मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

What an Idea! पेट्रोल-डिझेल नाही तर सूर्यप्रकाशावर चालणार ऑटो रिक्षा, दोन तरुणांच्या स्टार्टअपची कमाल

What an Idea! पेट्रोल-डिझेल नाही तर सूर्यप्रकाशावर चालणार ऑटो रिक्षा, दोन तरुणांच्या स्टार्टअपची कमाल

लोकांना आपल्या कार-बाइकमध्ये पेट्रोल-डिझेल टाकण्याआधी दहा वेळा विचार करावा लागतो आहे. अशात अनेक जण इलेक्ट्रिक स्कूटरकडेही वळताना दिसत आहेत.

लोकांना आपल्या कार-बाइकमध्ये पेट्रोल-डिझेल टाकण्याआधी दहा वेळा विचार करावा लागतो आहे. अशात अनेक जण इलेक्ट्रिक स्कूटरकडेही वळताना दिसत आहेत.

लोकांना आपल्या कार-बाइकमध्ये पेट्रोल-डिझेल टाकण्याआधी दहा वेळा विचार करावा लागतो आहे. अशात अनेक जण इलेक्ट्रिक स्कूटरकडेही वळताना दिसत आहेत.

  • Published by:  Karishma

तिरुवनंतपुरम, 5 एप्रिल : चार महिन्यांपासून स्थिर असलेला पेट्रोल-डिझेल दर मागील जवळपास 15 दिवसांपासून दररोज वाढतो आहे. मुंबईत पेट्रोल 119 रुपयांवर पोहोचलं आहे. लोकांना आपल्या कार-बाइकमध्ये पेट्रोल-डिझेल टाकण्याआधी दहा वेळा विचार करावा लागतो आहे. अशात अनेक जण इलेक्ट्रिक स्कूटरकडेही वळताना दिसत आहेत. यातच दोन तरुणांनी पेट्रोल-डिझेलला पर्याय म्हणून थेट सौर उर्जेवर अर्थात सूर्यप्रकाशावर चालणारी इलेक्ट्रिक ऑटो रिक्षा बनवली आहे.

दोन उद्योजक एरोमल पद्मजयन आणि इविन गांसियस, (Aromal Padmajayan & Lvin Gancius) लोकांची मागणी लक्षात घेऊन इलेक्ट्रिक वाहन उत्पादनाकडे वळले आहेत. या दोघांनी काही वर्षांपूर्वी आपलं इलेक्ट्रिक वाहन स्टार्टअप लाँच केलं होतं आणि आता ते इलेक्ट्रिक ऑटो रिक्षाचं (Electric Auto Rickshaws) उत्पादन करण्याकडे वळले आहेत.

एरोमल पद्मजयन आणि इविन गांसियस यांच्या स्टार्टअप कंपनीचं नाव ‘एटरनियम लोकोमोशन एंड नेविगेशन प्राइवेट लिमिटेड’ (Eternium Locomotion & Navigation Pvt ltd – ELON) असं आहे. ही स्टार्टअप कंपनी तिरुवनंतपुरममध्ये आहे. त्यांनी एका आठवड्यापूर्वी वाहनाचं प्रोटोटाइप लाँच केलं होतं. हे दोघेही या क्षेत्राबाबत आशावादी असून सरकारी धोराणांबद्दल आणि इंधनाच्या वाढत्या दरानंतर लोकांना बॅटरीवर चालणाऱ्या वाहनांकडे वळण्यासाठी प्रोत्साहित करत आहेत.

33 वर्षीय एरोमल पद्मजयन कोझीकोड येथील रहिवासी असून त्यांनी नुकतंच आपल्या आयटी कंपनीसाठी कॅम्ब्रिज क्लीनटेक, युकेसाठी पहिलं व्हर्चुअल मॅचअप कन्वेंशन प्लॅटफॉर्म विकसित केला आहे. तर इविन गांसियस 41 वर्षांचे असून एक एंटरप्रेन्योर असून त्यांनी आपल्या प्रवासात अनेक चढ-उतार पाहिले आहेत. जानेवारी 2020 पासून दोघेही आपल्या या प्रोजेक्टवर काम करत आहेत. त्यांनी या प्रोजेक्टसाठी आपला स्वत:चा 15 लाख रुपयांचा फंड जमा केला.

हे वाचा - VIDEO: Bullet चालवणाऱ्यांनो सावधान! अचानक आग लागल्याने बॉम्बप्रमाणे फुटली नवी Royal Enfield

या दोघांची स्टार्टअप कंपनी एटरनियमच्या टीमने 24 मार्च रोजी तिरुवनंतपुरममध्ये प्रोटोटाइप ‘गेक्को’ लाँच केली. ही एक ई-ऑटो रिक्षा आहे. आता याचं व्यावसायिक उत्पादन लवकरच सुरू होणार आहे आणि Eternium कंपनी या वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीपर्यंत हे मॉडेल बाजारात आणण्याच्या तयारीत आहे.

‘गेक्को’ ई-ऑटो रिक्षाचं डिझाइन काहीसं रेट्रो असून त्यांनी याला आधुनिक रुपही दिलं आहे. याचं मूळ स्वरुप देशात 80-90 च्या दशकात चालणाऱ्या ऑटोरिक्षाचं आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या रिक्षाची बॅटरी सामान्य पोर्टचा वापर करुन चार्ज करता येते. तसंच बॅटरी सौर पॅनलवरही रिचार्ज करता येते. म्हणजे सूर्यप्रकाशावर या रिक्षाची बॅटरी परिणामी रिक्षा चालू शकेल.

First published:

Tags: Electric rickshaw, Electric vehicles