मुंबई, 16 डिसेंबर : 2022 हे वर्ष संपत आलंय. या वर्षी आपल्याला अनेक नवनवीन टेक्नॉलॉजी पाहायला मिळाल्या. आता Neuralink ही कल्पना पुढे आली आहे. हे भविष्यातलं तंत्रज्ञान असू शकतं. भविष्यात स्मार्टफोन कसा असेल, त्यात कोणती फीचर्स असतील, ते वापरण्याची पद्धत काय असेल, असे प्रश्न अनेकांना पडतात; पण भविष्यात फोनच नसतील तर? म्हणजेच स्मार्टफोनचे युग संपलं आणि त्याऐवजी दुसरी टेक्नॉलॉजी आली तर? दोन दशकांपूर्वीपर्यंत स्मार्टफोनच्या अशा स्वरूपाचा विचार कोणी केला नव्हता; पण हळूहळू कॉर्डलेस ते मोबाइल फोन आणि स्मार्टफोनपर्यंतचा प्रवास पूर्ण झाला आहे. आता चर्चा आहे की भविष्यातला स्मार्टफोन कसा असेल? यात कॅमेऱ्यांची संख्या वाढेल की फोल्डिंग स्क्रीनचा ट्रेंड दिसेल? अशातच आता नोकियाचे सीईओ पेक्का लुंडमार्क यांनी स्मार्टफोनच्या भविष्याबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांचंही असंच काहीसं मत आहे. इलेक्ट्रॉनिक टॅटू हे भविष्यातले स्मार्टफोन असू शकतात असा त्यांचा विश्वास आहे. स्मार्टफोनचं युग संपणार का? नोकियाचे सीईओ पेक्का लुंडमार्क यांच्या मते, 2030पर्यंत 6G टेक्नॉलॉजी येईल, परंतु तोपर्यंत स्मार्टफोन्स ‘कॉमन इंटरफेस’ नसतील. सध्या स्मार्टफोन हा एक कॉमन इंटरफेस आहे. परंतु येत्या काळात त्याची जागा आणखी काही प्रॉडक्ट्स घेऊ शकतात. म्हणजे तुम्हाला ही सर्व फीचर्स स्मार्ट वॉच किंवा स्मार्ट ग्लासेसमध्ये मिळतील. (फोनवर संभाषण सुरू असताना विचित्र आवाज ऐकू आल्यास व्हा सावध; असू शकतात ‘या’ गोष्टीचे संकेत) पेक्का यांच्या म्हणण्यानुसार, ‘2030 पर्यंत आपण सध्या वापरत असलेला स्मार्टफोन सर्वांत जास्त वापरलं जाणारं डिव्हाइस नसेल. यातल्या अनेक गोष्टी थेट आपल्या शरीरात बसवता येतील. नुकतीच आलेली न्यूरालिंकची ब्रेन चिप हे याचं उदाहरण आहे. या चिपच्या मदतीने माकड आपल्या मेंदूचा वापर करून संगणकावर टाइप करत आहे. लवकरच या टेक्नॉलॉजीची चाचणी मानवांवरही सुरू केली जाऊ शकते. सध्या ते दिव्यांगांच्या मदतीसाठी तयार केलं जात असलं, तरी भविष्यात त्याचा स्मार्टफोनसारखा वापर केला जाऊ शकतो. मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांचंही असंच काहीसं मत आहे. बिल गेट्स यांनी वर्षाच्या सुरुवातीलाच असं वक्तव्य केलं होतं. ते म्हणाले होते की, ‘येत्या काळात इलेक्ट्रॉनिक टॅटू स्मार्टफोनला रिप्लेस करू शकतात. अशी डिव्हाइसेस तुम्ही अनेक चित्रपटांमध्ये पाहिली असतील. त्यांच्या मते, या डिव्हाइसचा वापर करून स्मार्टफोन एखाद्याच्या शरीरात इंटिग्रेट केला जाऊ शकतो. भविष्यात हे टॅटू स्मार्टफोनची जागा घेऊ शकतात’, असा विश्वास त्यांना वाटतो. त्यांनी Chaotic Moon टॅटूच्या आधारे याची कल्पना केली होती. (Appleच्या ‘या’ डिव्हाइसवरून Ex-बॉयफ्रेंड ठेवत होता नजर, महिलेनं थेट कंपनीवरच केली केस) ही कंपनी बायोटेक्नॉलॉजीवर आधारित टॅटू बनवते. ते युझर्सच्या शरीरातून माहिती गोळा करतात. सध्या असे टॅटू स्पोर्ट्स आणि मेडिकल लाइनमध्ये वापरले जातात. असा अंदाज आहे की भविष्यात स्मार्टफोन हे स्टिकरसारखे असतील. ते तुम्ही तुमच्या अंगावर चिकटवून चालू शकाल. भविष्यात काय होईल हे कोणालाच माहीत नाही; पण त्याचा मार्ग आपल्या आजच्या कल्पनेतून जातो. कॉर्डलेस ही मोबाइल फोनच्या कल्पनेची सुरुवात होती आणि भविष्यात त्याचं विकसित स्वरूप स्मार्टफोन म्हणून उदयास आलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.