जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / AC लावल्यानंतरही 50 टक्क्यांहून कमी येईल विजेचं बिल; फक्त या 5 टिप्स करा फॉलो

AC लावल्यानंतरही 50 टक्क्यांहून कमी येईल विजेचं बिल; फक्त या 5 टिप्स करा फॉलो

AC लावल्यानंतरही 50 टक्क्यांहून कमी येईल विजेचं बिल; फक्त या 5 टिप्स करा फॉलो

नागरिकांनी या ट्रिक्स वापरल्या, तर वीजबिल 50 टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतं.

    नवी दिल्ली, 3 जून : गेल्या काही महिन्यांपासून इंधन, घरगुती वापराचा गॅस आणि अन्नधान्याच्या किमतीत सातत्यानं वाढ होत आहे. एकीकडे महागाईमुळे (Inflation) सर्वसामान्य नागरिक त्रस्त असताना, दुसरीकडे त्यात वाढत्या वीजबिलाची (Electricity Bill) भर पडत आहे. उन्हाळ्यात (Summer) विजेला मागणी वाढते. पंखा, एसी, फ्रीज आदी उपकरणांचा वापर वाढल्याने साहजिकच वीज बिला चे आकडे वाढतात. परंतु, या सर्व उपकरणांचा वापर करूनही वीज बिल मर्यादित ठेवण्यासाठी काही ट्रिक्सचा (Tricks) वापर करता येऊ शकतो. नागरिकांनी या ट्रिक्स वापरल्या, तर वीजबिल 50 टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतं. याविषयीची माहिती देणारं वृत्त `झी न्यूज हिंदी`ने प्रसिद्ध केलं आहे. उन्हाळ्यात उष्म्यापासून दिलासा मिळावा, यासाठी पंखा, एसी, कूलर आदी विद्युत उपकरणांचा वापर केला जातो. ही उपकरणं वापरत असताना आपलं लक्ष वेगानं धावणाऱ्या वीज मीटरकडे असतं. कारण यामुळे जास्त वीजबिल भरावं लागतं. परंतु, काही सोप्या ट्रिक्स वापरून आपण वीजबिल नियंत्रणात ठेवू शकतो. बल्ब (Bulb) आणि ट्यूबलाइटच्या तुलनेत `सीएफएल`चा (CFL) वापर केल्यास पाचपट विजेची बचत होते. त्यामुळे `सीएफएल`चा वापर करणं आवश्यक आहे. ज्या खोल्यांमध्ये लाइटची गरज नाही, तिथले लाइट बंद ठेवावेत. इन्फ्रारेड सेन्सर, मोशन सेन्सर आणि डिमरसारख्या उपकरणांचा वापर करावा. एलईडी लाइट्समुळे (LED Light) विजेचा वापर कमी प्रमाणात होतो आणि प्रकाशदेखील चांगला मिळतो. तसंच अन्य उपकरणं 5 स्टार रेटिंग असलेली घ्यावीत. त्यामुळे विजेची बचत होते. सोलर पॅनल (Solar Panel) अर्थात सौर ऊर्जा पॅनल हा सर्वोत्तम पर्याय आहे. आपल्याकडे पावसाळ्यातले अति पावसातले काही दिवस वगळता वर्षभर कायम सूर्यप्रकाश असतो. त्यामुळे घराच्या छतावर सोलर पॅनल बसवता येतं. यासाठी एकदाच गुंतवणूक करावी लागते; पण यामुळे वीजबिल कमी होण्यास मदत होते. तुमची गरज आणि घराची रचना याचा अभ्यास आणि ऑनलाइन रिसर्च करून सोलर पॅनलची निवड करू शकता. उन्हाळ्यात एसीपेक्षा (AC) सीलिंग आणि टेबल फॅनचा वापर जास्त करा. त्यासाठी प्रतितास 30 पैसे खर्च येतो, तर एसीसाठी 10 रुपये प्रतितास याप्रमाणे खर्च येतो. तुम्हाला एसी वापरायचा असेल तर तो 25 अंश सेल्सियस तापमानावर सेट करून वापरावा. तसंच ज्या खोलीत एसी सुरू आहे, त्या खोलीचा दरवाजा बंद करावा. यामुळे विजेचा वापर कमी होतो. फ्रीजवर (Fridge) मायक्रोवेव्हसारखी उपकरणं ठेवू नये. यामुळे विजेचा वापर जास्त होतो. तसंच फ्रीज थेट सूर्यप्रकाशात ठेवू नये. फ्रीजच्या जवळपास एअरफ्लोसाठी पुरेशी जागा ठेवावी. गरम अन्नपदार्थ फ्रीजमध्ये ठेवू नयेत. अन्नपदार्थ थंड झाल्यावरच फ्रीजमध्ये ठेवावेत. कम्प्युटर आणि टीव्हीचा वापर झाल्यावर बटणं बंद करावीत. मॉनिटर स्पीड मोडवर ठेवावा. फोन आणि कॅमेरा चार्जरचा वापर झाल्यावर चार्जर प्लगमधून काढून ठेवावेत. या वस्तू प्लग इन (Plug In) राहिल्यानं विजेचा वापर जास्त प्रमाणात होते. या सर्व सोप्या ट्रिक्सचा वापर केला तर महिन्याचं वीजबिल कमी येईल आणि तुम्हाला आर्थिक झळ सोसावी लागणार नाही.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात