नवी दिल्ली, 5 एप्रिल: टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क (Elon Musk) यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर मोठी घोषणा केली आहे. ऑस्टिन येथे बनवण्यात येणाऱ्या टेस्ला मॅन्युफॅक्चरिंग प्लांटमध्ये 2022 पर्यंत 10000 हून अधिक लोकांना काम देण्यात येणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे विद्यार्थ्यांना या प्रसिद्ध ब्रँडसह काम करण्यासाठी कॉलेज डिग्रीची आवश्यकता नसेल. विद्यार्थी हाय स्कूलनंतर या प्लांटमध्ये नोकरीसाठी अर्ज करू शकतात. मस्क यांनी याआधी जुलैमध्ये कंपनीचं कंस्ट्रक्शन काम नवीन मॅन्युफॅक्चरिंग सुविधेसह वेगात सुरू असल्याची घोषणा केली होती. ऑस्टिन अमेरिकन-स्टेट्समॅनच्या एका रिपोर्टनुसार, जर टेस्लाने 10000 वर्कर्सला रोजगार दिला, तर कंपनीकडून आधी सांगण्यात आलेल्या वर्कर्सच्या किमान संख्येच्या दुप्पट ही संख्या असेल, जी आधी वर्कर्स संख्या 5000 होती. टेक्सासमध्ये नोकरी करण्याचे सांगितले फायदे - मस्क यांनी आपल्या ट्वीटमध्ये नव्या गीगा टेक्सासमध्ये जॉब करण्याचे फायदेही सांगतिले. नोकरीचं ठिकाण एयरपोर्टपासून केवळ पाच मिनिटांच्या अंतरावर आहे, जे सिटीपासून 15 मिनिटांवर कोलोराडो नदीजवळ आहे. कंपनीचे एक रिक्रूटिंग मॅनेजर क्रिसरॅली यांनी सांगतिलं की, कंपनीने ऑस्टिन कम्युनिटी कॉलेज, ह्युस्टन-टिलॉट्सन विद्यापीठ, टेक्सास विद्यापीठाशी संपर्क केला आहे. कंपनी त्या विद्यार्थ्यांना रिक्रूट करण्याबाबत विचार करत आहे, ज्यांना आपलं शिक्षण सुरू असतानाच टेस्लामध्ये करियर करायचं आहे.
(वाचा - ही कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना आरामासाठी देतेय 1 आठवड्याचा पेड वीक ऑफ )
तसंच जे लोक बाहेरील मॅन्युफॅक्चरिंगमधून येतील, ज्या लोकांमध्ये काही नवीन करण्याची इच्छा आहे, जे बदल घडवण्यास सक्षम आहे अशा लोकांना येथे चांगली संधी मिळेल, असंही कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. ऑस्टिन अमेरिकन-स्टेट्समॅनच्या रिपोर्टनुसार, कंपनीची जॉब साईट सध्या या क्षेत्रासाठी 280 हून अधिक ओपन पोजिशनसाठी लिस्टेड आहे. टेस्ला हाय स्कूल, कॉलेज, वर्कफोर्स ट्रेनिंग एजेन्सीस आणि बिजनेस ग्रुप यासारख्या लोकांना या क्षेत्रात काम करण्यासाठी हायर करू इच्छिते.