मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

मोदी सरकारनं 40 हजारांवर अकाउंट्सची फेसबुककडे मागितली होती माहिती; facebook Transparency Report मधून उघड

मोदी सरकारनं 40 हजारांवर अकाउंट्सची फेसबुककडे मागितली होती माहिती; facebook Transparency Report मधून उघड

 तुमचा डेटा लीक झाला असेल किंवा लीक झाला नसेल, तरी खाली मेसेजमध्ये याबाबतची माहिती दिसेल.

तुमचा डेटा लीक झाला असेल किंवा लीक झाला नसेल, तरी खाली मेसेजमध्ये याबाबतची माहिती दिसेल.

अमेरिेकेपाठोपाठ भारत सरकारकडून emergency disclosure सर्वाधिक विनंत्या आल्या असल्याचं Facebook ने सांगितलं. यूजर डेटा काढण्यात भारत सरकार आघाडीवर आहे.

नवी दिल्ली, 21 मे: फेसबुकने (facebook) अलीकडेच त्याला जगभरातून मिळालेल्या सरकारी रिक्वेस्टचा अहवाल शेअर केला आहे. भारत सरकारने (Indian Government) जुलै ते डिसेंबर 2020च्या दरम्यान युझर डेटासंबंधी माहिती मिळवण्यासाठी (user data) 40,300रिक्वेस्ट पाठवल्याचं फेसबुकने गुरुवारी सांगितलं. यापैकी 37,300 रिक्वेस्ट्स कायदेशीर बाबींसंबंधी (legal process)आहेत तर, 2,435 रिक्वेस्ट या इमर्जन्सी डिस्क्लोजर्स संबंधी (emergency disclosure) असल्याची माहितीही देण्यात आली आहे. फेसबुकच्या ट्रान्सपरन्सी रिपोर्टमध्ये (facebook Transparency Report)हा खुलासा करण्यात आला आहे.

याबाबत इंडिया टूडेने वृत्त दिलं आहे. जानेवारी ते जून 2020 या पहिल्या सहामाहीत भारत सरकारने युझर डेटासंबंधी माहिती मिळवण्यासाठी 35,560 रिक्वेस्ट पाठवल्या होत्या. तर पहिल्याच्या तुलनेत दुसऱ्या सहामाहीत यामध्ये 13.3 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

डेटा मागण्याऱ्या देशांमध्ये भारतापुढे केवळ अमेरिका आहे. जुलै ते डिसेंबर या सहा महिन्यांत अमेरिकेने 61,262 रिक्वेस्ट पाठवल्या होत्या. दरम्यान, 2020च्या दुसऱ्या सहामाहीत जगभरातून 1 लाख 91 हजार 13 डेटा रिक्वेस्ट आल्याचंही फेसबुकने सांगितलं. यात पहिल्याच्या सहामाहीच्या तुलनेत 10 टक्क्यांनी वाढ झाली आहे. भारतातील 62,754 युझर्स आणि अकाऊंटबद्दल माहिती देखील मागितली गेली, असंही फेसबुक रेकॉर्डवरून (facebook record) दिसून येतंय. सरकारने मागितलेल्या डेटापैकी 52 टक्के माहिती दिल्याचंही फेसबुकने सांगितलं.

Facebook वर कोणी तुम्हाला ट्रॅक करतंय का? या Settings ठरतील फायदेशीर

देशातील स्थानिक कायद्यांच्या आधारे कंटेंटवर बंदी घालण्याबाबतफेसबुकनेआपला दृष्टिकोन स्पष्ट केला. भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या (Ministry of Electronics and Information Technology) नियमावला अनुसरून दुसऱ्या सहामाहीत फेसबुकने कंटेंटसंबंधी 878 बाबींवर बंदी घातली. यामध्ये फेसबुक पेजेस (facebook pages), ग्रुप्स(groups), फेसबुक पोस्ट (facebook posts) आणि प्रोफाईल्सचा (profiles) समावेश आहे. या सर्वांनी माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 मधील कलम 69A सह सरकार आणि जनतेच्या सुरक्षिततेचे उल्लंघन करणारा कंटेंट फेसबुकवर प्रसिद्ध केल्यामुळे ही कारवाई केल्याचं फेसबुकने या ट्रान्स्परन्सी रिपोर्टमध्ये सांगितलं आहे.

Twitter ची मोठी घोषणा; Blue Tick साठी तुम्हीही करू शकता अर्ज, असं करा अप्लाय

भारतातील एकूण घटकांपैकी 10 घटकांवर तात्पुरती बंदी घालण्यात आली होती. ब्राझीलच्या सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती अलेक्झांडर डी मोरास (Alexandre de Moraes )यांनी दिलेल्या आदेशांनुसारफेसबुकने ब्राझीलमध्ये54कंटेंटवर बंदी घातली आहे. यामध्ये ब्राझीलचे अध्यक्ष बोलसोनारो यांच्या समर्थकांची12प्रोफाइल आणिफेसबुकपेजेसचा समावेश आहे.

ब्राझीलसंबंधी या12प्रोफाईल आणि पेजवर भारतासह जागतिक स्तरावर बंदी घालण्यात आली आहे. विविध देशांमध्ये कोर्टाने केलेल्या विनंतीनुसार आक्षेपार्हकंटेंटवर फेसबूक बंदी घालतआहे असंही फेसबुकने स्पष्ट केलं आहे.

First published:

Tags: Facebook, Modi government, User data