मराठी बातम्या /बातम्या /Viral /Robot ला तुमचा चेहरा वापरण्याची परवानगी द्या आणि मिळवा 1.5 कोटी रुपये, काय आहे ही अनोखी ऑफर?

Robot ला तुमचा चेहरा वापरण्याची परवानगी द्या आणि मिळवा 1.5 कोटी रुपये, काय आहे ही अनोखी ऑफर?

कंपनीचं असं म्हणणं आहे की जर एखाद्या व्यक्तीने आपल्याप्रमाणे चेहरा रोबोटसाठी वापरायला (Human Face on Robots) दिला तर कंपनी त्यांना दीड कोटी रूपयेही देऊ शकते

कंपनीचं असं म्हणणं आहे की जर एखाद्या व्यक्तीने आपल्याप्रमाणे चेहरा रोबोटसाठी वापरायला (Human Face on Robots) दिला तर कंपनी त्यांना दीड कोटी रूपयेही देऊ शकते

कंपनीचं असं म्हणणं आहे की जर एखाद्या व्यक्तीने आपल्याप्रमाणे चेहरा रोबोटसाठी वापरायला (Human Face on Robots) दिला तर कंपनी त्यांना दीड कोटी रूपयेही देऊ शकते

नवी दिल्ली 27 नोव्हेंबर : ज्या व्यक्तींना जुळे भाऊ-बहीण असतात, त्यांना आपल्याप्रमाणे दिसणारी व्यक्ती पाहण्याची सवय होऊन जाते. मात्र तुम्हाला जुळा भाऊ किंवा बहीण नसेल आणि अचानक तुमच्याप्रमाणेच दिसणारी व्यक्ती तुमच्यासमोर आली तर निश्चितच कोणीही हैराण होईल. मात्र आता तुम्हाला अगदी तुमच्याप्रमाणेच दिसणारा व्यक्ती लाईव्ह पाहण्याची संधी एक कंपनी देत आहे. रोबोट बनवणारी ही कंपनी ऑफर देत आहे की जर तुम्ही तुमचा चेहरा वापरण्याची परवानगी दिली तर तुम्हाला 1.5 कोटी रुपये मिळू शकतील (Robotics Company offering 1.5 crore rupees).

अमेरिकेची रोबोटिक कंपनी (American Robotics Company) प्रोमोबॉट सध्या काही वॉलेंटियर्सच्या शोधात आहे. कंपनी काही रोबोट बनवत आहे, ज्यासाठी त्यांना काही व्यक्तींचे चेहरे द्यायचे आहेत. कंपनीचं असं म्हणणं आहे की जर एखाद्या व्यक्तीने आपल्याप्रमाणे चेहरा रोबोटसाठी वापरायला (Human Face on Robots) दिला तर कंपनी त्यांना दीड कोटी रूपयेही देऊ शकते. यासाठी या व्यक्तीला केवळ आपला चेहरा वापरण्याचे अधिकार कंपनीला द्यावे लागतील.

साल 2023 पर्य़ंत माणसाचा चेहरा असलेला रोबोट मॉल्स, विमानतळ, हॉटेलमध्ये दिसू शकतो. कंपनीकडून बनवला जात असलेला ह्यूमनॉईड रोबोट असिस्टंट अतिशय अनोखा असेल. जो आवश्यक ठिकाणी लोकांच्या मदतीसाठी येईल. डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, सध्या कंपनीने ही स्किम इंग्लंडच्या लोकांसाठी ठेवली आहे. परवानगी देणाऱ्या व्यक्तीचा चेहरा अमेरिका आणि मिडल ईस्टमध्ये दिसेल.

कंपनीने दिलेल्या माहितीत सांगितलं की कंपनी फेशियल रेकगनेशन. स्पीच. ऑटोनॉमस नेविगेशन आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या दिशेनं काम करत आहे. कंपनीने म्हटलं की आम्ही 2019 पासून ह्यूमनॉइड रोबोट बनवण्यासाठी काम करत आहोत. आमचा नवीन क्लायंट लार्ज स्केल प्रोजेक्टवर काम करत आहे, यासाठी नवीन रोबोटचा अॅपियरंस हवा आहे. परवानगी न घेता कोणाचा चेहरा वापरून त्यांना कोणतंही संकट ओढावून घ्यायचं नाही. चेहरा वापरण्याची परवानगी देण्यासाठी अप्लाय करणारे कोणत्याही वयाचे किंवा स्त्री/ पुरुष कोणीही असू शकतात. तुम्हाला हे जाणून हैराणी होईल की कंपनीचे रोबोट आतापर्यंत 43 देशांमध्ये काम करत आहेत.

First published:
top videos

    Tags: Robot, Viral news