Home /News /money /

ऑनलाईन पैसे पाठवताना क्षणभराची चूक पडली महागात; वृद्धानं गमावले तब्बल 52 लाख रुपये

ऑनलाईन पैसे पाठवताना क्षणभराची चूक पडली महागात; वृद्धानं गमावले तब्बल 52 लाख रुपये

एका ज्येष्ठ नागरिकानं चुकीच्या ठिकाणी क्लिक (Click) केलं आणि आपल्या अकाउंटमधील 52 लाख रुपये ती व्यक्ती गमावून बसली.

    प्रगत डिजिटल तंत्रज्ञानामुळे (Digital Technology) प्रत्येक गोष्ट ऑनलाइन (Online) करण्याकडे बहुतांश लोकांचा कल दिसून येतो. गेल्या दीड ते दोन वर्षांपासून जगातल्या बहुतेक देशांमध्ये कोरोनानं (Corona) कहर केला आहे. त्यामुळे प्रत्यक्ष संपर्क टाळत ऑनलाइन पद्धतीनं व्यवहार करण्यावर लोकांचा भर आहे; मात्र आर्थिक व्यवहार ऑनलाइन पद्धतीनं करण्याचं प्रमाण वाढण्यासोबतच सायबर क्राइमचं प्रमाणही वाढत आहे. त्यामुळे ऑनलाइन व्यवहार करताना पुरेशी काळजी घेणं आवश्यक आहे. ज्येष्ठ नागरिकांना (Senior Citizens) ऑनलाइन व्यवहारांबाबत पुरेशी माहिती नसते. त्यामुळे हे नागरिक सायबर क्राइमला बळी पडू शकतात. ऑस्ट्रेलियातल्या क्वीन्सलॅण्डमधली (Queensland) एक घटना याबाबत बोलकी ठरते. तिथल्या एका ज्येष्ठ नागरिकानं चुकीच्या ठिकाणी क्लिक (Click) केलं आणि आपल्या अकाउंटमधील 52 लाख रुपये ती व्यक्ती गमावून बसली. याबाबतचं वृत्त `आज तक`ने दिलं आहे. ऑनलाइन पैसे ट्रान्स्फर करताना खरं तर पुरेशी काळजी आणि संपूर्ण माहिती घेणं आवश्यक असतं. अन्यथा चुकीच्या अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर (Money Transfer) होऊन मोठा फटका बसण्याची शक्यता असते. क्वीन्सलँडमधल्या एका ज्येष्ठ नागरिकाकडून अशीच चूक झाली आणि त्याला 52 लाखांचा फटका बसला. 88 वर्षांच्या मिस्टर लेटन यांनी चुकीच्या ठिकाणी क्लिक केलं आणि त्यांच्या खात्यावरून 71,400 डॉलर म्हणजेच 52 लाख 51 हजार रुपयांहून अधिक रक्कम संबंधित कंपनीऐवजी चुकीच्या व्यक्तीच्या खात्यावर ट्रान्सफर झाली. मिस्टर लेटन यांनी झालेल्या प्रकाराबाबत आपल्या बॅंकेला (Bank) कळवलं. परंतु, तोवर बराच उशीर झाला होता. मिस्टर लेटन यांनी 14 जूनला आयएनजी बॅंकेतल्या (ING Bank) आपल्या अकाउंटमधून एएनझेड (ANZ Bank) अकाउंटमध्ये पैसे ट्रान्स्फर केले होते. त्यावेळी आपण चुकीच्या खात्यावर पैसे ट्रान्स्फर केले आहेत, असं त्यांच्या लक्षात आलं नाही. कारण त्यांनी एएनझेड बॅंकेचा चुकीचा अकाउंट नंबर सेव्ह केला होता. त्यामुळे हे पैसे दुसऱ्याच व्यक्तीला ट्रान्सफर झाले. ज्या व्यक्तीला हे पैसे ट्रान्सफर झाले होते, त्यानं ते परत देण्यास नकार दिला. त्यानंतर दोन्ही बॅंका आणि मिस्टर लेटन यांनी पोलिसांत याबाबत तक्रार दिली आहे. ज्या व्यक्तीच्या अकाउंटमध्ये हे पैसे ट्रान्स्फर झाले आहेत, त्याच्यावर कायद्यानुसार कारवाई होणार आहे. हे वाचा - टेक्स्टाइल सेक्टरला मोदी सरकारचं सर्वात मोठं गिफ्ट! या आठ राज्यांना होणार फायदाच फायदा चुकीच्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर झाल्याची बाब तीन तासांनंतर मिस्टर लेटन आणि त्यांच्या मुलीच्या लक्षात आली. परंतु, तोपर्यंत फारच उशीर झाला होता. कारण ज्या व्यक्तीच्या अकाउंटवर हे पैसे ट्रान्सफर झाले होते, त्याने ही सर्व रक्कम काढून घेतली होती. त्यामुळे आता काहीच करता येणार नाही, असं दोन्ही बॅंकांनी लेटन यांना सांगितलं. ज्या कंपनीला पैसे पाठवायचे होते. त्या कंपनीने लेटन यांच्यावर दबाव टाकण्यास सुरवात केली. त्यामुळे आपण आपलं घर गमावतो की काय अशी भिती लेटन यांना वाटू लागली. मात्र बॅंकांनी आमची कोणतीच मदत न केल्यानं निराश असल्याचं लेटन यांच्या मुलीनं स्पष्ट केलं. त्यामुळं मिस्टर लेटन आणि त्यांच्या कुटुंबीयांचं लक्ष आता पोलिसांच्या कारवाईकडे असून, 52 लाखांचा फटका बसल्यानं हे सर्व जण चिंतेत आहेत.
    First published:

    Tags: Money

    पुढील बातम्या