Home /News /technology /

Elon Musk यांचं Starlink Internet वापरू नका; मोदी सरकार का देतंय असा सल्ला?

Elon Musk यांचं Starlink Internet वापरू नका; मोदी सरकार का देतंय असा सल्ला?

मस्क यांच्या स्टारलिंक इंटरनेट सर्व्हिसेस या कंपनीला भारतात अजूनही लायसन्स मिळालेलं नाही. त्यामुळे या कंपनीची सेवा घेऊ नये असं दूरसंचार विभागानं म्हटलं आहे.

नवी दिल्ली, 27 नोव्हेंबर : एलॉन मस्क आणि त्याची कंपनी जगभरात प्रसिद्ध आहे. सध्या मस्क यांच्या स्टारलिंक इंटरनेट सेवेची (Starlink Internet Services) सगळीकडेच चर्चा आहे. पण देशाच्या दूरसंचार विभागाने (The Department of Telecommunications) भारतीय नागरिकांना एक महत्त्वाचा इशारा दिला आहे. मस्क यांच्या स्टारलिंक इंटरनेट सर्व्हिसेस या कंपनीला भारतात अजूनही लायसन्स मिळालेलं नाही. त्यामुळे या कंपनीची सेवा घेऊ नये असं दूरसंचार विभागानं म्हटलं आहे. इंटरनेट सेवा देणाऱ्या कंपन्यांना सॅटेलाइटवर आधारित सेवा देण्यापूर्वी लायसन्स मिळवणं गरजेचं असतं, मात्र स्टारलिंक कंपनीकडे भारतात सॅटेलाइटवर आधारित सेवा देण्याचं लायसन्स नाही. दूरसंचार विभागाकडून स्टारलिंकला आधी मंजुरी मिळवणं आवश्यक आहे. ‘मेसर्स स्टारलिंकने भारतात सॅटेलाइटवर आधारित स्टारलिंक इंटरनेट सेवेसाठी (Starlink Internet Services) प्री-सेलिंग/प्री –बुकिंग सुरू केलं आहे. भारतात युजर्स सॅटेलाइटवर आधारित इंटरनेट सेवा बुक करू शकतात असं स्टारलिंकच्या वेबसाइटवरून स्पष्ट होतं,’असं सरकारच्या वतीने सांगण्यात आलं आहे. पण स्टारलिंकला भारतात या सॅटेलाइटवर आधारित इंटरनेट सेवा देण्यासाठी दूरसंचार विभागाकडून आवश्यक लायसन्स मिळवणं गरजेचं आहे. त्यामुळेच सरकारनं भारतातल्या नागरिकांना इशारा दिला आहे. वरील कंपनीकडे आवश्यक ते लायसन्स नाही. स्टारलिंककडे सॅटेलाइटवर आधारित इंटरनेट सेवा देण्यासाठीचं लायसन्स अद्याप नाही, ही गोष्ट लक्षात घेऊन स्टारलिंकचं सदस्यत्व न घेण्याचं आवाहन सरकारच्या वतीने करण्यात येत आहे. जाहिरातीत सांगितलेल्या स्टारलिंकचं सदस्यत्व घेऊ नये, असा सल्ला सरकारनं दिला आहे. भारतात सॅटेलाइटवर आधारिक सेवांसाठी एका ठराविक नियमावलीचं पालन करणं गरजेचं आहे. ग्रामीण भागात, तसंच देशाच्या अन्य भागांतही हायस्पीड इंटरनेट सेवा देण्याचा दावा starlink च्या जाहिरातीत करण्यात आला आहे. 2022 च्या डिसेंबरपासून या सेवेची सुरुवात होईल असं बोललं जात होतं. या इंटरनेट सेवेमुळे भारतातल्या डिजिटल क्षेत्रात मोठा भूकंप होणार असल्याची चर्चा सुरू होती, पण स्टारलिंककडे भारतामध्ये सेवा देण्यासाठी अत्यावश्यक असलेलं लायसन्स अद्याप नाही.

भारतीयांच्या सुरक्षेसाठी असलेलं Data Protection Bill अंतिम टप्प्यात

त्यामुळे भारतातल्या नियमांचं पालन करण्याचं आवाहन भारत सरकारनं स्टारलिंक कंपनीला केलं आहे. तसंच भारतात सॅटेलाइट इंटरनेट सेवेचं बुकिंग सध्या तरी न करण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे. आपल्या देशात सध्या अनेक खासगी टेलिकॉम कंपन्या आहेत. या सर्व कंपन्यांच्या तुलनेत फास्ट स्पीड देण्याचा दावा मस्क यांच्या starlink कंपनीनं केला होता, पण केंद्र सरकारने मस्क (Elon Musk) यांच्या कंपनीला झटका दिल्याचं बोललं जात आहे.
First published:

Tags: Elon musk, Internet, Internet use, Tech news

पुढील बातम्या