जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / ट्विटरवरचं महत्त्वाचं फिचर हटवणार मस्क, युजर्सच्या सुरक्षेवर व्यक्त केली जातेय चिंता

ट्विटरवरचं महत्त्वाचं फिचर हटवणार मस्क, युजर्सच्या सुरक्षेवर व्यक्त केली जातेय चिंता

ट्विटरवरचं महत्त्वाचं फिचर हटवणार मस्क, युजर्सच्या सुरक्षेवर व्यक्त केली जातेय चिंता

काही दिवसांपूर्वी ट्विटरचं सीईओपद सोडण्याबद्दल जनतेचं मत विचारण्यासाठी पोल घेणाऱ्या एलॉन मस्क यांनी आता आणखी एक नवीन निर्णय घेतला आहे.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 24 डिसेंबर : एलॉन मस्क यांनी ट्विटर कंपनी खरेदी केल्यानंतर ते खूपच चर्चेत आहेत. ते कंपनीबद्दल नवनवीन निर्णय घेत असतात. त्यांच्या निर्णयामुळे अनेकदा युझर्सनाही धक्का बसतो. काही दिवसांपूर्वी ट्विटरचं सीईओपद सोडण्याबद्दल जनतेचं मत विचारण्यासाठी पोल घेणाऱ्या एलॉन मस्क यांनी आता आणखी एक नवीन निर्णय घेतला आहे. त्यांनी ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून सुसाइड प्रिव्हेंशन फीचर हटवण्याचे आदेश दिले आहेत. आत्महत्या करण्याचा विचार करणाऱ्या युझर्सना या फीचरद्वारे मदत केली जात होती. आत्महत्या थांबवण्यास उपयुक्त ठरलेलं हे फीचर हटवण्याचे आदेश मस्क यांनी दिल्यानंतर ट्विटर युझर्सच्या सुरक्षेबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. या संदर्भातलं वृत्त ‘टीव्ही 9 हिंदी’ने दिलं आहे. एलॉन मस्क यांनी सुसाइड प्रिव्हेंशन फीचर हटवण्याचे आदेश का दिले आहेत, यामागचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. विशिष्ट ट्विट किंवा कंटेंट पाहून एखाद्या युझरने आत्महत्या करण्याचा विचार केल्यास, ट्विटरचं सुसाइड प्रिव्हेंशन फीचर त्याचा आत्महत्येचा विचार बदलण्यास मदत करतं. मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म अशा युझर्सना सुरक्षिततेशी संबंधित हॉटलाइन आणि इतर पद्धतींनी मदत करतं. अलीकडेच, हे फीचर बंद करण्याच्या निर्णयाशी परिचित असलेल्या दोन व्यक्तींनी याबाबत खुलासा केला आहे. हेही वाचा :  Twitter ने काढलेले कर्मचारी बदला घेणार, एलन मस्कना जोरदार धक्का देणार! फीचरने कशी होते मदत हे फीचर काढून टाकण्यापूर्वी कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. युझर्स #ThereIsHelp द्वारे या फीचर्सची मदत घेतात. या फीचरमुळे जगभरातल्या अशा अनेक गटांना मदत मिळाली आहे, जे मानसिक आरोग्य, एचआयव्ही, व्हॅक्सिन, बाल शोषण, कोविड 19, लिंग-आधारित हिंसा, नैसर्गिक आपत्ती आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य या क्षेत्रात काम करतात. मस्क यांच्या निर्णयाची माहिती असलेल्या दोन्ही व्यक्तींनी नाव न सांगण्याच्या अटीवर ही माहिती दिली आहे. अनेक देशांना मिळाली मदत आत्महत्या प्रतिबंधक चिन्हं ट्विटरवर पाच वर्षांपूर्वी प्रसिद्ध करण्यात आली होती. यापैकी अनेक चिन्हं 30हून अधिक देशांमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहेत. या कार्याबद्दल कंपनीने यापूर्वी एका ब्लॉगपोस्टमध्ये म्हटलं होतं, की युझर्सपर्यंत आमची सेवा पोहोचवणं आणि गरजेच्या वेळी त्यांना मदत करणं हे आमचं कर्तव्य आहे. हे फीचर हटवल्याने ट्विटर युझर्सच्या सुरक्षिततेवर परिणाम होऊ शकतो. हेही वाचा :  स्मार्टफोन युग संपणार, माणसाच्या शरीरातच बसवणार सिम कार्ड? बिल गेट्सची अशीही भविष्यवाणी

     हे फीचर काढून टाकल्यानंतर सोशल मीडियावर युझर्सच्या सुरक्षेची चिंता खूप वाढली आहे. अनेक रिसर्चर्स आणि नागरी हक्कांसाठी काम करणाऱ्या संस्थांनी ट्विटरवर वांशिक आणि द्वेषपूर्ण मजकुराच्या संख्येत वाढ झाल्याचं मान्य केलं आहे. असा कंटेंट युझर्सना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करतो, असंही म्हटलं आहे; मात्र ट्विटरवरच्या हानिकारक कंटेंटचं प्रमाण कमी झाल्याचा दावा मस्क यांनी केला आहे. मस्क यांनी आता हा निर्णय घेतला असला, तरी येत्या काळात त्याला विरोध झाल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया काय असेल, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात