मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

हौसेला मोल नाही! 39.50 लाखाच्या कारसाठी तब्बल 34 लाख रुपयांचा VIP रजिस्ट्रेशन नंबर

हौसेला मोल नाही! 39.50 लाखाच्या कारसाठी तब्बल 34 लाख रुपयांचा VIP रजिस्ट्रेशन नंबर

एका व्यक्तीने आपल्या कारसाठी व्हिआयपी रजिस्ट्रेशन नंबर तब्बल 34 लाख रुपयांची मोठी रक्कम देऊन खरेदी केला आहे. विशेष रजिस्ट्रेशन नंबरसाठी 34 लाख रुपये म्हणजे, सध्याच्या दिवसांतील सर्वाधिक लावली गेलेली बोली आहे.

  • Published by:  Karishma Bhurke

नवी दिल्ली, 28 नोव्हेंबर : हॉलिवूड चित्रपट जेम्स बॉन्डमध्ये, जेम्स बॉन्डला 007 हा कोड नेम दिलेला असतो. या सीरीजमध्ये जेम्स बॉन्ड कारचा शौकिन असतो. संपूर्ण जगभरात कार शौकिन लोकांची जेम्स बॉन्ड आणि त्याच्या 007 कोड नेमला पसंती आहे. अनेक जण त्यांच्या कारसाठी व्हीआयपी रजिस्ट्रेशन नंबर 007, कितीही किंमत देऊन खरेदी करण्याच्या तयारीत असतात.

अशीच एक घटना अहमदाबादमधल्या (Ahmedabad) एका व्यक्तीसोबत घडलीये. अहमदाबादमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने आपल्या कारसाठी 007 रजिस्ट्रेशन नंबर तब्बल 34 लाख रुपयांची मोठी रक्कम, इतकी मोठी एक्स्ट्रा किंमत देऊन खरेदी केला आहे.

39.50 लाखांच्या कारसाठी 34 लाख रुपयांचा रजिस्ट्रेशन नंबर -

गुजरातच्या अहमदाबादमध्ये, एक ट्रान्सपोर्ट मालक आशिक पटेलने एका फॅन्सी रजिस्ट्रेशन नंबर 007 साठी तब्बल 34 लाख रुपये खर्च केले आहेत. पटेल या रजिस्ट्रेशन नंबरचा वापर आपल्या नव्या टोयोटा फॉर्च्यूनर कारसाठी करणार आहेत. या टोयोटा फॉर्च्यूनर कारची किंमत जवळपास 39.50 लाख रुपये आहे.

(वाचा - गाड्यांच्या रजिस्ट्रेशन ट्रान्सफर नियमांमध्ये होणार हे मोठे बदल)

अहमदाबाद आरटीओनुसार, विशेष रजिस्ट्रेशन नंबरसाठी 34 लाख रुपये म्हणजे, सध्याच्या दिवसांतील सर्वाधिक लावली गेलेली बोली आहे. संपूर्ण रक्कम भरल्यानंतर विशेष 007 रजिस्ट्रेशन नंबर पटेल यांना त्वरित अधिकृतपणे देण्यात येणार आहे.

फॅन्सी नंबर 001 साठी सर्वाधिक दुसरी मोठी बोली -

अहमदाबाद आरटीओने दिलेल्या माहितीनुसार, फॅन्सी नंबर 001 साठी दुसरी सर्वाधिक रकमेची बोली लावण्यात आली. 5.65 रुपयांची ही बोली होती. त्यानंतर 0369 नंबरसाठी 1.40 लाख रुपये बोली लावण्यात आली. अशाप्रकारचे 24 नंबर ठेवण्यात आले आहेत, ज्यासाठी 622 लोकांनी बोली लावली.

First published:

Tags: Ahmedabad, Car, RTO