मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

फेसबुकवर फेक बातम्या ओळखणं आता सोपं; फक्त या टिप्स फॉलो करा

फेसबुकवर फेक बातम्या ओळखणं आता सोपं; फक्त या टिप्स फॉलो करा

तुम्हालाही फेसबुकवर येणाऱ्या फेक बातम्या ओळखण्यात अडचण येते.

तुम्हालाही फेसबुकवर येणाऱ्या फेक बातम्या ओळखण्यात अडचण येते.

तुम्हालाही फेसबुकवर येणाऱ्या फेक बातम्या ओळखण्यात अडचण येते.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Rahul Punde

मुंबई, 1 ऑक्टोबर : भारतात सोशल नेटवर्किंग साइट फेसबुक वापरणाऱ्यांची संख्या कोट्यवधीच्या घरात आहे. ही संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. गेल्या काही वर्षांपासून फेसबुकच्या माध्यमातून फेक न्यूजचा सर्वाधिक प्रसार होत असल्याचे पाहायला मिळत आहे. तुम्ही तुमच्या टाइमलाइनमध्ये फेक आयडी आणि खोट्या बातम्याही अनेकदा पाहिल्या असतील. अशा परिस्थितीत, आपल्याला फेक न्यूज ओळखता येणं फार आवश्यक आहे. तुम्ही काही टिप्स फोटो करुन अशा बातम्य सहज ओळखू शकता.

फेक न्यूजचे दिवसेंदिवस वाढत जाणारे जाळे पाहता 2017 मध्ये फेसबुकनेच फेक न्यूज शोधण्याच्या काही मार्गांची माहिती दिली होती. त्यावेळी फेसबुकने देशातील प्रमुख वृत्तपत्रांमध्ये जाहिराती प्रसिद्ध करून या पद्धतींची माहिती दिली होती. आज या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला फेसबुकवरील फेक न्यूज ओळखण्याच्या पद्धतींबद्दल माहिती देणार आहोत.

शीर्षक : कोणत्याही बातमीची हेडलाईन खूप आकर्षक वाटत असेल तर तुम्ही सावध व्हा. बर्‍याचदा फेक न्यूजचा मथळा जास्त आकर्षक आणि मोठ्या अक्षरात लिहिलेला असतो. तसेच उद्गारवाचक चिन्हे वापरतात.

फोटो: बातमीत वापरलेला फोटो पाहून फेक न्यूज ओळखता येते. या बातम्यांमध्ये छेडछाड आणि फोटोशॉप केलेल्या छायाचित्रांचा वापर दिसून येतो. हे फोटो बारकाईने पाहिले की ओळखता येतात.

तारीख: बनावट बातम्या ओळखण्यासाठी बातम्यांची टाइमलाइन खूप फायदेशीर ठरू शकते. तारखा बदलून फेक न्यूज पसरवण्याचे काम केले जाते. जर तुम्हाला वाटत असेल की बातम्या खोट्या असू शकतात, तर गुगलवर अशाच बातम्या शोधण्याचा प्रयत्न करा.

वाचा -भारताचा 1G ते 5G प्रवास कसा होता? सुटकेसइतका मोबाईल ते खिशात मावणारा स्मार्टफोन

यूआरएल : जर बातमीची URL इतर कोणत्याही स्त्रोताशी मिळतीजुळती असेल तर ते फेक न्यूजचे लक्षण आहे. खोट्या बातम्या पसरवणारे लोक मूळ बातमीच्या URL मध्ये छेडछाड करून असे काम करतात.

स्रोत: जेव्हाही तुम्ही फेसबुकवर कोणतीही बातमी पाहाल, तेव्हा त्याचा स्रोत नक्कीच तपासा. जर बातम्या स्त्रोताशिवाय असतील तर त्या वेबसाइटचा About विभाग तपासा. तसेच स्त्रोत क्रॉस चेक केल्याची खात्री करा.

फॉर्मेट : खोट्या बातम्यांमध्ये सहसा खूप सामान्य स्पेलिंग मिस्टेक असतात. बातम्यांची रचना देखील असामान्य असते. अशा चुका असलेल्या वेबसाइटवर विश्वास ठेवू नये.

बातम्या आणि मनोरंजन यातील फरक

आजच्या काळात काही संकेतस्थळे बातम्यांच्या नावाने विनोद, व्यंगचित्र आणि कथाही प्रसिद्ध करतात. अशा परिस्थितीत संपूर्ण बातमी वाचल्यानंतरच बातमीच्या सत्यतेबद्दल खात्री करा. नुसती हेडलाईन बघून बातमी खरी मानू नये.

First published:

Tags: Facebook, Fake news