचं शहर

या शहरात 2000 लोकसंख्या असेल असं सांगण्यात येत आहे. 2021 मध्ये या शहराच्या कामाला सुरुवात होणार आहे. 175 एकर जागेत शहर उदयाला येणार आहे. या शहरातलं प्रत्येक घर आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त असेल. जगभरातील इतर शहरांपेक्षा 'वोवेन सिटी' हे शहर खूप वेगळं असेल. इथे वाहन चालकाची (driver)  गरज लागणार नाही. याचाच अर्थ इथे ऑटोमॅटिक (Automatic cars) पद्धतीने कार चालणार आहेत. कार चालकाशिवाय वाहन चालवलं जाईल. ज्याला कंपनीने इ पॅलेट (Toyota’s ‘e-Palette’)असं नाव दिलं आहे. सोबतच वायु प्रदुषणाचा सामना करण्यासाठी इथे खास उपाय करण्यात येणार आहे. त्यामुळे वायु प्रदुषणाचं प्रमाण शुन्य असेल. इथली घरं ही लाकडापासून तयार केली जाणार आहे. ज्याच्या निर्मितीत रोबोची मदत घेतली जाणार आहे.

नवनवीन शोध लावणाऱ्या संशोधकांसाठी ही जागा खास असेल. त्या संशोधकांचा असिस्टंट म्हणून रोबोट इथे काम करणार आहे. विज्ञानाच्या चमत्काराचं हे शहर आर्टिफिशियल इंटेलिजेंसला (Artificial Intelligence) एका वेगळ्या स्तरावर घेऊन जाणारं आहे.

हे शहर देईल आनंद आणि तणावापासून मुक्ती

या शहरात प्रत्येक काम करण्यासाठी रोबो सेवेत असणार आहे. त्यामुळे लोकांना खुप साऱ्या सुविधा एकाच ठिकाणी मिळणार आहेत. इथे राहणारी व्यक्ती तणावापासून कशी दूर राहील याची काळजी तंत्रज्ञानाच्या मदतीने घेतली जाणार आहे. प्रत्येक गोष्टीत एक आल्हादायक आणि आनंद देणारा असा अनुभव इथे घेता येणार आहे. तंत्रज्ञानाचा एक वेगळा अविष्कार या शहराच्या रुपाने अनुभवता येइल. स्मार्ट टेक्नॉलॉजीच्या (Smart Technologies) मदतीने शहराचा संपूर्ण मास्टर प्लान (MASTER PLAN) तयार करण्यात आला आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: japan
First Published: Jan 11, 2020 03:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading