नवी दिल्ली, 9 सप्टेंबर : EPFO ने आपल्या सब्सक्रायबर्सला सावधानतेचा इशारा दिला आहे. भविष्य कर्मचारी निधी संघटनेने आपल्या 6 कोटी खातेधारकांना आपल्या अकाउंटशी संबंधित माहितीबाबत सतर्क राहण्याचं सांगितलं आहे, अन्यथा मोठ्या नुकसानाचा इशारा दिला आहे. कोणत्याही नोकरदार वर्गासाठी त्याच्या पीएफ फंडातील रक्कम भविष्यासाठी सर्वात मोठी पुंजी ठरते. भविष्य निर्वाह निधी (PF) निवृत्तीनंतर आर्थिक सुरक्षा प्रदान करते.
EPFO ने अकाउंट होल्डर्सला आपल्या PF Account ची तसंच आपली इतर खासगी माहिती कोणाशीही शेअर न करण्याचं सांगितलं आहे. तसंच कोणत्याही लिंकद्वारे अॅप डाउनलोड न करण्याबाबतही इशारा दिला आहे. EPFO ने ट्विटरवर याबाबत अलर्ट जारी केला आहे. EPFO ने सांगितलं, की खातेधारकांनी फोनवर कधीही कोणत्याही व्यक्तीला आपला UAN नंबर, आधार नंबर, पॅन नंबरची माहिती देऊ नये. EPFO कधीही अशाप्रकारची माहिती खातेधारकांकडे मागत नाही. तसंच खातेधारकांना कॉलही करत नाही.
फेक वेबसाईटपासून सावधान -
EPFO ने सब्सक्रायबर्सला फेक कॉलपासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे. हॅकर्स EPF खात्यात लॉगइन करुन फसवणूक करू शकतात. तसंच EPFO ने फेक, बनावट वेबसाईटपासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. अन्यथा मोठ्या नुकसानाचा सामना करावा लागू शकतो, मोठ्या फ्रॉडची शक्यता EPFO ने वर्तवली आहे. पीएफ खात्यातील रक्कम हॅकर्स चोरी करण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळेच PF खातेधारकांनी वेळोवेळी त्यांचं अकाउंट तपासणं गरजेचं आहे.
#EPFO never asks it's members to share their personal details. Stay alert & beware of fraudsters.#SocialSecurity #PF #ईपीएफ #Employees #Services pic.twitter.com/FOul1jSNnf
— EPFO (@socialepfo) September 6, 2021
EPFO, PF च्या नावाने आलेल्या कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नका. तसंच लिंकवर चुकून क्लिक केल्यास, पुढे खात्यासंबंधीत कोणतीही माहिती मागितली असल्यास देऊ नका. पुढे सांगितलेल्या कोणत्याही गोष्टी फॉलो करू नका. यामुळे अकाउंट धोक्यात येऊ शकतं. कारण EPFO कधीही खातेधारकांकडे कोणतीही माहिती मागत नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.