Home /News /technology /

आता 4G विसराल! 2021 पासून भारतात सुरू होणार 5G कनेक्शन- रिपोर्ट

आता 4G विसराल! 2021 पासून भारतात सुरू होणार 5G कनेक्शन- रिपोर्ट

2021 पर्यंत भारतीय 5G कनेक्शनचा आनंद घेऊ शकतात. एका प्रसिद्ध टेलिकॉम कंपनीच्या अहवालात याबाबत स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

    नवी दिल्ली, o1 डिसेंबर: टेलिकॉम इंडस्ट्री (Telecom Industry) झपाट्याने पुढे जात आहे. आता कालांतराने  4G देखील मागे पडेल अशी परिस्थिती देशामध्ये निर्माण झाली आहे. किंबहुना 2021 पर्यंत भारतीय 5G कनेक्शनचा आनंद घेऊ शकतात. पुढील वर्षी जर स्पेक्ट्रम (Spectrum) लिलावास सुरुवात झाली तर भारतात 2021 मध्ये पहिले 5G कनेक्शन मिळू शकते, असा दावा एरिक्सन (Ericsson) या टेलिकॉम कंपनीने त्यांच्या एका अहवालात केला आहे. जगात 2026 पर्यंत 5G कनेक्शनची संख्या 3.5 अब्जांपर्यंत पोहोचेल, तर भारतात ही सेवा वापरणाऱ्यांची संख्या 35 कोटी असेल असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. याबाबत एरिक्सन नेटवर्क सोल्यूशनचे प्रमुख (दक्षिण-पूर्व अशिया, ओशियाना आणि भारत) नितीन बन्सल (Nitin Bansal) म्हणाले, की स्पेक्ट्रम लिलावास जर पुढील वर्षी सुरुवात झाली तर भारतात 2021 मध्ये पहिले 5G कनेक्शन मिळू शकते. 2020 मधील एरिक्सन मोबिलिटी अहवालानुसार, जगभरातील एकूण लोकसंख्येच्या 15 टक्के म्हणजेच एक अब्ज नागरिकांपर्यंत 5G कनेक्शन पोहोचलेले असेल. (हे वाचा-Flipkart Flipstart Days Sale: ऑफरमध्ये मिळतील महागडे लॅपटॉप्स, इथे तपासा यादी) अहवालानुसार, 2026 पर्यंत जगभरातील एकूण लोकसंख्य़ेच्या तुलनेत 60 टक्के लोकांना 5G सेवा उपलब्ध होईल. त्यावेळी ही सेवा वापरणाऱ्या ग्राहकांचा आकडा 3.5 अब्ज होईल, अशी अपेक्षा आहे. याच वेळी भारतात 5G सेवा वापरणाऱ्या ग्राहकांचा आकडा 35 कोटींवर असेल. हे प्रमाण एकूण मोबाईल वापरणाऱ्यांच्या तुलनेत 27 टक्के असेल. 2021 पर्यंत भारतात येणार 5G बन्सल म्हणाले, की 5G सेवांसाठी लिलावाकरता जाहिर केलेल्या अंतिम मुदतीनुसार 2021 मध्ये भारताला पहिले 5G कनेक्शन मिळू शकते. भारतात स्मार्टफोन (Smartphone) वापरणारी एक व्यक्ती प्रति महिना सरासरी 15.7 जीबी इंटरनेटचा वापर करते. जगातील अन्य देशांच्या तुलनेत हे प्रमाण सर्वाधिक आहे. 2020 मध्ये भारतात 4G तंत्रज्ञानाचं वर्चस्व होतं. एकूण मोबाईल वापरकर्त्यांपैकी 63 टक्के ग्राहक हे 4G चा वापर करतात. 2026 पर्यंत 3G सेवा बंद होईल अशी शक्यता आहे, असे बन्सल यांनी स्पष्ट केले. (हे वाचा-नवी फोर व्हिलर घ्यायचा विचार करताय? लाँच होणार या जबरदस्त कार्स;जाणून घ्या किमती) 2020 मध्ये भारतात स्मार्टफोन सब्सक्रिप्शनमध्ये वाढ होऊन ते 76 कोटीपर्यंत पोहोचले आहे. 2026 पर्यंत ते 7 टक्क्यांच्या सीजीआरवरुन सुमारे 1.2 अब्जांपर्यंत पोहचेल, अशी अपेक्षा आहे. कमी दराने मोबाईल ब्रॉडबँड सेवा, स्वस्त स्मार्टफोन आणि अधिकाधिक लोकांचा ऑनलाईनकडे असलेला कल यामुळे मासिक यूजेसमध्ये वाढ होत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Telecom

    पुढील बातम्या