नवी दिल्ली, 10 मे : वाढत्या उन्हाळ्यात अनेकांना विजेचं बिल भरमसाठ येत आहे. याचदरम्यान एक मेसेज व्हायरल होत आहे. या मेसेजमध्ये जर तुम्ही विजेचं बिल अपडेट केलं नसेल, तर विज कनेक्शन कट (Electricity Connection) केलं जाईल असं लिहिलेलं आहे. पण हा मेसेज खरा नसून फेक (Fake Message) आहे. हा मेसेज एक फ्रॉड असून, फोन हॅक करुन बँक अकाउंट रिकामं होण्याचा धोका आहे.
विज बिल अपडेट करण्याचा फेक मेसेज -
जर तुम्हाला मोबाइलवर विजेसंबंधी मेसेज येत असेल आणि त्या मेसेजमध्ये विज कापण्यासंबंधी लिहिलेलं असेल तर सावध व्हा. कारण हा मेसेज फ्रॉड असून यामुळे नुकसान होऊ शकतं. फ्रॉड मेसेज पाठवल्याची अशी अनेक प्रकरणं समोर आली आहेत. या मेसेजद्वारे अनेकांचं बँक अकाउंट खाली होत आहे.
लाइट कापण्याबाबत मेसेज आल्यास सतर्क व्हा. फ्रॉडस्टर्स ओटीपी मागून फ्रॉड (OTP Fraud) करत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. तुमचं मागील महिन्याचं बिल अपडटे नसल्याने तुमचं विज कनेक्शन कापलं जाईल, असा फेक मेसेज केला जातो आणि पुढे या मेसेजमधून फसवणूक केली जाते. Dear Consumer Your Electricity power will be disconnected tonight at 9.30 pm from electricity office because your previous month bill was not update. Please Immediately contact our electricity officer अशा आशयाचा मेसेज पाठवला जातो.
या मेसेजखाली एक कॉन्टॅक्ट नंबरही दिला गेला आहे. त्यावर कॉन्टॅक्ट करण्याचं सांगितलं जातं. परंतु अशा कोणत्याही नंबरवर कॉन्टॅक्ट करू नका. असा मेसेज आल्यास सावध व्हा. तुमचे कोणतेही बँकिंग, आधार-पॅन डिटेल्स कोणालाही देऊ नका. बिल अपडेट करण्याच्या नावाखाली होणाऱ्या फ्रॉडपासून सावध व्हा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cyber crime, Electricity cut, Online fraud