ही कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना आरामासाठी देतेय 1 आठवड्याचा पेड वीक ऑफ

ही कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना आरामासाठी देतेय 1 आठवड्याचा पेड वीक ऑफ

आपल्या कर्मचाऱ्यांना काही दिवस तणावमुक्त ठेवण्यासाठी आणि स्वत:ला रिचार्ज करण्यासाठी कंपनीने हे पाऊल उचललं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 5 एप्रिल : मायक्रोसॉफ्टच्या मालकीची प्रोफेशल सोशल नेटवर्क कंपनी Linkedin ने कोरोना महामारीच्या या काळात आपल्या कर्मचाऱ्यांना एक गिफ्ट देण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनी आपल्या जगभरातील जवळपास सर्वच कर्मचाऱ्यांना एक आठवड्यासाठी पेड लीव देणार आहे. याची सुरुवात 5 एप्रिलपासून झाली आहे. आपल्या कर्मचाऱ्यांना काही दिवस तणावमुक्त ठेवण्यासाठी आणि स्वत:ला रिचार्ज करण्यासाठी कंपनीने हे पाऊल उचललं आहे.

CNN च्या रिपोर्टनुसार, Linkedin मध्ये काम करणारे जगभरातील सर्व कर्मचारी 5 एप्रिलपासून पेड वीक ऑफवर असणार आहेत. या वीक ऑफमुळे कर्मचाऱ्यांना तणावापासून दूर राहता येईल, असं कंपनीचं म्हणणं आहे.

हा पेड वीक ऑफ कंपनीने आपल्या फुल टाईम 15,900 कर्मचाऱ्यांना दिला आहे. इतर कर्मचाऱ्यांच्या सुट्टीदरम्यान केवळ एक कोर टीम एक आठवडा काम करेल. त्यानंतर आठवडाभरानंतर, या कोर टीमला पेड वीक ऑफ दिला जाईल.

(वाचा - डेटा यूजबाबत Airtel ने पाठवलं 12 लाखांचं बिल; SMS पाहून ग्राहकाला हार्ट अटॅक)

लिंक्डइनचे चीफ पीपल ऑफिसर Teuila Hanson यांनी सांगितलं की, आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांना काही किंमती देऊ इच्छित होतो आणि सध्याच्या काळात सर्वात किंमती गोष्ट वेळच असल्याचं आम्हाला वाटलं आणि त्याच दृष्टीने हे पाऊल उचलण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.

सर्व कर्मचारी एकाच वेळी सुट्टीवर असल्याने त्यांच्या गैरहजेरीत ई-मेल, मीटिंग नोट्स आणि प्रोजेक्ट रिक्वेस्ट सारख्या कामांचा बोझाही वाढणार नसल्याचं, ते म्हणाले. तसंच कंपनी कोरोना महामारी आल्यापासून जवळपास एक वर्षाहून अधिक काळ रिमोटली काम करत आहे. त्याशिवाय कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांचा नियमितपणे सर्व्हेही करते.

Published by: Karishma Bhurke
First published: April 5, 2021, 12:10 PM IST
Tags:

ताज्या बातम्या