जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / फेसबुकने फॉलोअर्स गोठवल्यामुळे खळबळ, कोटींचे झुकरबर्ग हजारात, नेमकं काय झालं?

फेसबुकने फॉलोअर्स गोठवल्यामुळे खळबळ, कोटींचे झुकरबर्ग हजारात, नेमकं काय झालं?

फेसबुकवर फॉलोअर्स कमी झाल्यामुळे खळबळ!

फेसबुकवर फॉलोअर्स कमी झाल्यामुळे खळबळ!

फेसबुक अर्थात मेटाचा संस्थापक मार्क झुकरबर्गचे फॉलोअर्सही कोटींवरून काही हजारांत आले आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 12 ऑक्टोबर : तुम्ही जर आज फेसबुक चाळलं असेल तर फोलोअर्स कमी झाल्याची ओरड करणाऱ्या पोस्ट पाहिल्या असतील. अगदी तुमचेही फोलोअर्स कमी झाल्याचं तुम्ही चेक केल्यावर लक्षात येईल. फॉलोअर्स कमी झाल्यामुळे फेसबुकवर एकच खळबळ उडाली आहे. ज्यांच्या वैयक्तिक प्रोफाइलवर लाखो फॉलोअर्स होते त्यांची संख्या 10 हजारांहून कमी झाली आहे. फेसबुकवर बहुतांश लोक याबाबत पोस्ट लिहित आहेत. फेसबुक अर्थात मेटाचा संस्थापक मार्क झुकरबर्गचे फॉलोअर्सही कोटींवरून 9,994 वर आले आहेत. म्हणजेच कालपर्यंत ज्यांचे काही लाख, कोटी किंवा काही हजार फॉलोअर्स होते, आज ते सर्व 10 हजारांवर आले आहेत. फॉलोअर्स कमी झाल्याची तक्रार सर्व युजर्स करत आहेत. मात्र, फॉलोअर्स नेमके का कमी झाले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. वाचा -  व्हॉट्सअ‍ॅपचे नवे फीचर, आता 1 हजारांहून अधिक लोकांना ग्रुपमध्ये अ‍ॅड करता येणार प्रत्येकजण 10 हजारांच्या खाली फेक अकाउंटच्या तक्रारींबाबत फेसबुक वेळोवेळी अशा अकाऊंटवर कारवाई करत असते, त्यामुळे लोकांचे फॉलोअर्स कमी होत असतात. मात्र, यावेळी फॉलोअर्सची संख्या खूप कमी होत आहे. त्यातही विशेष म्हणजे प्रत्येकाचे फॉलोअर्स 10 हजारांवर आले आहेत. उदाहरणार्थ झुकेरबर्गच्या बाबतीत ही संख्या 4 कोटींवरून 10 हजारांहून खाली आली आहे.

News18लोकमत
News18लोकमत

फॉलोअर्स का कमी होत आहेत? फोलोअर्सची कमी होणारी संख्या पाहता हे बनावट खाती काढून टाकण्याचा परिणाम असण्याची शक्यता कमी दिसते. काही लोक म्हणतात की हा फेसबुकमधील बगमुळे झालेले असू शकते. यापूर्वीही अनेकदा असे घडले आहे. हे प्रकरण अद्याप स्पष्ट झाले नाही. दरम्यान, फेसबुकने अधिकृतपणे कोणतेही वक्तव्य जारी केलेले नाही. ट्विटरवरही घडलाय असा प्रकार तज्ञांच्या मते, कंपनी बनावट वापरकर्त्यांचे प्रोफाइल काढून टाकत आहे. त्यामुळे असे निकाल येत आहेत. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, सर्वकाही पुन्हा सामान्य होईल. असा अनुभव याआधीही ट्विटर युजर्सना आला आहे. इथेही लाखो फॉलोअर्स कमी झाले होते. पण, मग सगळे ठीक झाले. याबाबत ट्विटरने म्हटले आहे की, ते वेळोवेळी स्पॅम आणि बॉट अकाऊंट डिलीट करत असते, यामुळे असे घडते. आता फेसबुकवरही असच होत असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, याचे नेमके कारण काय, यासाठी कंपनीच्या अधिकृत वक्तव्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात